प्रिया बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिया बापट
जन्म १८ सप्टेंबर, १९८६ (1986-09-18) (वय: ३१)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पती उमेश कामत

प्रिया शरद बापट (जन्म: १८ सप्टेंबर १९८६) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. २००० सालच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून तिने अभिनयाची सुरूवात केली. मुन्ना भाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्ना भाई इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करणारी प्रिया नवा गडी.. नवं राज्य ह्या मराठी नाटकामध्ये आघाडीच्या भूमिकेत चमकली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भाषा भूमिका
२०१६ वजनदार मराठी
२०१५ टाईमपास २ मराठी
२०१४ आंधळी कोशिंबीर मराठी
हॅपी जर्नी मराठी
टाईम प्लीज मराठी
२०१३ काकस्पर्श मराठी
२००८ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मराठी
२०१० आनंदी आनंद मराठी
२००६ लगे राहो मुन्ना भाई हिंदी
२००३ मुन्ना भाई M.B.B.S  हिंदी
२००२ भेट मराठी
२००० बाबासाहेब आंबेडकर        मराठी

रंगमंच

वर्ष नाटकाचे नाव भाषा भूमिका
२०११ नवा गडी नवं राज्य मराठी
वाटेवरती काचा गं  मराठी

दूरचित्रवाणी

वर्ष मालिका भाषा भूमिका
२०१३ शुभंकरोती मराठी
अधुरी एक कहाणी मराठी
बंदिनी मराठी
दामिनी  मराठी
दे धमाल मराठी
२०११ सा रे ग म प मराठी
गुड  मॉर्निंग  महाराष्ट्र मराठी
अल्फा  फीचर्स मराठी
दादासाहेब  फाळके मराठी
२००७ आभाळमाया मराठी
आम्ही ट्रॅव्हलकर मराठी

बाह्य दुवे[संपादन]