नवा गडी.. नवं राज्य (नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नवा गडी.. नवं राज्य
लेखन क्षितिज पटवर्धन
भाषा मराठी
निर्मिती वर्ष इ.स. २०१०
दिग्दर्शन समीर विद्वांस
संगीत हृषीकेश कामेरकर
नेपथ्य प्रसाद वालावलकर
कलाकार उमेश कामत, प्रिया बापट, हेमंत ढोमे आणि ऊर्जा देशपांडे

नवा गडी.. नवं राज्य हे इ.स. २०१० साली रंगमंचावर आलेले मराठी भाषेतील नाटक आहे.

कथानक[संपादन]


अत्यवस्थता
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

या नाटकाची सुरुवात होते ती ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या ऋषी (उमेश कामत) आणि अमृता (प्रिया बापट) या एका नवीन जोडप्याने. लग्न झाल्याझाल्या काही दिवस इंग्लंडमध्ये राहून आलेले हे जोडपे येथे पण एकदम खुशीत आहे. दोघांमध्ये ८ वर्षांचे अंतर असले तरी तो तिला एकदम फुलासारखे जपत असतो आणि ती पण तिचा नवरा या नात्याने त्याच्यावर जिवापाड प्रेम करत असते. आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात तिचा एक जुना मित्र हिम्मतराव (हेमंत ढोमे) अवतरतो आणि तिथून या दोघांमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात होते. हिम्मतराव हा एक शास्त्रज्ञ असून तो फुलपाखरांवर संशोधन करत असतो. ऋषीला आवडत नाही म्हणून अमृता हिम्मतरावाला घरी येण्यास मनाई करते. याच काळात ऋषीच्या ऑफिसात त्याची एक जुनी मैत्रीण केतकी (ऊर्जा देशपांडे) रुजू होते. येथूनच संशय आणि इतर गोष्टी सुरू होतात.

भूमिका[संपादन]

भूमिका कलाकार
ऋषी उमेश कामत
अमृता प्रिया बापट
हिम्मत राव हेमंत ढोमे
केतकी ऊर्जा देशपांडे