काकस्पर्श

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काकस्पर्श
दिग्दर्शन महेश मांजरेकर
निर्मिती अनिरुद्ध देशपांडे
मेधा मांजरेकर
प्रमुख कलाकार सचिन खेडेकर
प्रिया बापट
मेधा मांजरेकर
सविता मालपेकर
केतकी माटेगावकर
वैभव मांगले
गीते किशोर कदम
संगीत राहुल रानडे
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ४ मे २०१२
अवधी १४७ मिनिटे


काकस्पर्श हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सचिन खेडेकरप्रिया बापट ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

काकस्पर्शमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामधील काळात कोकणात राहणाऱ्या एका कर्मठ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये घडणाऱ्या घटना कथा रंगवल्या आहेत. काकस्पर्शला टीकाकारांनी पसंदी दाखवली व तिकिट ख्डकीवर देखील तो यशस्वी ठरला.

पुरस्कार[संपादन]

२०१२ ११वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव[awards १]
 • महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार
 • विशेष पुरस्कार: सचिन खॅडेकर
२०१२ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार[awards २]
 • सर्वोत्तम अभिनेता: सचिन खेडेकर
 • सर्वोत्तम मेकप: विक्रम गायकवाड, हेन्री मार्टिस
 • सर्वोत्तम दिग्दर्शक: महेश मांजरेकर
 • सर्वोत्तम अभिनेत्री: प्रिया बापट
 • सर्वोत्तम कला दिग्दर्शक: प्रशांत राणे, अभिषेक विजयकर
२०१२ मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगमंच पुरस्कार[awards ३]
 • सर्वोत्तम चित्रपट
 • सर्वोत्तम अभिनेता: सचिन खेडेकर
 • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: मेधा मांजरेकर
 • सर्वोत्तम कला दिग्दर्शक: प्रशांत राणे, अभिषेक विजयकर
 • सर्वोत्तम मेकप: विक्रम गायकवाड, हेन्री मार्टिस
 • सर्वोत्तम दिग्दर्शक: महेश मांजरेकर
 • सर्वोत्तम अभिनेत्री: केतकी माटेगावकर
 • सर्वोत्तम छायाचित्रण: अजित रेड्डी
 • सर्वोत्तम वेशभुषा: लक्ष्मण यल्लप्पा गोल्लर
२०१२ झी गौरव पुरस्कार[awards ४]
 • सर्वोत्तम अभिनेता: सचिन खेडेकर
 • सर्वोत्तम सहय्यक अभिनेता: संजय खापरे
 • सर्वोत्तम कथा: उषा दातार
 • सर्वोत्तम ध्वनी: मनोज मोचेमाडकर
 • सर्वोत्तम अभिनेत्री: प्रिया बापट
 • सर्वोत्तम पार्श्वगायिका: राजश्री पाठक
 • सर्वोत्तम संवाद: गिरीश जोशी

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Award for 'Kaksparsh' at Pune International Film Festival". Pune. The Times of India. 18 January 2013. 30 March 2014 रोजी पाहिले.
 2. ^ "Awards@kaksparshthefilm.com". 30 March 2014 रोजी पाहिले.
 3. ^ "Marathi International Cinema and Theatre Awards". 4 October 2014 रोजी पाहिले.
 4. ^ "Lux fragrance deodorant presents ZEE GAURAV Awards 2013". zeetelevision.com. 30 March 2014 रोजी पाहिले.