रामभद्राचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.

जगद्गुरु रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरु आहेत.[१]

जगद्गुरु रामभद्राचार्य प्रवचन देत असतांना

ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरु रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत.[२][३][४] ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[५] तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.[६][७] हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरु रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत.[२][३][८][९] अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात.[८][१०][११] ते संस्कृत, हिन्दी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे.[१२] त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते,[९][१३][१४] व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.[१५] स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.[१६][१७][१८][१९][२०][२१]

संदर्भ[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.
 1. ^ लोक सभा, अध्यक्ष कार्यालय. "Speeches" (इंग्रजी भाषेत). मार्च ८, २०११ रोजी पाहिले. Swami Rambhadracharya, ..., is a celebrated Sanskrit scholar and educationist of great merit and achievement. ... His academic accomplishments are many and several prestigious Universities have conferred their honorary degrees on him. A polyglot, he has composed poems in many Indian languages. He has also authored about 75 books on diverse themes having a bearing on our culture, heritage, traditions and philosophy which have received appreciation. A builder of several institutions, he started the Vikalanga Vishwavidyalaya at Chitrakoot, of which he is the lifelong Chancellor. (स्वामी रामभद्राचार्य, ...., बहुमुखी प्रतिभा और उपलब्धियों के धनी एक प्रतिष्ठित संस्कृत विद्वान् और शिक्षाविद् हैं। ... आपकी अनेक शैक्षणिक उपलब्धियॉं हैं और कईं माननीय विश्वविद्यालयों ने आपको मानद उपाधियॉं प्रदान की हैं। आप एक बहुभाषाविद् हैं और आपने अनेक भारतीय भाषाओं में काव्य रचे हैं। आपने विविध विषयवस्तु वाली ७५ पुस्तकें रची हैं, जिन्होंने हमारी संस्कृति, धरोहर और परम्पराओं पर छाप छोड़ी है और जिन्हें सन्मान प्राप्त हुआ है। आपने कईं संस्थानों के साथ चित्रकूट में विकलांग विश्वविद्यालय की स्थापना की है, जिसके आप आजीवन कुलाधिपति हैं।)
 2. a b चन्द्रा, आर (सितम्बर २००८). "जीवन यात्रा". क्रान्ति भारत समाचार. लखनऊ, उत्तर प्रदेश, भारत. (११): २२-२३. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. a b अग्रवाल २०१०, पृष्ठ ११०८-१११०।
 4. ^ दिनकर २००८, पृष्ठ ३२।
 5. ^ नागर २००२, पृष्ठ ९१।
 6. ^ "The Chancellor" (अंग्रेज़ी भाषेत). जगद्गुरु रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालय. जुलाई २१, २०१० रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 7. ^ द्विवेदी, ज्ञानेन्द्र कुमार (दिसम्बर १, २००८). Analysis and Design of Algorithm (अंग्रेज़ी भाषेत). नई दिल्ली, भारत: लक्ष्मी प्रकाशन. pp. पृष्ठ x. ISBN 978-81-318-0116-1. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 8. a b "वाचस्पति पुरस्कार २००७" (PDF). के के बिड़ला प्रतिष्ठान. मार्च ८, २०११ रोजी पाहिले.
 9. a b मुखर्जी, सुतपा (मई १०, १९९९). "A Blind Sage's Vision: A Varsity For The Disabled At Chitrakoot" (अंग्रेज़ी भाषेत). नयी दिल्ली, भारत: आउटलुक. जून २१, २०११ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 10. ^ दिनकर २००८, पृष्ठ ३९।
 11. ^ "श्री जगद्गुरु रामभद्राचार्य" (अंग्रेज़ी भाषेत). औपचारिक वेबसाइट. May 10, 2011 रोजी पाहिले. आश्चर्यजनक तथ्य: अंग्रेज़ी, फ्रांसीसी और अनेक भारतीय भाषाओं सहित २२ भाषाओं का ज्ञानCS1 maint: unrecognized language (link)
 12. ^ दिनकर २००८, पृष्ठ ४०–४३।
 13. ^ प्रसाद १९९९, पृष्ठ xiv: "Acharya Giridhar Mishra is responsible for many of my interpretations of the epic. The meticulousness of his profound scholarship and his extraordinary dedication to all aspects of Rama's story have led to his recognition as one of the greatest authorities on Tulasidasa in India today ... that the Acharya's knowledge of the Ramacharitamanasa is vast and breathtaking and that he is one of those rare scholars who know the text of the epic virtually by heart." (मेरे द्वारा इस ग्रंथ के किए गए अनेकानेक अर्थों के पीछे आचार्य गिरिधर मिश्र की प्रेरणा है। उनके गहनतम पाण्डित्य का अवधान और रामायण के सभी पक्षों के प्रति उनकि विलक्षण लगन के कारण आज वे भारत में तुलसीदास पर सर्वश्रेष्ठ विशेषज्ञों में अग्रगण्य हैं। ... आचार्य का रामचरितमानस का ज्ञान व्यापक और आश्चर्यजनक हैं, और वे उन विरल विद्वानों में से हैं जिन्हें यह ग्रन्थ पूर्णतः कण्ठस्थ है।)
 14. ^ व्यास, लल्लन प्रसाद, ed. (१९९६). The Ramayana: Global View (अंग्रेज़ी भाषेत). दिल्ली, भारत: हर आनन्द प्रकाशन प्राइवेट लिमिटेड. pp. पृष्ठ ६२. ISBN 978-81-241-0244-2. ... Acharya Giridhar Mishra, a blind Tulasi scholar of uncanny critical insight, ... (आचार्य गिरिधर मिश्र, एक मीमांसक अंतर्दृष्टि से संपन्न प्रज्ञाचक्षु तुलसी विद्वान, ...)CS1 maint: extra text: authors list (link) CS1 maint: unrecognized language (link)
 15. ^ रामभद्राचार्य (ed) २००६।
 16. ^ एन बी टी न्यूज़, गाज़ियाबाद (जनवरी २१, २०११). "मन से भक्ति करो मिलेंगे राम : रामभद्राचार्य". नवभारत टाईम्स. जून २४, २०११ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 17. ^ संवाददाता, ऊना (फ़रवरी १३, २०११). "केवल गुरु भवसागर के पार पहुंचा सकता है : बाबा बाल जी महाराज". दैनिक ट्रिब्यून. जून २४, २०११ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 18. ^ संवाददाता, सीतामढ़ी (मई ५, २०११). "ज्ञान चक्षु से रामकथा का बखान करने पहुंचे रामभद्राचार्य". जागरण याहू. जून २४, २०११ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 19. ^ संवाददाता, ऋषिकेश (जून ७, २०११). "दु:ख और विपत्ति में धैर्य न खोएं". जागरण याहू. जून २४, २०११ रोजी पाहिले. प्रख्यात राम कथावाचक स्वामी रामभद्राचार्य महाराज ने कहा की ...
 20. ^ "सिंगापुर में भोजपुरी के अलख जगावत कार्यक्रम" (भोजपुरी भाषेत). Anjoria. जून २६, २०११. जून ३०, २०११ रोजी पाहिले. श्री लक्ष्मी नारायण मन्दिर में सुप्रसिद्ध मानस मर्मज्ञ जगतगुरु रामभद्राचार्य जी राकेश के मानपत्र देके सन्मानित कइले।
 21. ^ "रामभद्राचार्य जी" (अंग्रेज़ी भाषेत). सनातन टीवी. May 10, 2011 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)


बाह्य दुवे[संपादन]


Broom icon.svg
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. नेहमी होणाऱ्या चुकांबद्दल या पानावर माहिती आहे. या संबंधी अधिक चर्चा करायची असल्यास अथवा काही शंका/ प्रश्न असल्यास कृपया चर्चापान वापरावे.