Jump to content

पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र सरकारतर्फे भरणारे पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन २ व ३ ऑक्टोबर २०१२ रोजी पुण्यात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट होते. संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ’महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देण्यात आले. संस्थेसाठी पुरस्काराची रक्कम ३० हजार रुपये तर वैयक्तिक पुरस्काराची रु.१५ हजार इतकी होती.

संमेलनाला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. कल्याण गंगवाल, संमोहनतज्‍ज्ञ नवनाथ गायकवाड वगैरे उपस्थित होते.

पुरस्कार मिळालेल्या ३० व्यक्ती आणि १९ संस्था

[संपादन]
व्यक्ती

अलका मुंजाळ (राक्षेवाडी, जि.पुणे), केसरीनाथ पाटील (मुंबई), जगन्नाथ पाटील (अक्कलकोप, जि. सांगली), साहित्यिक जेलसिंग पावरा (शहादा, जि. नंदुरबार), तुकाराम पवार (कुरुंदवाड, जि. कोल्हापूर), दीपक निकम (पुणे), शाहीर देवानंद माळी (मिरज, जि. सांगली), पंढरीनाथ खर्डेकर (लोही, जि. यवतमाळ), डॉ. बाळासाहेब कुमार (जळगाव), बाळासाहेब केदार, लेखक भाऊसाहेब येवले (त्रिमूर्तीनगर, जि. अहमदनगर), मारोतराव खैरकर (नेहरोली, जि. ठाणे),मोहन मसकर पाटील (शाहूनगर, गोंडाली, जि. सातारा), रघुनाथ देशमुख (जव्हार, जि. ठाणे), प्रा. डॉ. राजकुमार म्हस्के (जालना), रामकृष्ण दिग्रजकर (जव्हार, जि. ठाणे), राही भिडे (मुख्य संपादक, दै. पुण्यनगरी पुणे), डॉ. लियाकत रहेमानखान पठाण (परभणी), लोकनाटककार विनोद ढगे (जळगाव), विकास वैद्य (नागपूर), विलास चंदणे (औरंगाबाद), विलास ऊर्फ रमेश जवळ (जवळवाडी, जि. सातारा), डॉ. व्ही. व्ही. घाणेकर (पुणे), शांताबाई मुळुक (चाकसमान, जि. पुणे), संजय बुटले (चंद्रपूर), संतोष वळसे (मंचर, जि. पुणे), डॉ. संजय शिंदे (पोलीस उपायुक्त, पुणे), संतोष शेळके (शिरपूर, जि. बुलढाणा), सदाशिवराव देवरे (म्हसदी, जि. धुळे), सुरेश जाधव (अंबड, जि. नाशिक), ज्ञानोबा देवकाते (सहायक पोलीस निरीक्षक बिटरगाव, जि. यवतमाळ).

संस्था पुरस्कार विजेते

अल्कोहोलिक ॲनॉनिमस(मुंबई), आकाशवाणी(मुंबई), इंडियन एक्सप्रेस(मुंबई), ए.बी.पी. माझा(मुंबई), कॉकलिया संस्था(पुणे), दैनिक नवभारत(नागपूर), नशाबंदी मंडळ(मुंबई), नांदेड विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, पुण्यनगरी, सहकारी शिक्षण विकास समूहाचे मराठा हायस्कूल(मुंबई), मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र(पुणे), मैत्री व्यसनमुक्ती केंद्र, (नागपूर), वर्ल्ड स्पिरिच्युअल ट्रस्ट(मुंबई), विनटेल प्रायव्हेट लिमिटेड(जितेंद्र पंडित-पुणे), श्रमिक एल्गार (श्रीमती परिणीता गोस्वामी-चंद्रपूर), सन सिक्युरिटीज (कर्नल मागो), पुणे.

यानंतरची व्यसनमुक्ती साहित्य संमेलने

[संपादन]


पहा : साहित्य संमेलने