राणी बंग
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
अभय बंग यांच्या सुविद्य पत्नी. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव डॉ. राणी चारी आहे. त्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील असून, त्यांचे वडील प्रसिद्ध डॉक्टर होते.
शिक्षण व कार्य
[संपादन]डॉ. राणी यांनी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे पती प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विवाहबद्ध होऊन समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी स्त्रीरोगशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापिठातून ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी १९८४ साली मिळवली.
साहित्य
[संपादन]त्यांनी, आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याविषयक समस्या व त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारी "कानोसा" व "गोईण" ही दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह "महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गोईण
[संपादन]'गोईण' म्हणजे मैत्रीण. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींशी गप्पागोष्टी करतांना जंगलातील झाडे, त्यांचे विविध उपयोग - खाद्यपदार्थ, औषधी, सरपण, कुंपण वगैरेंबाबतची उपयुक्त व मनोरंजक माहिती मिळत गेली, तिनी ही संकलित केलेली आहे.
कानोसा
[संपादन]भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ.राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दोन खेड्यांमधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने त्यांचेजवळ बोलल्या आहेत.
पुरस्कार
[संपादन]डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
- २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
- २०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- खरेखुरे आयडॉल्स (लेखसंग्रह), युनिक फीचर्स, २००६, संपादक सुहास कुलकर्णी, ' डॉ. अभय - डॉ. राणी बंग', लेखक श्रुती पानसे, पाने ११ ते १९