इराण–इराक युद्ध
दिनांक | २२ सप्टेंबर, १९८० — २० ऑगस्ट, १९८८ |
---|---|
स्थान | इराण-इराक सीमा |
परिणती | युद्ध बरोबरी |
युद्धमान पक्ष | |
---|---|
![]() पाठिंबा: ![]() |
![]() पाठिंबा: ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
सेनापती | |
रुहोल्ला खोमेनी | सद्दाम हुसेन |
सैन्यबळ | |
१.५ लाख | ३.५ लाख |

इराण–इराक युद्ध इ.स. १९८० ते १९८८ दरम्यान पश्चिम आशियातील इराण व इराक देशांदरम्यान लढले गेले. आठ वर्षे चाललेले हे युद्ध २०व्या शतकामधील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात रक्तरंजित युद्ध मानले जाते.
ह्या युद्धापूर्वी अनेक वर्षे इराण व इराकदरम्यान सीमातंटा सुरू होता. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर इराकचा राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन ह्याला इराकमधील बहुसंख्य शिया जनता बंडखोरी करेल ही धास्ती वाटू लागली. २२ सप्टेंबर १९८० रोजी कोणत्याही पूर्वसूचनेविना इराकने इराणवर हवाई हल्ला केला. सुरूवातीस पीछेहाट झाल्यानंतर इराणने नेटाने लढा दिला व जून १९८२ मध्ये इराणने गमावलेला सर्व भूभाग परत मिळवला. त्यानंतरची ६ वर्षे युद्धात इराणचा वरचष्मा होता. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने वारंवार युद्धबंदीचे आवाहन केल्यानंतर अखेरीस २० ऑगस्ट १९८८ रोजी लढाई थांबली.
ह्या युद्धामध्ये दोन्ही देशांचे अतोनात नुकसान व जिवितहानी झाली परंतु सीमास्थिती बदलली नाही.
बाह्य दुवे[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ Iran and Syria| Jubin Goodarzi
- ^ Metz, Helen Chapin, ed. (1988), "The Soviet Union", Iraq: a Country Study, Library of Congress
- ^ Metz, Helen Chapin, ed. (1988), "Arms from The Soviet Union", Iraq: a Country Study, Library of Congress
- ^ Anthony, John Duke; Ochsenwald, William L.; Crystal, Jill Ann. "Kuwait". Encyclopædia Britannica.