शिक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पदव्युत्तर अभ्यासक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)


प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती[संपादन]

मनुष्याच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यकर्मावर हिंदू समाजात धर्माचा पगडा बराच बसला आहे असे दिसून येते.शिक्षण विषयक संस्कारात कालानुक्रमे विद्यारंभ किंवा अक्षरस्वीकरण हा संस्कार सर्वात आद्य होय. पाचव्या वर्षी प्राथमिक शिक्षणाचा प्रारंभ होवून मुले अक्षरे शिकू लागत त्यावेळी हा संस्कार करण्यात येत असे.त्यांनतर आठव्या वर्षी उपनयन संस्कार केला जात असे. ज्यामुळे गुरूगृही राहून पुढील शिक्षण घेण्याची परवानगी विद्यार्थ्याला मिळत असे. वैदिक काळात मुलींचे उपनयन होवून त्या ही गुरूगृही राहून अध्ययन पूर्ण करीत असत. वेदांचे अध्ययन संपवून ब्रह्मचारी गुरुगृहाहून स्वगृही परत जाण्याला निघाला म्हणजे समावर्तन संस्कार करण्यात येई.

गुरूंचे महत्व[संपादन]

हिंदू शिक्षण पद्धतीत गुरूंचे महत्व विशेष मानले आहे.गुरु हा शिष्याचा आध्यात्मिक पिता मानला गेला असल्याने आई व वडील यांच्यापेक्षा गुरूंचे स्थान शिष्याच्या आयुष्यात महत्वाचे ठरत असे.अति प्राचीन काळी लेखन कला अस्तित्वात नसताना गुरुच्या मुखातून आलेले ज्ञान ग्रहण केले जात असे.बौद्ध संघामध्ये भिक्षु लोक शिष्यांची मुलांप्रमाणे सर्व व्यवस्था करीत असत. केवळ अध्यापन एवढाच गुरुचा कार्यभाग नसून व्यक्तिगत आरोग्याची काळजी कशी घ्यावी येथपर्यंतचे विषय गुरु शिष्यांना समजावून सांगत असत.

अभ्यासाचे विषय[संपादन]

  • १.वेदकालाचा पूर्वार्ध-

या कालखंडात वैदिक मंत्र,इतिहास,यज्ञकर्म,भूमितीज्योतिष या वैदिक पद्धती जपण्यासाठी आवश्यक विषयांचे अध्यापन प्रामुख्याने केले जाई.

  • २. वेद्कालाचा उत्तरार्ध व ब्राह्मण काल-

नाराशंसी गाथा,मंत्रार्थ समजून घेणे ,इतिहास छन्दशास्त्र हे विषय शिकविले जात.व्याकरणशास्त्र उदयाला आल्यानंतर त्याचाही अभ्यास सुरु झालेला दिसतो.

वेदविद्या,धनुर्वेद,आयुर्वेद,कायदा,ज्योतिष,नर्तन,वादन,चित्रकला वास्तुशास्त्र हे विषय शिकविले जात. काळानुसार उद्योग आणि भौतिक कला यांचा विकास झाल्याने शिक्षणातही धर्मशास्त्र,न्याय वेदांत या शात्रांचा समावेशही होऊ लागला. बौद्ध हिंदू व जैन अभ्यासकात शास्त्रचर्चा होत असल्याने या धामातील साहित्याचा अभ्यासही विद्यार्थी करीत असत.

या काळात वैदिक मान्तांचा अर्थ समजावून घेण्याची प्रवृत्ती कमी होत चालली त्यामुळे तत्कालीन शिक्षणतज्ज्ञ त्याविषयी आग्रही होते.वेदार्थ संशोधनाकडे यांकालात कमी लक्ष दिले गेले. साहित्य, धर्मशास्त्र ,काव्य यांचा अभ्यास करण्याकडे कल वाढला. पाणिनीची सूत्रे,अष्टधातू,गणित,उणादी सूत्रे या काळत मुलांना नवव्या वर्षी साधारणपणे शिकवीत असत असे इत्सिंग याच्या वर्णनातून दिसते.( पृ. ७४)[१]

पूर्व प्राथमिक शिक्षण[संपादन]

प्राथमिक शिक्षणाअगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने ५ वर्षांखालील बालकांना दिले जाते.

प्राथमिक[संपादन]

शाळेच्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणून ओळखले जाते. हे सरकारी शाळांमध्ये मूलभूत अधिकाराअंतर्गत समाजातील सर्व विद्यार्थ्याना मोफत मिळू शकते.

माध्यमिक[संपादन]

इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या शालेय शिक्षणास माध्यमिक शिक्षण म्हणतात. हे १२ ते १६ वयापर्यंतच्या मुलांना दिले जाते.

==उच्चमाध्यमिक== 11 to 12

== पदवी == बी.ए.बी.कॉम.बी.एस्सी.बी.ई. ई. प्रकारचे शिक्षण हे बारावी नंतर दिले जाते. हे शिक्षण महाविद्यालात दिले जाते.

==पदव्युत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

economics अन्न,वस्र, निवारा याप्रमाणे शिक्षण हीसुद्धा माणसाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. जगातील प्रचंड ज्ञान आत्मसात करण्यासठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.

  1. डाॅॅ.अळतेकर सदाशिव अनंत ,प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती,सुविचार प्रकाशन मंडळ,१९३५