चर्चा:शिक्षण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकी मानकांप्रमाणे हा लेख अद्ययावत करण्यास सुरूवात केली आहे. त्लामुळे साचा लावीत आहे.आर्या जोशी (चर्चा)

@अभय नातू आणि V.narsikar: नमस्कार! हा लेख अधिक सविस्तर होणार आहे तर मग प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती असा स्वतंंत्र लेख करून त्याचा दुवा शिक्षण या लेखाला जोडावा का? हा लेख सविस्तर झालेला चालणार असेल तर प्राचीन शिक्षण विषयक भाग यातच आहे तसा ठेवता येईल.मार्गदर्शन करावे.आर्या जोशी (चर्चा)

तसेही करता येईल. पण तो किती मोठा राहणार आहे यावर अवलंबून आहे. माझे मते या मुख्य लेखातील उपमथळ्यांचे/विभागांचे स्वतंत्र लेख बनवावेत व त्याची त्रोटक माहिती या लेखात टाकून, त्याचे एकत्रिकरण मग या लेखात करावे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था#उपग्रह प्रक्षेपण यान हा लेख व त्याखालील विभाग उदाहरणार्थ बघावेत. अभय नातूंचे यावर मत काय आहे तेही लक्षात घ्यावे.लेखनास शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:०५, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]
@आर्या जोशी आणि V.narsikar:
लेखातील विभागांची रचना बदलली आहे.
काही सुचनावजा विनंत्या
१. लेख हा हायरआर्किकल असावा. विषय एकमेकांत मिसळू नये, उदा- बौद्ध, वैदिक, आधुनिक, मध्यकालीन असे विभाग केल्यास त्यांची कालखंडानुसार (जुने ते नवीन) अशा क्रमवारीने लिहावे.
१.१ प्रत्येक विभागात शक्यतो तेच उपविभाग करावे. शिक्षणाच्या पायऱ्या (वयानुसार, ज्ञानानुसार, इ.), शिक्षण देण्याची पद्धती. असे केल्याने वेगवेगळ्या पद्धतींमधील फरक व समानता लगेच कळून येते.
२. हा लेख भारतीय शिक्षणपद्धतीवर असल्यास शीर्षक बदलावे. जर सर्वसमावेशक असल्यास इतर देश/प्रदेशांचे विभाग करावे.
३. एखाद्या विभागात दोन-तीन उताऱ्यांपेक्षा (पॅरॅग्राफ) अधिक मजकूर असल्यास वेगळा लेख करावा. त्याबद्दलच्या माहितीचा गोषवारा मुख्य लेखात ठेवून विभागात नवीन लेखाचा दुवा द्यावा. यासाठी साचा:मुख्य लेख वापरावा.
४. उपविभाग करताना शक्यतो चार पायऱ्यांपेक्षा अधिक जाऊ नये. अशी रचना योग्य वाटत असल्यास त्या विभागाचा वेगळा लेख करावा.
५. लेख असताना अधूनमधून समीक्षण करावे (आत्ता केले आहे तसेच.) लेख संपेपर्यंत थांबल्यास पुनर्रचना करणे किचकट होते.
६. लेखात माहिती घालीत असताना चुकीचे असे काहीच नसते. थोडे बदल केल्यास लेख अधिक वाचनीय आणि उपयुक्त होतो इतकेच. तरी रचना, विभाग, इ.मध्ये अडकून न पडता तुमच्याकडील माहिती घालावी. बदल करण्यास इतर सदस्य मदत करतीलच.
अभय नातू (चर्चा) २०:४१, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]
नोंद घेतली.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:४६, १८ जानेवारी २०१८ (IST)[reply]


@अभय नातू आणि V.narsikar:

उभयतांंना धन्यवाद!आर्या जोशी (चर्चा)