निमसोड (कडेगाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निमसोड हे सांगली (महाराष्ट्र्) , कडेगांव तालुक्यातील एक लहान खेडेगांव आहे. गावची लोकसंख्या अंदाजे २००० - २१०० पर्यंत असुन मतदार १४५० इतके आहे. निमसोड हे गांव जिल्हाठिकणापासुन ८० कि.मि. आहे तर तालुक्यापासुन ३.५ कि.मी. आहे. गांवचे भौगोलिक क्षेत्र ३८४ हेक्टर असुन ९०% क्षेत्र बागायती आहे. गावचे मुख्य पिक ऊस असुन आले हे पिकसुध्दा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते .त्याचबरोबर सोयाबिन,भुईमुग,ज्वारी,गहु, हरबरा, मुग, उडीद, इ. पिकेही घेतली जातात.

गावापासुन तालुका ठिकाण जवळ असलेने गावचे खरेदी-विक्री व्यवहार कडेगांव येथे होतात. गावामध्ये दोन अंगणवाडी असुन एक इ.७ वीपर्यंत मराठी माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी कडेगांव , कराड किंवा विटा या शहरांमध्ये जावे लागते. शाळेला जिल्हा परिषदेचा स्वच्छ-सुन्दर शाळा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. दोन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. आपटे गुरुजी व श्री.मंगेश बणसोडे गुरुजी यांना मिळाला आहे.

गावामध्ये ग्रामपंचायत आहे. त्याची स्थापना सन १९५६ साली झाली.गावचे पहिले सरपंच होण्याचा बहुमान श्री. गणपती मारुती मुळिक यांना मिळाला.तसेच गावच्या शेतीविकासासाठी सहकारी विकास सोसायटी स्थापना केलेली आहे.