नवाजुद्दीन सिद्दिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नवाजुद्दीन सिद्दिकी
जन्म १९ मे, १९७४ (1974-05-19) (वय: ४७)
बुढाना, मुझफ्फरनगर जिल्हा, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९९९ - चालू

नवाजुद्दीन सिद्दिकी (जन्म: १९ मे १९७४) हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या सिद्दिकीने 2019च्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे या सिनेमात स्वतः बाळासाहेबांची भूमिका केली आहे. १९९९ सालच्या सरफरोश चित्रपटात एक छोटी भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शूल, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., आजा नचले, न्यू योर्क इत्यादी चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्या सिद्दिकीला २०१२ साली विद्या बालन अभिनीत कहानी ह्या चित्र्पटातील भूमिकेसाठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर गॅंग्ज ऑफ वासेपूर, तलाश इत्यादी चित्रपटांत त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. तलाशमधील भूमिकेसाठी त्याला झी सिने पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार इत्यादींमध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. प्रशांत भार्गव यांनी दिग्दर्शन केलेल्या 'पतंग' (2011) या चित्रपटात नवाजुद्दीन याने त्याची प्रथम प्रमुख भूमिका साकारली.

२०१३ सालच्या द लंचबॉक्स साठी सिद्दिकीला फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. २०१५ मधील बजरंगी भाईजान, बदलापूर ह्या चित्रपटांद्वारे सिद्दिकीची प्रसिद्धी अजूनच वाढली.

बाह्य दुवे[संपादन]