Jump to content

धूळपाटी/महाराष्ट्रातील विद्यापीठ ग्रंथालयांचा आढावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रातील विद्यापीठ व ग्रंथलाया बद्दल माहितीचा शोध घेतला आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा  इ.स. १८५७  पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली.

महाराष्ट्रात एकूण २३ राज्य विद्यापीठ (स्टेट युनिव्हर्सिटी) आहेत. त्याचे ११-सामान्य (१-महिलांसाठी), ४-कृषी, ३-विधी, १-वैद्यकीय, १-तंत्रज्ञान, १-पशु व मत्स्यविज्ञान, १-मुक्त व १-संस्कृत असे वर्गीकरण करण्यात येईल. जे विद्यापीठ महाराष्ट्र शासनांतर्गत येते त्या विद्यापीठाला राज्य विद्यापीठ म्हणतात. प्रत्येक राज्य विद्यापीठाचे कुलगुरू हे त्या राज्याचे माननीय राज्यपाल असतात. अभिमत विद्यापीठ (२१)  मुंबई विद्यापीठ हे सगळ्यात जुने विद्यापीठ आहे.

महाराष्ट्रातील राज्य विद्यापीठे :

अ. सामान्य विद्यापीठ (११) :

·        डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. (१९५८)</ref https://mr.wikipedia.org/s/6vn2>

·        स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. (१९९५))</ref https://mr.wikipedia.org/s/6vn3> ·        मुंबई विद्यापीठ, मुंबई. (१८५७)

·        एस.एन.डी.टी. (श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी) महिला विद्यापीठ, मुंबई. (१९१६)

·        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. (१९२३)

·        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. (१९४९)

·        शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. (१९६२)

·        संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. (१९८३)

·        कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (१९९१)

·        सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. (२००४)

·        गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली. (२०११)

आ . कृषी विद्यापीठ (४) :

·        महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि-अहमदनगर. (१९६८)

·        डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला. (१९६९)

·        वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (१९७२)

·        डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि-रत्‍नागिरी. (१९७२)

इ.   विधी विद्यापीठ (३) :

·        महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई (२०१४)

·        महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर. (२०१५)

·        महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद. (२०१७)

ई .  वैद्यकीय विद्यापीठ (१) :

·        महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक. (२०००)

उ - पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (१) :

·        महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर. (२००२)

ऊ- तंत्रज्ञान विद्यापीठ (१) :

·        डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोनेरे, जि-रायगड. (१९८९)

ए- संस्कृत विद्यापीठ (१) :

·        कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, जि-नागपूर. (१९९७)

ऐ- मुक्त विद्यापीठ (१) :

·        यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. (१९९०)


क . अभिमत विद्यापीठ (२१)

राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.

महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत.

यूजीसी 1956 च्या कायदा अंतर्गत उच्च शिक्षणाच्या संस्था ज्यांना विद्यापीठे म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशी अभिमत विद्यापीठे. ( 16 नोव्हेंबर 2022 रोजी अभिमत विद्यापीठची एकत्रित खलील यादीतिल विद्यापीठा आहेत ) 

·       टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

·       गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे

·       डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे

·       प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे

·       डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, पुणे

·       भारती विद्यापीठ, पुणे

·       सिंबायोसिस इंटरनॅशनल, पुणे

·       टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई

·       टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई

·       होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई

·       आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था, मुंबई

·       इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई

·       रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई

·       नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था, मुंबई

·       एम.जी.एम. आरोग्य विज्ञान संस्था, कामोठे, मुंबई

·       पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विदयापीठ, मुंबई

·       केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था, मुंबई

·       दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साय, वर्धा

·       कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था, सातारा

·       प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था, राहता, जिल्हा अहमदनगर

·       डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी, कसबा बावडा, जिल्हा कोल्हापूर

ख. केंद्रीय विद्यापीठ (१)

·       महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा