भारत राष्ट्र समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तेलंगणा राष्ट्र समिती या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत राष्ट्र समितीचा ध्वज

भारत राष्ट्र समिती पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती (तेलुगू: తెలంగాణ రాష్ట్ర సమితి)(abbr. TRS) म्हणून ओळखली जात होती, हा भारत देशाच्या तेलंगणा राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्षतेलंगणा विधानसभेतील सत्ताधारी पक्ष आहे. तेलंगणा हे आंध्र प्रदेशमधून फोडून वेगळे राज्य बनवण्यात यावे ही भूमिका घेऊन तेलुगू देशम पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव ह्यांनी २००१ साली तेलुगू देशममधून बाहेर पडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली.

२०१४ साली भारत सरकारने तेलंगणाला स्वतंत्र राज्य बनवण्याचा निर्णय घेतला व २ जून २०१४ रोजी नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात आले. २०१४ लोकसभा निवडणुकांसोबतच घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने ११९ पैकी ९० जागा जिंकून बहुमत मिळवले. के. चंद्रशेखर राव हे २ जून २०१४ रोजी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले.

५ ऑक्टोबर २०२२ रोजी पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]