Jump to content

झोजी ला बोगदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झोजी ला बोगदा
Overview
स्थान झोजी ला, लडाख, भारत
भौगोलिक समन्वय प्रणाली 34°16′44″N 75°28′19″E / 34.27889°N 75.47194°E / 34.27889; 75.47194गुणक: 34°16′44″N 75°28′19″E / 34.27889°N 75.47194°E / 34.27889; 75.47194
स्थिती बांधकाम सुरू आहे
मार्ग NH1
Operation
काम सुरू झाले १५ ऑक्टोबर २०२०
ऑपरेटर राष्ट्रीय राजमार्ग आणि अवसंरचना विकास महामंडळ
बोगद्यातील रहदारीचा प्रकार मोटार वाहने
Technical
लेनची संख्या २ (प्रत्येक दिशेला एक)
श्रीनगर कडून येणारा झोजीला मार्ग

झोजीला बोगदा हा हिमालयात भारतीय केंद्रशासित प्रदेश लडाख मध्ये कारगिल जिल्ह्यातील सोनमर्ग आणि द्रास दरम्यान झोजी ला खिंडीत असलेला १४.२ किमी लांबीचा बोगदा आहे. या रस्त्याचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले असून पूर्ण होण्यास सुमारे ५-७ वर्षे अपेक्षित आहेत .[] ६.५ किमी लांब झेड-मोर्ह बोगद्यासह (झोजीला बोगद्या पासून श्रीनागरच्या दिशेने २२ किमी अंतरावर आहे) [] हा बोगदा श्रीनगर आणि कारगिल दरम्यान वर्षभर अखंडित सेवा सुनिश्चित करेल जी सध्या ३,५२८ मी (११,५७८ फूट)च्या उंचीवर असलेल्या झोजीला खिंडीत बर्फवृष्टीमुळे सुमारे सात महिने बंद असते. झोजी ला सोनमर्गपासून १५ कि.मी. अंतरावर आहे आणि लडाखमधील द्रास आणि कारगिल सोबत जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा आहे परंतु हिवाळ्यात ६-७ महिने (नोव्हेंबर ते मे) हिमवृष्टी आणि हिम अवधावामुळे बंद राहतो.

हि खिंड पार करण्यास ३ तासांहून अधिक वेळ लागतो परंतु बोगद्यामुळे हा वेळ कमी होईल. हा बोगदा लष्कराची आणि लडाखी जनतेची रणनीतिक गरज होती कारण हा मार्ग नियंत्रण रेषे जवळ असून शत्रूंकडून प्रतिकूल कृतींमुळे असुरक्षित आहे. १९४७-४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात ऑपरेशन बायसन अंतर्गत झोजीला पुन्हा पाकिस्तानी हल्लेखोरांकडून पकडण्यात आले.[]

झोजीला बोगद्याच्या प्रकल्पाला जानेवारी २०१८ मध्ये भारत सरकारने मंजूरी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मे २०१८ मध्ये बोगद्याचे बांधकाम सुरू झाले.[] बोगदा ईपीसी मोड (अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम) अंतर्गत बांधला जाईल ज्यामध्ये भारत सरकार पैसे प्रदान करेल आणि कार्यकारी एजन्सी बांधकाम करेल आणि नंतर प्रकल्प भारत सरकारला देईल. पूर्वी हे पीपीपी मोडमध्ये बांधले जायचे होते जेथे खाजगी पक्ष गुंतवणूक करून नंतर टोल मार्गे वसूल करायचे होते पण २०१३ पासून पाच वेळा प्रयत्न केल्यावरही एका वेळी एकच बोली लावली गेली आणि इतर वेळी केवळ एका खासगी पक्षाने स्वारस्य दाखवले. प्रत्येक वेळी बोली रद्द केली गेली.[]

वैशिष्ट्ये

[संपादन]
  • त्याच्या बांधकामाचा कालावधी पाच वर्षांचा असेल कारण अतिशय कठीण भूभागावर काही भागात तापमान -४५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
  • या प्रकल्पात १४.२ किमी लांब दोन-पदरी द्वि-दिशात्मक बोगदा आणि त्याला समांतर एक निर्गम १४.२ कि.मी. बोगदा बांधण्यात येईल. पश्चिम प्रवेश सोनमर्गच्या जवळपास १५ किमी पूर्वेस, बालटाल येथे सुमारे ३००० मी उंचीवर आहे (विद्यमान महामार्गाच्या उंचीपेक्षा सुमारे ४०० मी कमी उंचीवर). पूर्व प्रवेशद्वार द्रास आणि कारगिलच्या दिशेने झोजीला नंतर मीनामार्ग येथे असेल. बोगद्याच्या लांबीमध्ये विद्यमान महामार्गापासून बोगद्याच्या दोन्ही टोकापर्यंत जाणाऱ्या रस्ताांच्या लांबीचा समावेश नाही.
  • स्मार्ट बोगदा म्हणून नियोजित यामध्ये पूर्णपणे ट्रान्सव्हर्स वेंटिलेशन सिस्टम, अखंडित वीजपुरवठा, आपत्कालीन प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, व्हेरिएबल मेसेज चिन्हे, ट्रॅफिक लॉगींग उपकरणे आणि बोगदा रेडिओ सिस्टम अशी नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्ये असतील.
  • सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये प्रत्येक १२५ मीटर अंतरावर आपत्कालीन टेलिफोन आणि अग्निशामक कॅबिनेट, दर २५० मीटरवर पादचारी मार्ग आणि प्रत्येक ७५० मीटरवर मोटारयोग्य क्रॉस पॅसेजेस आणि ले-बाय समाविष्ट असतील.
  • प्रकल्पाची नागरी बांधकाम किंमत ४,९०० कोटी आहे . प्रकल्पाची एकूण भांडवली किंमत ₹६,८००कोटी आहे. त्यामध्ये जमीन, पुनर्वसन व पुनर्वसन व इतर बांधकाम-पूर्वीच्या कामांचा खर्च तसेच बोगद्याची देखभाल व कामकाजाचा खर्च चार वर्षांचा आहे.
  • पूर्वी कारगिल क्षेत्रात घुसखोरी व युद्धाच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर झोजीला खिंड ओलांडून हिवाळ्यादरम्यान संरक्षण दलांना सीमा चौकटींना पुरवठा करण्यास कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. झोजीला बोगदा हा महामार्ग वर्षभर सक्रिय ठेवण्यास मदत करेल.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Parveen, Rahiba R. (19 May 2018). "Zoji-La tunnel will be a boon for the armed forces and for tourists too". The Print. India. 18 December 2020 रोजी पाहिले.
  2. ^ Ali, Muddasir (27 March 2014). "Work on 6.5 km Z-Morh tunnel to begin this year". Greater Kashmir News. 6 June 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Zojila battle of 1948 — when Indians surprised Pakistan with tanks at 11,553 ft,". The Print. 23 January 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "PM Modi inaugurates Zojila project in Leh: All you need to know about India's longest tunnel". 19 May 2018. 23 December 2018 रोजी पाहिले.
  5. ^ "Work On Zojila Pass Tunnel In J&K To Commence On August 15, NHIDCL Says". Bloombergquint.com. 6 June 2017 रोजी पाहिले.