नियंत्रण रेषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
काश्मीर प्रदेशाचा विस्तृत नकाशा. केशरी रंगाने दाखवलेला भूभाग भारताचे जम्मू आणि काश्मीर राज्य आहे, हिरव्या रंगाने दर्शवलेला प्रदेश पाकिस्तानचे गिलगिट-बाल्टिस्तानपाकव्याप्त काश्मीर हे विभाग आहेत तर तिरक्या रेषांनी दर्शवलेला भूभाग पाकिस्तानने चीनला सुपुर्त केला आहे. अक्साई चिन हा चीनच्या नियंत्रणाखालील प्रदेश नियंत्रण रेषेद्वारे आखला गेला नाही आहे.

नियंत्रण रेषा (Line of Control) ही भारतपाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे.

नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे लष्कर मोठ्या संख्येने तैनात असून येथे सतत चकमकी चालू असतात. पाकिस्तान सरकारने नियंत्रण रेषेचा भारतात अतिरेकी घुसवण्यासाठी अनेकदा वापर केला आहे. त्यामुळे ह्या नियंत्रण रेषेच्या एकूण ७४० किमी लांबीपैकी भारताने सुमारे ५५० किमी भागात कुंपण उभारले आहे. अतिरेकी व हत्यारे भारतात पाठवण्याच्या पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उभारल्या गेलेल्या ह्या कुंपणाला युरोपियन संघाने पाठिंबा दिला आहे.

हेही पहा[संपादन]