Jump to content

जॉर्ज क्लूनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज क्लूनी
जन्म ६ मे, १९६१ (1961-05-06) (वय: ६३)
लेक्सिंग्टन, केंटकी
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७८ - चालू
पत्नी अमाल अलामुद्दीन

जॉर्ज टिमोथी क्लूनी (George Timothy Clooney; ६ मे १९६१) हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. क्लूनीला आजवर दोन वेळा ऑस्कर पुरस्कार तर तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

१९७८ सालापासून दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत असलेल्या क्लूनीला ई.आर. ह्या १९९४ ते १९९९ दरम्यान चाललेल्या मालिकेमधील भूमिकेसाठी दोन वेळा एमी पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. १९८६ सालच्या कॉम्बॅट अकॅडमी नावाच्या चित्रपटाद्वारे त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००१ सालच्या प्रसिद्ध ओशन्स इलेव्हन चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका होती. २००५ सालच्या सीरियाना चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम सहय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तर २०१३ मधील आर्गो चित्रपटासाठी त्याला बेन ॲफ्लेक व ग्रॅंट हेस्लोसोबत सर्वोत्तम निर्मात्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

अभिनयासोबत क्लूनी त्याच्या परोपकारी स्वभावासाठी देखील ओळखला जातो. २००८ सालापासून सुदानमध्ये चालू असलेले दार्फुरचे शिरकाण थांबवण्याचा क्लूनीने प्रयत्न केला. ह्याबद्दल त्याने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तसेच इतर अनेक जागतिक नेत्यांना मदतीची विनंती केली.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: