दार्फुरचे शिरकाण
Jump to navigation
Jump to search
दार्फुरचे शिरकाण सुदान देशातील दार्फुर प्रांतामध्ये फेब्रुवारी २००३ साली सुरू झाले व अद्याप सुरू आहे. फेब्रुवारी २००३ मध्ये सुदान लष्कराने व सुदान सरकारचा पाठिंबा असलेल्या जंजावीड व इतर इस्लामिक अतिरेक्यांनी दार्फुरच्या गरीब आफ्रिकन गावांवर सशस्त्र हल्ले करण्यास सुरुवात केली. ह्या हल्ल्यांचे उद्दिष्ट दार्फुरमधील सुदान सरकारविरोधी बंडखोर गटांचा नायनाट करणे हे होते. आत्तापर्यंत दार्फुरमधील ह्या हत्याकांडात हजारो आफ्रिकन स्त्रीयांवर बलात्कार झाले आहेत व अंदाजे ५ लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोणत्याही स्वरुपातील आंतरराष्ट्रीय प्रतिसादाचा अभाव हे ह्या हत्याकांडाच्या अद्याप चालू राहण्यामागचे मुख्य कारण मानले जाते. संयुक्त राष्ट्रसंघ दार्फुरमधील हत्याकांडाविरुद्ध लष्करी कारवाई करण्यास अथवा सुदान सरकारवर दबाव आणण्यास अपयशी ठरला आहे.