Jump to content

जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल
मैदान माहिती
स्थान रांची, झारखंड
स्थापना २०१०
आसनक्षमता ५०,००० [][]
मालक झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन
आर्किटेक्ट कोठारी असोसिएट्स प्रा. लि.
प्रचालक झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन
यजमान भारतीय क्रिकेट संघ
झारखंड क्रिकेट संघ
चेन्नई सुपर किंग्स

आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. १६-२० मार्च २०१७:
भारत  वि. ऑस्ट्रेलिया
प्रथम ए.सा. १९ जानेवारी २०१३:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. २६ ऑक्टोबर २०१६:
भारत वि. न्यूझीलंड
एकमेव २०-२० १२ फेब्रुवारी २०१६:
भारत वि. श्रीलंका
शेवटचा बदल २१ मार्च, २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

भारताच्या पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान,[] हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते.

झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघांचे हे होम ग्राऊंड आहे. जानेवारी २०१३ मध्ये ह्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.[] हे मैदान भारताच्या सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे.[]

इतिहास

[संपादन]

आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वाटप आणि कीनाम मैदानावर आयोजित सामने, यासंदर्भात टाटा स्टील सोबत असलेल्या वादामुळे रांची मध्ये नवीन क्रिकेट मैदान बनवण्याच्या निर्णय जेएससीएने घेतला.

हा वाद तेव्हा उत्पन्न झाला जेव्हा, भारत आणि इंग्लंड दरम्यानचे सामने बंगळूरला हलविण्यात आले आणि जेएससीएने नमुद केले की त्यांना टाटा स्टील कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ह्यानंतर जेएससीएने निर्णय घेतला की नव्या मैदानाची गरज आहे. जेएससीए मैदानाचे बांधकाम राम क्रिपाल सिंग कन्स्ट्रक्शन प्रा लि, रांची यांनी केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पूर्ण सदस्य असल्याने ते राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करतत, पण त्यांच्या मालकीचे कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही, आणि एकमेव कीनान मैदान,[] जमशेदपूर हे टाटा स्टीलच्या मालकीचे आहे. त्यामुळे झारखंडची राजधानी रांची येथे स्वतःचे नवे आंतरराष्ट्रीय मैदान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

बांधकामादरम्यान मुख्य मैदान

आराखडा तयार करण्याचे काम दिल्लीचे वास्तू सल्लागार कोठारी असोसिएट प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आले.

सार्वजनिक क्षेत्रातील प्रख्यात कंपनी, हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनच्या आवारात बांधण्यात आले. हे मैदान रांची विमानतळ, एचइसी रुग्णालय आणि सेंट थॉम शाळा, धुर्वा, रांची यांच्या परिसरात स्थित आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीचे हे होम ग्राउंड आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारताच्या सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता.[]

मैदानाबद्दल

[संपादन]

मैदानावरून आसपासच्या परिसराची चांगली दृश्ये पहायला मिळतात; जगन्नाथ मंदिर, हातिया धरण आणि जगप्रसिद्ध हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचा प्लांट मैदानावरून व्यवस्थित दिसतो. मैदानाचे बांधकाम असे केले आहे की वर्षाच्या सर्वात लहान दिवशीसुद्धा, सायंकाळी ४.४५ पर्यंत नऊ पैकी कोणत्याही खेळपट्टीवर कोणतीही सावली पडणार नाही. संकुलामध्ये पाच खेळपट्ट्या असलेले आणखी एक मैदान आहे.

त्याशिवाय येथे सरावासाठी आठ खेळपट्ट्यांची जागा आहे. मैदानाची आसनक्षमत ५०,००० इतकी असून ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. पूर्व आणि पश्चिमेस असलेल्या इस्ट आणि वेस्ट टेकड्यांवरूनही प्रेक्षक सामने पाहू शकतात. दोन्ही बाजूस टेकड्या असलेले हे देशातील एकमेव मैदान आहे.

नॉर्थ आणि साऊथ पॅव्हिलियन हे पुर्णपणे वातानुकूलीत असून पाच मजली आहेत ज्यामध्ये व्ही.आय.पी. क्षेत्र, सभासद, देणगीदार यांच्या जागा, अध्यक्ष बॉक्स, बीसीसीआय बॉक्स आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र जेवण्याची व्यवस्था असलेल्या दोन मोठ्या ड्रेसिंग रुम्स आहेत.

छतावरील पडदा सुर्यापासून सावली देतो आणि स्टीलच्या चौकटी पासून तयार होणारी मोहक रचना, मैदानाला एक संस्मरणीय शोभा देते. मैदानावर तीन खेळपट्ट्या असलेले इनडोअर क्रिकेट सेंटर आणि प्रशिक्षणादरम्यान रहाण्यासाठी निवासी संकुल सुद्धा आहे.[]

मैदानावरील दोन हिल स्टॅंड भारताच्या पहिलीच आहेत आणि स्टेडियमला भेट दिलेल्या जगभरातील सर्व क्रिकेट प्रशासक आणि अधिकारी यांनी याची प्रशंसा केली आहे.

प्रकल्पाचा तपशील

[संपादन]
  • खर्च: 1.9 अब्ज (US$४२.१८ दशलक्ष) बांधकामासाठी
  • क्षेत्रफळ: १,३०,००० मी
  • क्षमता: ४०,०००

मैदानाचे बांधकाम फेब्रुवारी २०१२ मध्ये १.८० अब्ज इतक्या खर्चात आणि ३५ एकर (१,४०,००० मी) इतक्या क्षेत्रात होणे अपेक्षित होते. मैदानावर पहिला एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान १९ जानेवारी २०१३ रोजी खेळवला गेला. आधी जेएससीएला २०११ मध्ये वेस्ट इंडीज/इंग्लडच्या भारत दौऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सामने मिळण्याची आशा होती.

मैदान, "रांची" शहराच्या कक्षेत बांधले गेले आहे. रांचीच्या बिर्सा मुंडा विमानतळापासून १०-मिनीटे आणि "हॉटेल रॅडिसन ब्लु" ह्या पंचतारांकित हॉटेलपासून २५ मिनीटांच्या अंतरावर आहे. चौपदरी रस्त्यासोबत ते चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. त्याशिवाय रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून सुद्धा येथे येण्यासाठी चांगली सोय आहे.

जेएससीए क्रिकेट मैदानाच्या प्रकल्पामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • ९ खेळपट्ट्या असलेले मुख्य मैदान
  • सराव आणि छोट्या सामन्यांसाठी नेट्ससहित संलग्न मैदान
  • ८ खेळपट्टच्याची सरावासाठी जागा
  • ४०,००० प्रेक्षकक्षमता
  • सभासद पॅव्हिलियन आणि पत्रकार स्टॅंड (२५०)
  • टेनिस, बास्केटबॉल मैदान, जलतरण तलाव आणि स्पा अशा अतिरिक्त सुविधा
  • ७६ कॉर्पोरेट आदरातिथ्य बॉक्स
  • युवा प्रशिक्षण योजनांसाठी निवासासहित स्टेट-ऑफ-द-आर्ट इनडोअर क्रिकेट अकादमी
  • पाहुण्यांसाठी ३५ निवासी सुट्स

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

[संपादन]

कसोटी

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१६-२० मार्च २०१७ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक

एकदिवसीय

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१९ जानेवारी २०१३ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर २०१३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक
१६ ऑक्टोबर २०१४ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ३ गडी धावफलक
२६ ऑक्टोबर २०१६ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १९ धावा धावफलक

टी२०

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१२ फेब्रुवारी २०१६ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ६९ धावा धावफलक

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "भारताच्या मैदाने". 2011-09-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-24 रोजी पाहिले.
  2. ^ जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान माहिती
  3. ^ जेएससीए :: झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन
  4. ^ "आयपीएल सामने रांची येथे व्हावेत अशी शाहरुख झानची इच्छा" (इंग्रजी भाषेत). २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ मनोहर लाल, टीएनएन १७ ऑक्टोबर २०११, ११.३४ am भारतीय प्रमाणवेळ. "मैदानाच्या प्रगतीबाबत बीसीसीआय समाधानी – टाइम्स ऑफ इंडिया". 2014-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ कीनान मैदान Archived 2019-06-23 at the Wayback Machine.. क्रिकझारखंड.ऑर्ग. ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ बीसीसीआयकडून निवड समितीमध्ये बदल, सहा नवीन कसोटी मैदानांची घोषणा
  8. ^ "रांचीमधील नव्या मैदानावार जागतिक दर्जाच्या सुविधा – क्रिकेट न्यूझ ॲंड आर्टिकल्स". ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २१ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची / नोंदी / टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.

साचा:भारताच्या क्रिकेट मैदाने

बाह्यदुवे

[संपादन]