जयराज साळगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जयराज साळगावकर
Jayraj salgaokar.jpg
जन्म जून ३, इ.स. १९५४
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
शिक्षण रामनारायण रुईया महाविद्यालय मधून अर्थशास्त्रामध्ये पदवी,
मुंबई विद्यापीठ येथून अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण
वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट
वडील जयंत साळगांवकर


जयराज साळगावकर (३ जून, इ.स. १९५४;) हे लेखक तसेच उद्योजक आहेत. हे कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) सहसंस्थापक, सध्याचे संपादक, प्रकाशक व कार्यकारी संचालक आहेत. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आहे.


जीवनकार्य[संपादन]

जयराज साळगावकर यांनी १९९६ साली www.kalnirnay.com या संकेतस्थळाची सुरुवात केली. २०११ मध्ये कालनिर्णय दिनदर्शिकेचे ॲप त्यांनी मोबाईल फोनवर आणले. वाहतुकीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी OREN ह्या ध्वनिमापन यंत्राच्या पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला. 'बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशन' या संस्थेत १९९७-२००० या काळात कार्यकारी मंडळ सदस्य आणि २०००-२००१ या दरम्यान सचिव म्हणून ते कार्यरत होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • १९७६ साली पहिल्यांदा नावीन्यपूर्ण ट्रेसिंग पेपर ऑफसेट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, 'समव्यस्त' हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. हे तंत्रज्ञान आता सर्रास वापरले जाते.
 • त्यांच्या लोकमत वर्तमानपत्रातील लेखांचे संकलन असलेले 'कशासाठी कुठवर' हे पुस्तक प्रकाशित झाले.
 • मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित 'जगप्रवाह' हे त्यांचे पुस्तक जागतिक कल आणि अर्थशास्त्र या विषयावर आधारित आहे.
 • 'अजिंक्य योद्धा बाजीराव'(लष्करी इतिहास) हे त्यांचे पुस्तक परम मित्र पब्लिकेशन्स यांनी तर 'पैसा आणि मध्यमवर्ग' (अर्थशास्त्र ) हे पुस्तक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासन यांचे अर्थशास्त्रावरचे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून सी.डी. देशमुख पुरस्काराने(२०१२-१३) गौरविण्यात आले.
 • 'निओ-गुटेनबर्ग'या त्यांच्या पुस्तकात तांत्रिक आदान प्रदान आणि माहिती तंत्रज्ञानामुळे येऊ घातलेले माहितीविद्येचे पुनरुज्जीवन या आणि माहिती-क्रांती या विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. जयराज साळगावकर यांच्या मते, 'हे पुस्तक म्हणजे गुटेनबर्ग यांना समकालीन दृष्टिकोनातून वाहिलेली आदरांजली आहे.'
 • दिव्य मराठी वर्तमानपत्राच्या "Blowing in the winds' या सदरासाठी त्यांनी सातत्याने लेखन केले.
 • लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांत नियमितपणे अनेक चालू घडामोडींवरती त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

लेख/पुस्तके[संपादन]

 1. अजिंक्य योद्धा बाजीराव थोरले बाजीराव पेशवे
 2. कर्झनकाळ
 3. कशासाठी कुठवर
 4. The Gorakhnath Enlightenment
 5. जगप्रवाह
 6. निओ-गुटेनबर्ग
 7. पैसा आणि मध्यमवर्ग
 8. मुंबई शहर गॅझेटिअर (मुंबईचा इतिहास)
 9. समव्यस्त
 10. सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास

उल्लेखनीय कार्य[संपादन]

 • १९९८- २००१ या कालावधीत त्यांनी भोपाळ मधील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट' ह्या सरकारी संस्थेत संचालक म्हणून काम पाहिले.
 • दाभोळ येथील एनराॅन प्रकल्पाशी संबंधित सरकारी आस्थापना, प्रसारमाध्यमे, सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या प्रश्नांवर त्यांनी काम केले.
 • ग्रंथाली या प्रकाशन संस्थेच्या कार्यकारी समितीवर त्यांनी अनेक वर्ष त्यांनी काम केले.
 • महाराष्ट्राधंमधील 'कृष्णा खोरे महामंडळ' ह्या पाणीपुरवठ्याच्या सरकारी मेगा प्रकल्पासाठी निधी उभारणे, सामाजिक भान वाढविणे, स्थानिक प्रश्न सोडविणे अशा अनेक सरकारी पातळीवरच्या कामांत त्यांनी मदत केली.
 • २००९-२०११ या कालावधीसाठी भारत सरकारच्या नियोजन आयोगाच्या श्रमिक आणि रोजगार मंडळावर पुनरावलोकनच्या कार्यात त्यांचा सहभाग होता.

पुरस्कार व सन्मान[संपादन]

 • 'पैसा आणि मध्यमवर्ग' (अर्थशास्त्र ) या जयराज साळगावकर यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र शासन यांचे अर्थशास्त्रावरचे सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून सी.डी. देशमुख पुरस्काराने(२०१२-१३)गौरविण्यात आले.
 • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यामार्फत कार्यकारणीचे सदस्यत्व देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
 • वाई येथील 'प्रज्ञा पाठशाला' या सरकारी संस्थेच्या सल्लागार समितीचे सन्माननीय सदस्यत्व त्यांना बहाल झाले आहे.

संदर्भ[संपादन]


 • "कालनिर्णय अधिकृत संकेतस्थळ".
 • "The Man Who Always Gets the Eid Dates Right".
 • "विनाकारण हॉर्न वाजवाल तर दंड भरावा लागेल".[मृत दुवा]
 • "जयराज साळगावकर – 'रिनेसान्स' मॅन".

बाह्य दुवे[संपादन]

विकिक्वोट
जयराज साळगावकर हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.