Jump to content

जमशेदपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जमशेटपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
जमशेदपूर
भारतामधील शहर


जमशेदपूर is located in झारखंड
जमशेदपूर
जमशेदपूर
जमशेदपूर
चे झारखंडमधील स्थान
जमशेदपूर is located in भारत
जमशेदपूर
जमशेदपूर
जमशेदपूर
चे भारतमधील स्थान

गुणक: 22°47′N 86°12′E / 22.783°N 86.200°E / 22.783; 86.200

देश भारत ध्वज भारत
राज्य झारखंड
जिल्हा पूर्व सिंगभूम जिल्हा
क्षेत्रफळ २२४ चौ. किमी (८६ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ६,३१,३६४
  - घनता ४,२०० /चौ. किमी (११,००० /चौ. मैल)
  - महानगर १३,३९,४३८
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


जमशेदपूरचे संस्थापक जमशेदजी टाटा

जमशेदपूर (संताली: ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱯᱩᱨ) हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगालओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते.


१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

वाहतूक

[संपादन]

सोनारी विमानतळ शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु सध्या येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. टाटानगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात.

राष्ट्रीय महामार्ग ३२ जमशेदपूरला दिल्ली-कोलकातादरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २ सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३३ रांचीसोबत जोडतो.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]