सूफी पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूफी पंथ (अरबी: تصوّف - तसव्वूफ, फारसी: صوفی‌گری सूफीगरी, उर्दू: تصوف) हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. ह्या पंथाच्या लोकांना सूफी असे संबोधले जाते. इसवी सन तेराव्या शतकात काही सूफी संत दक्षिण भारतात आले. सूफी संताचे औरंगाबाद गंगापूर पैठण दौलताबाद खुलताबाद ही मराठवाड्यातील प्रमुख केंद्रे होती. त्यांतले पैठण हे महत्त्वाचे प्रमुख केंद्र होते. मराठवाड्यात प्रथम मोईजुद्दीन व नंतर निजामुद्दीन यांनी सूफी संप्रदायाचा प्रसार केला. नाथ संप्रदायाने सूफी संप्रदायापासून प्रेरणा घेतली असे म्हटले जाते. दिल्लीत वास्तव्य असलेल्या निजामुद्दीन अवलियाच्या प्रेरणेने त्याचा शिष्य मुंतजबोद्दीन जर्जरी बक्ष याने आपल्या धर्मप्रचारकासह महाराष्ट्रात खुलताबादेस मुक्काम केला होता. सू पंथ हा गाढ भक्तीचा तसेच वैराग्य तपश्चर्या व मानवतावाद इत्यादींचा आदर्श मानणारा संप्रदाय होता.

या पंथाच्या नावाने एक सूफी संगीत परंपरा निर्माण झाली. भारत-पाकिस्तानातील अनेक गायक सूफी संगीत गातात.

जोधा अकबर चित्रपटातले ’ख्वाजा मेरे ख्वाजा...दिल में समाँ जा...शाही का शाह तू... अली का दुलारा’ हे ए. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सूफी संगीताचा एक नमूना आहे.

{{विस्तार}