इस्लाममधील पवित्र पुस्तके
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कुराण या मुस्लिम धर्मियांच्या धर्मग्रंथात ख्रिस्ती व यहुदी धर्मियांच्या धर्मग्रंथांचा (बायबल - जुना करार व नवा करार) उल्लेख आला आहे. कुराण अवतरीत होण्याआधी हे पवित्र धर्मग्रंथ अवतरीत झाले होते. अशी नुस्लीम धर्मीयांची श्रद्धा आहे. अशा ग्रंथधारकांना (यहुदी व ख्रिस्ती लोकांना) "अहले किताब" म्हणजे ग्रंथधारक लोक असे कुराणात म्हणले आहे. यासंबधी सय्यद अबुल आला मौदुदी म्हणतात : अहले किताब या अरबी शब्दाचा अर्थं ग्रंथधारक असा होतो. परंतु कुराणाच्या परीभाषेत ज्याप्रमाणे किताब - ग्रंथ या शब्दाला एक मर्यादित व ठराविक अर्थ आहे व त्याच्याने अभिप्रेत निव्वळ ग्रंथ नसून केवळ ईशग्रंथ असतो त्याचप्रमाणे अहले किताबचा देखील एक विशिष्ट व ठराविक अर्थ आहे. याच्याने अभिप्रेत केवळ यहुदी (ज्यू) आणि ईसाई (ख्रिस्ती) लोक असतात. धर्मग्रंथ मानणारी सर्वच राष्टे् किवा जमाती अबिप्रेत असत नाहीत. हे खरे की ज्या अर्थी किताबने अभिप्रेत ईशग्रंथ असतो त्याअर्थी अहले किताबचा अर्थ देखील ईशग्रंथ मानणारे असा होईल. तो केवळ काही ठराविक ग्रंथाना मानणाऱ्यानाच मर्यादितपणे लागू होण्याऐवजी सर्वच ईशग्रंथ मानणाऱ्याना लागू असला पाहिजे. परंतु हे खरे असले तरी, हेदेखील एक सर्वमान्य सत्य आहे की यावेळी जगात जितके धर्मग्रंथ आढळतात त्यापैकी कुराणाने ज्यांची ईशग्रंथ म्हणून सत्यता प्रमाणित केलेली आहे असे केवळ तीनच ग्रंथ आहेत. तौरात (बायबल - जुना करार), इंजील (नवा करार), आणि जबुर (स्तोत्रसहिता - जुना करार), म्हणून जेव्हा तो (म्हणजे कुराण) अहले किताब असा शब्द प्रयुक्त करील तेव्हा त्याच्याने मर्यादितपणे याच तीनही ग्रंथाची अनुयायी राष्टे् त्याला अभिप्रेत असतात.
तौरातच्या आधारावर उदयास येणारे राष्ट् यहुदी (ज्यू) लोक आहेत. तर इंजीलद्वारे (नवा करार) इसाई (ख्रिस्ती) लोक आहेत. उरली जबुर ( स्तोत्रसहिता) तर तिच्या आधारावर कोणतेही वेगळे राष्ट् उभे राहिले नाही. कारण असे कि हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे असे नाही तर तौरातची (जुना करार ) पुरवणी म्हणून तिचे स्वरूप आहे. प्रसिद्ध इस्रायेलवंशी प्रेषित दाउद (दावीद राजा) यांच्यावर ती उतरली होती. तिला यहुदी व इसाई दोन्ही लोक मानतात.[१]
- ^ सय्यद अबुल आला मौदुदी. (दिव्य कुराण - सटीप मराठी भाषांतर).