चर्चा:बाबासाहेब आंबेडकर/चर्चा १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बाबासाहेबांना बौद्ध् धम्माचे आकर्षण[संपादन]

बाबासाहेबांना बौद्ध् धम्माचे आकर्षण लहानपणापासूनच होते.त्यांनी बौद्ध् धर्म पुर्ण विचारांती स्वीकारला. त्यामुळे मुस्लिम किंवा हिंदू धर्माची येथे चर्चा होउ नये ही विनंती.Kanher १०:१५, २६ ऑगस्ट २००९ (UTC) साचा:महत्त्वाचा लेख बुध्द् धम्र्‍ हा मुल भार्तिय् धम्र्‍ आहे. आनि तो आर्य लोक् भार्तात् येन्याच्या आगोदर् पासुन् अतिशय सुस्थितित् होता . स्वार्थि ब्राम्हन् लोकानि कपत निति वापरुन् तो र्ासातला नेला. वण्राव्यवस्था जातित् प्ररावरतित केली. हेआंम्बेड्करांनी सिध्द् केले आहे.

Non-encyclopedic text[संपादन]

A lot of text has been added under समाजकार्य by an anonymous user.

Can someone tranform it into referenced and NPOVed material?

अभय नातू ०९:०८, ७ डिसेंबर २००८ (UTC)


लेख वाचला, ज्ञानात भर पडली. जाणकारांनी संदर्भ दिल्यास लेख परिपूर्ण होईल. आंबेडकरांची मते या विभागाखाली बरीचशी माहीती विभागवार संपादित करता येईल. प्रबंधकांना विनंती की आंबेडकर हा विषय समाजातील मोठ्या भागासाठी जिव्हाळ्याचा आहे तसेच काही समाजकंटक त्यांची खोडी काढण्यासाठी आंबेडकर विषयक गोष्टींची कुरापत काढत असतात. आपण जाणतोच् की अश्या गोष्टींनी सामाजिक ताण तणाव होण्याची शक्यता असते. अश्या गोष्टींना मराठी विकीवर अटकाव व्हावा म्हणून हा लेख केवळ सदस्यांसाठीच संपादित करण्यासाठी लॉक करावा.

अजयबिडवे १३:४४, ४ मार्च २००९ (UTC)

घटनेचे शिल्पकार[संपादन]

Vd. Arun Dudhamalअरुण दुधमल आदरणीय अभय नातू, जयभीम डॉ. बाबासाहेब आंबेडकरां बद्द्ल माहिती देतांना मसुदा समितीचे अध्यक्ष पद हे त्यांच्या कडे होते. हे सत्य आहे पण त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात हा मुद्दा का लिहण्याचे टाळलात ?

श्री दुधमल,
नमस्कार. हा लेख मी स्वतः लिहिलेला नाही. विकिपीडियावरील सगळ्याच लेखांप्रमाणे हाही लेख अनेक सदस्यांच्या योगदानाने तयार झालेला आहे. त्यात काही माहिती लिहायची राहिलेली असणे शक्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार गणले जाते याचा उल्लेख (माझ्या मते) या लेखात पाहिजेच. या लेखात (आणि इतर कोणत्याही लेखात) तुम्ही सुद्धा बदल करू शकता, तर मग घ्या लेखणी (कळपट) आणि करुन टाका हा बदल.
काही मदत लागली तर माझ्या सदस्य चर्चा पानावर कळवालच.
अभय नातू १८:५६, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

More Non-encyclopedic text[संपादन]

इस्लाममधील समतावादी तत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात इस्लामविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लाममध्ये वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली तरी भारतीय मुसलमानांतील जातीव्यवस्था नष्ट करण्यात त्यास यश आलेले नाही.

'मुस्लिम समाजातील काही रुढींबद्दल आणि त्याहुनही त्यात बदल घडवू पाहणाऱ्या इच्छेचा त्यांच्यातील अभाव याविषयी डॉ.आंबेडकरांनी प्रखर टिका केलीली आहे. उदा. मुस्लिम महिलांतील बुरखा पध्दती. त्याबद्दल ते म्हणतात,' रत्यावरुन चालत जाणाऱ्या या बुरखाधारी महिला हे भारतात आढळणाऱ्या अगदी हिणकस दृश्यांपैकी एक दृश्य आहे. पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिलांच्या शारीरिक रचनेवर अनेक दुष्परिणाम होतात. अनेमिया, क्षय, दातांचे विविध रोग, यासारख्या रोगांना त्या बळी पडतात. पाठीत बाक निर्माण होणे, हात-पाय वाकडे होणे इत्यादी. या पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिला बौध्दिक व नैतिक पोषणापासून वंचित ठेवल्या जातात. त्यांना बाह्य जगापासून पूर्णत: विभक्त केल्यामुळे कुटूंबातील लहान-सहान भांडणामध्ये त्या गुंतून राहतात. परिणामत: त्या कोत्या मनाच्या व संकुचित दृष्टिच्या बनतात. आंबेडकरांच्या मते, पडदा पध्दतीमुळे हिंदूना सामाजिकदृष्टया मुस्लिम समुदायापासून विभक्त करण्याचे कार्य घडत आहे. जे भारतातील सामाजिक जीवनाच्या विनाशाचे एक कारण आहे.'

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खंत आहे की, मुस्लिमांनी त्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा एकही पुरावा आढळत नाही.

डॉ. आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक जीवनाबरोबरच राजकीय जीवनातील भूमिका अधोरेखित करताना म्हटले आहे की, मुस्लिमांना राजकारणात काहीही रस नाही.धर्मातच त्यांना मुख्यत: रस आहे. मुस्लिम मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी ज्या अटी घातल्या जातात त्या अशा - उमेदवाराने स्वखर्चाने मशीदीतील जुने दिवे काढून त्या जागी नवे दिवे लावावे, जुन्या सतरंज्या फाटल्याने त्या नव्या आणाव्यात, मशिद मोडकळीस आल्याने तिची दुरुस्ती करावी! मुस्लिम राजकारण हें प्रामुख्याने पुराहितप्रवण आहे, आणि त्याला फक्त एक फरक कळतो, तो म्हणजे हिंदू व मुसलमांनातील फरक. मुस्लिम समाजातील राजकारणात जीवनाच्या कुठल्याही ऐहिक व धर्मनिरपेक्ष घटकाला स्थान नाही. डॉ. आंबेडकर म्हणतात, 'त्यांना अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, त्याविरुध्द एखाद्या संघटित समाज सुधारणा चळवळीचा अभाव होय.' हिंदूंमधील निदान काही घटकांमध्ये अशी या सामाजिक दोषाबाबत जाणीव निर्माण झाली आहे, आणि त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये अशी चळवळ राहोच, पण या दोषांची जाणीवही निर्माण झालेली नाही.' (लेखक मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक - सदस्य असून मुस्लिम समाजात जागृती घडवून आणण्याचे कार्य गेली चार दशके अविरतपणे करीत आहेत.)

इस्लाम धर्मा विषयी लिहिलेला लेख संभ्रम पुर्ण असल्याने तो काठावा[संपादन]

कृपया इस्लाम धर्मा विषयी लिहिलेला लेख संभ्रम पुर्ण असल्याने तो काठावा असे मला वाटते पण अभय नातु तो मचकूर परत परत आणून धार्मिक वाद वाढवन्याचा प्रयत्न करत आहेत हे त्यांनी विसरू नये.

उत्तर[संपादन]

नमस्कार,

मजकूर परत आणून मी लेख होता त्या स्थितीत आणत आहे. मला धार्मिक (किंवा इतरही) वाद वाढवण्यात interest नाही. तुम्हाला मजकूराबद्दल शंका असेल तर तेथे {{संदर्भ हवा}}, {{दृष्टिकोन}}, {{वाद}}, इ. साचे लावा म्हणजे वाचणार्‍यास कळेल की खालील मजकूर वादातीत नाही.

नावानिशी आरोप करण्याआधी आपण आपलेही नाव उघड केले तर बरे, नाहीतर नुसताच हवेत गोळीबार.

अभय नातू २०:२०, १९ जानेवारी २०११ (UTC)

संदर्भरहित मजकूर[संपादन]

खालील मजकूर लेखातून येथे हलवला आहे. संदर्भ मिळाल्यावर लेखात हलवावा


इस्लाममधील समतावादी तत्त्वांमुळे आंबेडकरांच्या मनात इस्लामाविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लामात वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली, तरीही भारतीय मुसलमानांतील जातिव्यवस्था नष्ट करण्यात त्यांना यश आलेले नाही. मुस्लिम समाजातील काही रुढींबद्दल आणि त्याहूनही त्यात बदल घडवू पाहणार्‍या इच्छेचा त्यांच्यातील अभाव याविषयी आंबेडकरांनी प्रखर टीका केली. उदाहरणार्थ, मुस्लिम महिलांतील बुरखापद्धतीविषयी ते म्हणतात, रस्त्यावरून चालत जाणार्‍या या बुरखाधारी महिला हे भारतात आढळणार्‍या अगदी हिणकस दृश्यांपैकी एक दृश्य आहे. पडदापद्धतीमुळे मुस्लिम महिलांच्या शारीरिक रचनेवर अनेक दुष्परिणाम होतात. अ‍ॅनिमिया, क्षय, दातांचे विविध रोग यांसारख्या रोगांना त्या बळी पडतात. पाठीत बाक निर्माण होणे, हात-पाय वाकडे होणे इत्यादी. या पडदापद्धतीमुळे मुस्लिम महिला बौद्धिक व नैतिक पोषणापासून वंचित राहतात. त्यांना बाह्य जगापासून पूर्णत: विभक्त केल्यामुळे कुटुंबातील लहान-सहान भांडणांमध्ये त्या गुंतून राहतात. परिणामत: त्या कोत्या मनाच्या व संकुचित दृष्टीच्या बनतात. आंबेडकरांच्या मते, पडदापद्धतीमुळे हिंदूना सामाजिकदृष्टया मुस्लिम समुदायापासून विभक्त करण्याचे कार्य घडत आहे. जे भारतातील सामाजिक जीवनाच्या विनाशाचे एक कारण आहे.

मुस्लिमांनी त्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा एकही पुरावा आढळत नाही, अशी खंत आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक जीवनाबरोबरच राजकीय जीवनातील भूमिका अधोरेखित करताना म्हटले आहे की, मुस्लिमांना राजकारणात काहीही रस नाही. धर्मातच त्यांना मुख्यत: रस आहे. मुस्लिम मतदारसंघातील निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी ज्या अटी घातल्या जातात त्या अशा - उमेदवाराने स्वखर्चाने मशिदीतील जुने दिवे काढून त्या जागी नवे दिवे लावावेत, जुन्या सतरंज्या फाटल्याने नव्या आणाव्यात, मशीद मोडकळीस आल्याने तिची दुरुस्ती करावी इत्यादी. मुस्लिम राजकारण हे प्रामुख्याने पुरोहितप्रवण आहे, आणि त्याला फक्त एक फरक कळतो, तो म्हणजे हिंदू व मुसलमांनातील फरक. मुस्लिम समाजातील राजकारणात जीवनाच्या कुठल्याही ऐहिक व धर्मनिरपेक्ष घटकाला स्थान नाही. आंबेडकर म्हणतात, 'त्यांना अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, त्याविरुद्ध एखाद्या संघटित समाजसुधारणा चळवळीचा अभाव होय.' हिंदूंमधील निदान काही घटकांमध्ये अशी या सामाजिक दोषांबाबत जाणीव निर्माण झाली आहे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत, त्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये अशी चळवळ राहोच, पण या दोषांची जाणीवही निर्माण झालेली नाही.' [ संदर्भ हवा ]

संदर्भ, इ[संपादन]

जयभीम,

तुम्ही चालवलेला उद्योग पाहून त्यास तसेच उत्तर देण्याचा खटाटोप न करता मी याबाबत थोडासा वस्तुनिष्ठ विचार करून वरील मजकूर येथे हलविलेला आहे. याने तुम्ही संतोष मानून संपादने उलटवण्याचा उपक्रम थांबवाल ही आशा.

संदर्भ असलेला पण तुम्हाला गैरसोयीचे वाटणार्‍या मजकूराबद्दल असे करता येणार नाही हे लक्षात घ्यावे.

अभय नातू २०:३१, १९ जानेवारी २०११ (UTC)

पुनश्च हरिओम!
अभय नातू १८:२१, ३१ जानेवारी २०११ (UTC)

अभय नातू यांची अतिशयोक्ती होत आहे याची विकिपेडिया च्या मुख्य संचालकानी नोंद घ्यावी ही विनंती.[संपादन]

मी आता पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांन विषयी जास्तीत जास्त मजकुर देन्याचा प्रयत्न केला आहे पण या मुर्ख माणसाने सर्वा मजकुर पुसुन टाकला आहे. कृपा करुन या कडे लक्ष द्यावे. हा पुर्ण पणे स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणारा विकृत मनुष्य आहे. माझी लेखनी जरा झोंबेल त्या बद्दल शमस्व आहे पण हा अभय नातू मणुची पिल्लावळ आहे.

अरे माणसा(?),
मला मुर्ख म्हणतोस, पण तुला काय विशेषणे लागू आहेत हे माहिती आहे?
तू कारणे न देता तुला पाहिजे तो मजकूर पुसतोस. तुला संदर्भ विचारले तर शिव्या देतोस?
तू पुसलेला मजकूर चर्चा पानावर हलवला व इतर सदस्यांनी तो बदलून येथे ठेवला. त्याला तुझा आक्षेप असला तर तसे सांग ना. पुसतोस कशाला?
लेका, मला मणुची पिलावळ म्हणतोस, तर तुझी जातकुळी सांगायला का लाजतोस? सांग जरा तुझे नाव पत्ता म्हणजे मग तुला इतरांना अमक्याची पिलावळ अन तमक्याची पिलावळ म्हणण्याचा अधिकार मिळेल.
अतिशयोक्ती कोणाची होत असेल तर तुझी होत आहे. विकृत कोणी असला, तर विद्वाना, तूच आहेस.
आता राहिले झोंबायचे, तर कोणाला कोणता मजकूर झोंबतो (आणि वारंवार कारणे न देता कोण पुसून काढतो) ते येथे उघडच आहे.
असो, एकेरीवर आलास म्हणून मीही एकेरीवरच आलो.
अभय नातू १८:४२, ३१ जानेवारी २०११ (UTC)
ता.क. तुला आक्षेप असलेल्या मजकूरावर मोठ्या तीन सूचना आहेतच ज्याने तुला न आवडणारा मजकूर बरोबर नसण्याची शक्यता आहे हे उघड आहे. तुला गैरसोयीचा वाटणारा सगळा मजकूर काढायचा आग्रह असला तर तू येथे न येणे हेच बरे. आणि हे मी मराठी विकिपीडियाच नव्हे तर कोणत्याही बहुलेखकी प्रकल्पाबद्दल सांगत आहे. तू येण्याला माझी आडकाठी नाही, पण तुझे हे असे खटके सगळीकडे वारंवार उडतीलच.
आपल्याला बरोबर न वाटणार्‍या लेखनाबद्दल काय करावे याचे काही प्रघात आहेत. त्यानुसार तू न सांगताही मी तुला नको असलेला मजकूर हलवला तरी तुला समाधान नाही. आता काय करायचे? आँ??
अजून एक, तू केलेल्या इतर बदलांना माझा बिलकुल आक्षेप नाही, उलट त्याबद्दल आनंदच आहे. त्यातील शुद्धलेखन, व्याकरण चुकाही मी काढण्यास तयार आहे. बाबासाहेबांबद्दल व इतरही विषयांवर तू जितके लेखन करशील, किंवा त्याबद्दलच्या सत्यासत्यतेबद्दल चर्चा करशील तितके चांगलेच. चार गोष्टी मला व इतरांनाही त्यातून कळतील. पण असे एकांगी मजकूर उडवण्याला माझा सक्त विरोध आहे.
अभय नातू १८:४६, ३१ जानेवारी २०११ (UTC)

मतांतरे[संपादन]

नमस्कार!

>> पण हा अभय नातू मणुची पिल्लावळ आहे << जयभीम, 'मणु' म्हणजे कोण ते नीट समजले नाही; पण अभय नातू यांना "आपण कुणाचीतरी पिल्लावळ आहात", असे म्हणून विकिपीडिया वर्तनसंकेतांच्या मर्यादा उल्लंघत आहात. एखाद्या मुद्द्याबद्दल मतांतरे असू शकतात; एवढेच नव्हे तर दोन्ही मतांबद्दल संदर्भ मानण्यालायक विश्वासार्ह ग्रंथाधार मांडता येऊ शकतात. त्यामुळे अश्या मतभेदाच्या मुद्द्यांवर साचा:वाद हा साचा लावून वाचकांना तो उपविभाग विवेकाने वाचण्याचा इशारा देण्याची प्रथा आहे. विकिपीडियावर एकांगी, प्रचारकी ढंगाचे किंवा व्यक्तिपूजक मजकूर चढवू नये, असा संकेत आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक धोरणे विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे येथे नोंदवली आहेत; ती जरूर पाहा. --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०३:३३, १ फेब्रुवारी २०११ (UTC)

जयभीम यांचा संदेश[संपादन]

अरे मी कोण आहे ते मला माहित आहे. पण तु कोण आहे हे ही मला महित आहे. मला जातिपाती शिकवु नकोस. मला बोलतोस संदर्भ न देता मजकुर टाकतो आणि काढतो. अरे मी लिहीलेला मजकुर कितीही संदर्भ दिला तरी तुझ्या सारखा नालायक माणुस असे पर्यंत काढतच राहाणार. तुमच्या लोकानचा हाच नालायक पणा आहे कि तुम्ही बुध्दी वादात हारता तेव्हा जात पातीचे नाव काढून लोकांना हिनवणे सुरु करता. आणि राहिली गोष्ट परत न येण्याची तुझ्या बापाची विकिपेडिया नाही आहे.
जयभीम : वरील संदेश माझ्यासाठी असेल, तर मला काहीच कळले नाही. कृपया स्पष्ट काय ते लिहा.
किंवा वरील संदेश अभय नातूंसाठी असेल, तर तुम्ही "तुमच्या लोकानचा हाच नालायक पणा आहे कि तुम्ही बुध्दी वादात हारता तेव्हा जात पातीचे नाव काढून लोकांना हिनवणे सुरु करता" या तुम्ही लिहिलेल्या वाक्याचा साधार पुरावा स्पष्ट करा. वाद न वाढवता आपण विवेकाने व समन्वयाने काम करावे व विकिमर्यादा पाळाव्यात, असा विकिपीडियाचा प्रचालक या नात्याने मी पुन्हा एकदा आठवण-अधिक-इशारा देतो.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १८:०८, ४ फेब्रुवारी २०११ (UTC)


मणुची पिलावळ, इ. लिहून इतरांना "हिणवणार्‍यांना" एक संदेश--
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ग्यान | |- |मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान || |-
अभय नातू ०१:५२, ५ फेब्रुवारी २०११ (UTC)

अरे अभय नातु मी लिहिलेला संत कबिर यांचे डोहे मुर्खा सारखे पहीले काढतोस. आणि आपले स्वत: चे नाव देवुन मल उपदेश देतोस. जात तु मला विचारलीस पण माझ्या ग्याना पुढे तुझे ग्यान तोकडे रे. म्हणुनच तुमच्या सारखे प्रेताच्या टाळु वरचे लोणी खाणारेच असे उद्योग करु शकतो. म्हणुन तुकाराम म्हणतात "नाठाळाच्या माथी काठी." आणि ती तुला आतुन लागेल जेव्हा माझा मेसेच वाचाशिल. माणुस शिकल्याने मोठा होतो, आणि तुम्ही जातिपाती करुण. जयभीम

बबनराव,
जात तु मला विचारलीस पण माझ्या ग्याना पुढे तुझे ग्यान तोकडे रे
जात तुम्ही आधी काढलीत -- मणुची पिलावळ वगैरे. आपले ग्यान तर सर्वांसमोर साक्षात आहेच आहे. बाकी तुम्ही तुमच्याच सदस्य पानावर लिहिलेला दोहा उत्तम आहे. आवडला. संत कबीरांचा आहे हे माहिती नव्हते कारण तुम्ही तसे लिहिले नव्हते. असो. आज कळले. जगात प्रत्येकाकडून काही न काही ज्ञान मिळते ते घ्यावे असे दत्तगुरूंनी सांगितले आहेच.
जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ग्यान | |- |मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान || |- संत कबीर
अभय नातू १६:१८, ११ फेब्रुवारी २०११ (UTC)

विकिपीडिया समाज[संपादन]

 • विकिपीडिया समाज कसा आहे.

विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर [1]संपादनास संघर्षाचे स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[2] फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणे देखील अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता [3]विकिपीडियास संत्रस्त न करता, सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे.

 • विकिपीडिया समाज काय नाही.
  • आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता विशिष्ट पद्धती अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
  • विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात.
  • विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
  • विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.

माहितगार १९:५३, ३१ जानेवारी २०११ (UTC)

कोण मोलोजी की रामजी?[संपादन]

आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेचा सॆन्यात शिपाई म्हणुन भरती झाले होते. सॆन्यातील नोकरीमुळे सॆनिकी शाळेत म्हणजेच ’नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुशिक्षीत, संस्कारसंपन्न व द्न्यानी होऊ शकले’

कुणी नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले, आणि कोण ज्ञानी झाले? मालोजीराव की रामजी? आणि मालोजी असतील तर त्यांनी नोकरी करता करता शिक्षण घेतले?---J १९:४३, २८ फेब्रुवारी २०११ (UTC)

जग झाले हे दलित प्रेमिकांच्या हत्याकांडाची शाला कुणी सवर्ण न येथे भला चांगला, जो तो जात जपलेला

ज्याचे त्याचे धर्म गाठोडी, पठडीतले सख्य जातवाढी परशू परजतात धर्मवेडी, प्रिय हो रक्त-रंजीत धर्म ज्याचा त्याला

जो तो आपुल्या जागी जखडे, नजर ना धावे तटापलिकडे मारिती दलितांना जसे उंबरातले किडेमकोडे, उंबरी सवर्ण करिती दलित दुबळ्यांचा नाश

कुणा न माहीत किती दलित रक्त सांडले ते, कोठून ज्न्माला आलो विषमतेच्या भारत देशात मन सवर्णांचे ना द्रवते, सवर्णांच्या कपटनितींना मन हे घाबरते, जो व्हॅलेंटाईन आला तो सवर्णांनी कापला. जग झाले हे दलित प्रेमिकांच्या हत्याकांडाची शाला कुणी सवर्ण न येथे भला चांगला, जो तो जात जपलेला

जगी ज्यास कोणी नाही त्यास धम्म आहे निळ्याशार आभाळाचा बाबा भार साहे ||

चातुरवर्ण्याने सोडुनी ते दिधले शुद्रतेच्या जळात ना घरी ना दारि ते रडले शिवारात बाबासाहेब म्हणूनी त्याचे नाव अमर आहे ||

बुद्ध बाळ दलितराजाला छळिले हिंदूधर्माने बाबासाहेब रुपे त्याले रक्षिले बुद्धाने अलौकिक त्याची मुर्ती अजून विश्व पाहे ||

साधुसंत कबीराला त्या छळिती लोक सारे बाबासाहेब रक्षी त्याला प्राशुनी निखारे आसवेच त्यांची झाली दुग्ध रूप दोहे ||

सप्रेम् जय भिम,

रमाई भीमराव आंबेडकर[संपादन]

रमा , रामी, रमू, रामू, इ . नावाने रमाई आंबेडकर ओळखल्या जात असत. स्वतः: बाबासाहेब आंबेडकर त्यांना रामू या नावाने बोलावत असत. पण सर्वत्र त्यांचे रूढ झालेले नाव “रमाई” असेच आहे.त्यांच्या जीवनावर रमाई नावाने चित्रपट निघालेला आहे.तसेच डॉ.यशवंत मनोहर यांनी देखील त्यांच्या जीवनावर रमाई नावानेच पुस्तक लिहिलेले आहे.सर्व आंबेडकरी जनता त्यांना रमा किंवा रमाबाई यापेक्षा “रमाई” या नावानेच ओळखते आहे. साळवे रामप्रसाद २३:३६, १९ मार्च २०१४ (IST)

धर्मांतराची घोषणा[संपादन]

इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाच्यातसा उतरवू नये. साधी अट आहे.

"धर्मांतराची घोषणा" या मधील मजकुर जसाच्या तसा इतर संकेतस्थळा वरुन उचलाला आहे. संदर्भ क्र्. १४ "एम.डी. रामटेके यांचे लेख़" या वरिल लिंक पहा

शेतक-यांची चळवळ, पर्वती सत्याग्रह, भारतीय स्वातंत्र्य लढा, महाड सत्याग्रह, सर्वात महान भारतीय, १...[संपादन]

अशा अनेक मुद्दे मी बाबासाहेबांच्या या मराठी पेजवर टाकलेले होते परंतु मला माहित नाही आपोआप नंतर गायब करण्यात आले... मी बाबासाहेबांनी नवनवीन माहीत गोळा करून तिला संपादित करून त्या इथे एड करून बाबासाहेब आंबेडकर यांचे नवे नवे मांडत असतो परंतु कुणी तरी ते पयावून पुसून टाकत असतो.. विनंती आहे क्रपया पुसू नका... संदेश हिवाळे (चर्चा) १३:१९, ४ ऑक्टोबर २०१६ (IST)

सिंबीऑसीस म्युझीअम संकेतस्थळ दुवा[संपादन]

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: सिंबीऑसीस म्युझीअम संकेतस्थळ दुवा काळाच्या ओघात कदाचित बदलला आहे. .com वरुन कदाचित .orgवर गेला आहे. तपासून लेखात दुरुस्ती करुन घ्यावी ही नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२७, १ मार्च २०१७ (IST)

क्षमा करा, मला तुमचं म्हणणं स्पष्ट कळालं नाही. नेमका कुठे आणि काय बदल करू? संदेश हिवाळे (चर्चा) १७:४०, १ मार्च २०१७ (IST)

बाह्य दुवे मध्ये सिंबीऑसीस कॉलेजमधील म्युझीअमचे दुवे (लिंक) कुणी तरी मागे दिल्या असतील. त्या लिंकवर मागे कदाचित म्युझीअम बद्दल मजकुर असेल. पण आता वेब पत्ता बदलल्याने त्या दुव्यांवर फक्त जाहीराती तेही जपानी भाषेतील दिसत आहेत.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१८, १ मार्च २०१७ (IST)
Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: , Gnome-edit-redo.svgMahitgar: सर बाह्य दुवा दुरुस्त केला आहे. धन्यवाद.. प्रसाद साळवे २२:३४, १ मार्च २०१७ (IST)

जाहीर आभार[संपादन]

शीर्षक बदल[संपादन]

माहितगार सर आपण म्हणता त्याप्रमाणे शीर्षक बदल हा वादाचा मुद्दा हे अगदी खरे..सदर लेखाचे शीर्षक बदलण्यास Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: यांच्या विनंतीचा विचार करून परवानगी दिल्या बद्दल सर आपले जाहीर आभार, तसेच Gnome-edit-redo.svgMahitgar: सर यांच्या बद्दलचा आदर यामुळे आणखीनच वाढला आहे. इत्तर विकी पेक्षा मराठी विकी वर आपल्यासारखे प्रचालक येथे आहेत यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. सर्व जेष्ठ प्रचालकांचे मनःःपूर्वक आभार प्रसाद साळवे २२:५७, ११ मार्च २०१७ (IST)

भारतरत्न ही पदवी विकी शिर्षक नियमावलीत बसत नाही असे वाटते... वारंवार शिर्षकांवरून वादही नको वाटतो. संदेश यांच्या मता प्रमाणे "बाबासाहेब आंबेडकर" असा बदलही पुरेसा होता. क्षमस्व सर.. प्रसाद साळवे ००:३७, १२ मार्च २०१७ (IST)
शीर्षक नियमावली बाबत साळवे सरांनी नेहमीच सहकार्य केले आहे यात शंका नाही. जिथपर्यंत नियमावलीचा संबंध आहे ती इतरांनी मागेच आणि पूर्ण वाकवली गेली आहे आता काही नियमावली शिल्लक आहे असे म्हणणे तथ्यास धरुन रहात नाही. उदाहरणार्थ 'लोकमान्य टिळक' या शीर्षकात लोकमान्य हि पदवीच आहे. मग एका शीर्षकात पदवी आहे तर दुसऱ्या शीर्षकात का नको असेही वाटण्याचा संभव आहे. साळवे सर आणि संदेश लेखाचे शीर्षक तुम्हाला आवडेल तसे करुन घ्यावे त्यात हरकत नाही.
विषय निघालाच आहे तर विषय कोणताही असो ज्ञानाच्या बाबतीत लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावतता निकषांना महत्व यावे आणि लोकप्रीयता हा निकष होता होईतो टाळावा असे माझे व्यक्तिगत मत असते. ज्ञानकोशातील व्यक्तिविषयक लेखातून व्यक्तिचे कतृत्व वस्तुनिष्ठ माहितीने अधोरेखीत होऊन वाचकासमोर यावे. वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी लोकांनी ज्ञानकोशांकडे वळावयास हवे.
विशेषणे आणि अलंकारीकतेमुळे माहितीची कमतरता झाकली जाण्याचा संभव असतो त्यामुळे विशेषणे आणि अलंकारीकता टाळण्यावर ज्ञानकोशांचा भर असतो. असो.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०४, १२ मार्च २०१७ (IST)

माहितगार सर, साळवे सरांप्रमाणे माझ्याही मनात तुमच्याबद्दल आदर वाढला. धन्यवाद. मी लेख शिर्षकातून भारतरत्न शब्द वगळून केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे शिर्षक ठेवले आहे. संदेश हिवाळे (चर्चा) ०८:३१, १३ मार्च २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) ०८:३१, १३ मार्च २०१७ (IST)

लेखातील पुढील सुधारणांचा टप्पा[संपादन]

१) संदर्भांचे प्रमाण वाढावयास हवे आहे. चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी आणि इतर संशोधनपर चरित्रकारांनी लिहिलेल्या चरीत्र पुस्तकातून संदर्भ घेता आल्यास बरे पडेल असे वाटते. गूगलवर मराठीतून शोध घेतल्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एक धनंजय कीर यांनी केलेल्या चरित्र लेखनाची समीक्षा असलेला पिएचडी प्रबंध पहावयास मिळतो त्याचा उपयोगही संदर्भासाठी करता येऊ शकेल.

२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उल्लेखनीय वाक्ये तसेच इतरांनी त्यांच्या बद्दल लिहिलेली उल्लेखनीय वाक्ये उदाहरणा पुरती आवश्यक तेवढी लेखात ठेऊन बाकीची वाक्यांची यादी विकिक्वोट प्रकल्पात असावी.

३) जिथे लेख विभाग सहा ते आठ परिच्छेदांपेक्षा अधिक आहे त्याचा स्वंतत्र लेख होऊ शकतो का आणि अशा स्वतंत्र लेखातून सारांश तीन ते चार परिच्छेदात बसवता येतो का ते पहावे.

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य विकिस्रोतावर उपलब्धता वाढल्यास संदर्भ स्रोतांचा दर्जा अधिक नेमका होण्यास हातभार लागू शकेल असे वाटते.

भावी लेखनासाठी शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३२, १२ मार्च २०१७ (IST)

आंबेडकर साहित्य - असा नवा , स्वतंत्र लेख हवा[संपादन]

बाबासाहेबांच्या साहित्याची व्याप्ती खूप असल्याने वरील एक स्वतंत्र लेख असावा असे वाटते. त्यांत सूची देता येईल. परीक्षणाचे दुवे देता येतील. मी नुकतेच मुक्तपणे उपलब्ध असलेल्या सं.स्थ.चे दुवे दिले आहेत, तसे देता येतील. शिवाय हे साहित्य विकिसोर्स वर आणण्यासाठी मीही उत्सुक आहे. अशा सर्व प्रकारे हे दालन समृद्ध करूया.
-सुबोध कुलकर्णी (चर्चा) १२:२६, २१ मार्च २०१७ (IST)

ललित / ललितेतर ग्रंथ विभागणी[संपादन]

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे:

'ललितेतर' विभागाचे नाव बदलून आपण केवळ 'मराठी ग्रंथ' केलेले पाहीले. आजही बहुसंख्य भारतीयांना विकिपीडिया ज्ञानकोश आहे आणि त्यात कथा कादंबऱ्यातील संदर्भ टाळायचे असतात हे माहित नसते. ललित आणि ललितेतर अशी विभागणी उपलब्ध न राहून सरमिसळ झाल्यास नवागत सदस्य काल्पनिक कथा कादंबऱ्यातील माहिती विकिपीडिया लेखात टाकण्याचे प्रसंग आणि मग त्यांना समजावत बसण्याचे प्रसंग गैरसमजाचे प्रसंग अशी साखळीच तयार होऊ शकते.

हवेतर 'ललितेतर मराठी ग्रंथ' असे नाव करावे पण ललितेतर हा शब्द राहू देणे श्रेयस्कर असे वाटते. ललित आणि ललितेतर अशी विभागणी इतरही बऱ्याच लेखात जाणीवपूर्वक केली आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:१८, २६ मार्च २०१७ (IST)

Symbol strong support vote.svg पाठिंबा - प्रसाद साळवे


माझाही

Symbol strong support vote.svg पाठिंबा -

pdf[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू: सर , या लेखाची pdf म्हणून उतरवल्यास "संपूर्ण जीवनक्रम " टेबल त्यात येत नाही. कृपाया टेक्निकल टिमशी चर्चा करून अडचण सोडवावी प्रसाद साळवे (चर्चा) ०८:५५, १४ एप्रिल २०१७ (IST)

तात्पुरती संदर्भ यादी[संपादन]

संदर्भ क्र. संदर्भ क्र. संदर्भ प्रथम उधृत संदर्भ पुर्नवापर टिपा
[१] <ref name="सतीश मस्के (प्रबंध)">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/96412 | शीर्षक = धनंजय कीर यांच्या चरीत्र लेखनाचा चिकित्सक अभ्यास | भाषा = मराठी | लेखक = सतीश श्रीराम मस्के | लेखकदुवा = | आडनाव = | पहिलेनाव = | सहलेखक = | संपादक = प्रल्हाद जी. लुलेकर (पि.एच.डी. मार्गदर्शक) | वर्ष = २००८ | महिना = जानेवारी | दिनांक = | फॉरमॅट = pdf | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = प्रकरण ४थे भाग १ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र लेखनामागची भूमिका, सामर्थ्य व मर्यादा | पृष्ठे = प्रबंधातील पृष्ठ क्रमांक ११७ ते १७८ | प्रकाशक = डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (मराठी विभाग) ऑनलाईन प्रकाशक shodhganga.inflibnet.ac.in | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = सप्टेंबर २०१७ | अ‍ॅक्सेसदिनांक = सप्टेंबर २०१७ | अवतरण = }} </ref> <ref name="सतीश मस्के (प्रबंध)"/> उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण
उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण उदाहरण

तात्पुरती संदर्भ यादीतील संदर्भ[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ सतीश श्रीराम मस्के. प्रकरण ४थे भाग १ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र लेखनामागची भूमिका, सामर्थ्य व मर्यादा. pp. प्रबंधातील पृष्ठ क्रमांक ११७ ते १७८ (शोधगंगा ऑनलाईन दुव्यावरील 10 क्रमांकाच्या pdf मध्ये) http://shodhganga.inflibnet.ac.in/handle/10603/96412. सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसदिनांकमहिना= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)लेखात मोठ्याप्रमाणावर असलेला अनावश्यक भाग काढून टाकत आहे[संपादन]

१) मजकूरात ते महान होते, दलितोध्दारक, स्त्रीयांचे कैवारी इ. विशेषणे होती, ती सर्व वाक्ये काढून टाकली आहेत. ह्या पोकळ वाक्यांपेक्षा भीमरायानी नक्की काय काय केले(कायदे, सरकारशी वाटाघाटी, स्वत:च्या अधिकारात काही बाबींची अंमलबजावणी) ह्यावर संदर्भासहित लेख येणे अपेक्षित आहे. २) संदर्भ नसलेला व भिमाला देव बनवणारा मोठा मजकूर होता, ज्यात ६० विषयांत मास्टरी, अनेक बोलीभाषेतील उदगार आणि तत्सम भंपक विधाने होती, जो भिमाच्या २१ प्रतिज्ञांनुसार भिमाला स्वत:लासुध्दा अमान्य प्रकार आहे तो काढून टाकला. ३) नेहमी बामनांनी भिमाला मदत केली असा बनाव निर्माण केला जातो त्याची सुरूवातच भिमाच्या आडनावाभोवती असलेल्या मिथकाने केली जाते. बामनाचं आडनाव नक्की भिमाला कसं मिळालं ह्याचा एकही कागदोपत्री पुरावा आपल्याकडे नाही, त्यामुळे तो भाग काढून टाकला. WikiSuresh (चर्चा) २०:०७, १ मार्च २०१८ (IST)

असहमत.... Gnome-edit-redo.svgSureshkhole: आपण तो भाग वगळू नये असे वाटते. आपण ज्याला विशेषणे म्हणता ती बहुतांशी त्यांची कार्यक्षेत्रे ज्यावर तळ साच्यात अनेक लेख निर्माण केले आहेत. तसेच त्या संबंधी वर्ग देखील टाकलेले आहेत. म्हणून एकदम भलामोठा भाग वगळण्यापेक्षा निव्वळ प्रत्येक विधान वगळताना त्याची कारणे दिली तर बरे होईल. आशा आहे आपण वगळलेला भाग आपणच उलटवाल. व कोणता वगळावा याची कारणे चर्चा पानावर उहापोह झाल्यावर वगळाल. Prasad Salve (talk) २१:००, १ मार्च २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole: असहमत, लेखात संदर्भ न मागता मोठा मजकूर हटवणे अयोग्य आहे. अनावश्यक भाग मानून तुम्ही बहुतांश आवश्यक भाग सुद्धा वगळला (याला संदर्भच नाही असे ग्राह्य धरून). कृपया, आपण हटवलेला भाग पूर्ववत करावा आणि तुम्हास शंका असलेल्या मुद्द्यांवर चर्चापानावर ते उपस्थित करावे, 'संदर्भ हवा' हे ही आवश्यक त्या ठिकाणी जोडा. हटलेल्या अनेक मुद्द्यांना मी संदर्भ देण्यास मदत करतो. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २१:२४, १ मार्च २०१८ (IST)


१) याशिवाय बहुआयामी बहुश्रुत व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. आंबेडकर हे [[समाजशास्त्र]]ज्ञ, [[मानववंशशास्त्र]]ज्ञ, [[इतिहासकार]], [[शिक्षण]]तज्ज्ञ, [[धर्म]]शास्त्रज्ञ, प्राध्यापक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी, मजूरमंत्री आणि भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक सुद्धा होते. -- विशेषणे वापरणे विश्वकोषीय नाही. भिमाचे वेगवेगळ्या विषयातले ज्ञान वेगळी बाब आहे, तीचा उल्लेख होऊ शकतो पण संदर्भ नाहीये.

२) देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना '''आधुनिक भारताचे जनक''' असेही संबोधिले जाते. -- याला एका ब्लॉगचा संदर्भ दिला आहे जो स्वीकारला जाऊ शकत नाही. शिवाय

३) खालील अनेक ठिकाणी ६४ विषयांत मास्टरी वगैरे उल्लेख आला आहे, त्यासुध्दा असलेले संदर्भ वैध नाहीत. वृत्तपत्रातील नुसती मिथके संदर्भ होत नाहीत,

४) आडनावाविषयीच्या कथेला संदर्भ(वैध संदर्भ अस्तित्त्वातच नाही!!! जे काही लिखाण आहे ते सर्व मिथक म्हणून ऐकीव माहितीवरच आहे) नाही. संदर्भ आपण फ़क्त संशोधन साहित्याचे पुस्तकांतील, शोधनिबंधातील, आणि काही बाबतीत वृत्तपत्रातील देऊ शकतो. इतर ठिकाणचे संदर्भ ग्राह्य धरले जात नाहीत. जसे की फ़क्त एखाद्या वृत्तपत्राने आंबेडकरांना ६४ विषयांत मास्टरी होती याचा उल्लेख विश्वकोषात होऊ शकत नाही. कारण ते वृत्तपत्र त्या सगळ्या ६४ विषयांची यादी देत नाही किंवा असले कोणतेही ६४ विषय आणखीन कुठेच उल्लेखलेले नाहीत. ५) https://www.quora.com ह्या सारख्या माहितीच्या संकेतस्थळांचा संदर्भ म्हणून वापर होऊ शकत नाहीत. ६)' शिक्षण घेऊन ते सुशिक्षित, संस्कारसंपन्न व ज्ञानी होऊ शकले. मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला मोठे स्थान होते. - असली वाक्ये वापरली जाऊ शकत नाहीत ज्यामध्ये विशेषणे वापरली आहेत. आणि ही वाक्ये विश्वकोषात कसल्याच मार्गाने भरही घालत नाहीत. ७) या दु:खी सुपुत्राने उदार ह्रदयी - पुन्हा असी विशेषणे, ही वापरली जाऊ शकत नाहीत. ८) पुढच्या लिखाणाला तर कसलेच संदर्भच नाहीयेत त्यामुळे प्रश्नच येत नाही. आणखीन स्पष्टता येण्यासाठी इंग्रजीमधील आंबेडकरांचे पान बघावे.

माझी अपेक्षा एकच आहे की, आपण आपला लेख दणकेबाज करुयात. त्यात प्रश्न काढायला जागाच नकोय, जर प्रश्न काढला जाऊ शकत असेल तर मजकूर काढूयात. WikiSuresh (चर्चा) २२:५१, १ मार्च २०१८ (IST)


अनेक संदर्भ शोधणे चालू आहे, थोड्या दिवसांत संदर्भ वरील काही मुद्द्यांसंदर्शात विश्वसनीय संदर्भ देण्याचा प्रयत्न असेल. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १८:३०, २ मार्च २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole:

तुम्ही दिलेल्या पहिल्या व दुसऱ्या मुद्द्यात मी काही सुधारणा करून त्यात काही संदर्भ जोडले आहेत.

तिसरा मुद्दा ६४ विषयातील प्रभुत्वाचा... त्याचा नेमका संदर्भ मिळाला नाही म्हणून तो तुम्ही हटवा.

चौदा मुद्दा त्यांच्या "आंबेडकर" आडनावाचा आहे, त्यांच्या कृष्णा आंबेडकर नावाच्या एका ब्राह्मण शिक्षकाने त्यांना आपले आडनाव दिले. आणि ही मदत नसून केवळ आपूलकिची भावना आहे. पण या इतिहासाला तुम्ही संदर्भहिन समजता. ६०-७० पैकी कोणते एक जरी 'आंबेडकर चरित्र' वाचले तरी त्यात संदर्भ सापडू शकतो. तसेच याचा सर्वात महत्त्वपूर्ण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे 'आत्मचरित्र' मध्ये सापडेल.

त्यानंतरचा पाचवा, सहावा व सातवा मुद्दा तुम्ही हटवू शकता...

शेवटचा आठवा मुद्दा नेमका काय तो स्पष्ट नाही. तो स्पष्ट त्यातही आवश्यक तो बदल करून संदर्भ जोडले जातील.

धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १६:२५, ११ मार्च २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole: सर, लेख अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लवकरच ब्लॉग वरील व अन्य अविश्वसनीय संदर्भ हटवले जाऊन नवे संदर्भ जोडले जातील. आपण या आधी केलेल्या सूचनेनुसार संदेश हिवाळे यांनी लेखात बदल केलेले आहेत हे आपण पहिले असेलच. आम्हाला मदत करून १४ एप्रिल २०१८ रोजी हा लेख मुखपृष्ठ लेख म्हणून येण्यासाठी प्रयत्न करावेत. ही विनंती प्रसाद साळवे (चर्चा) १६:४६, ११ मार्च २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे: Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे:

 1. मी आवश्यकत्या सुधारणा करिनच, हो आपण हा लेख येत्या १४ अप्रिल पर्यंत सुंदर करुयातच,
 2. माझ्या माहितीप्रमाणे, ६०/७० पैंकी कोणतेही चरित्र आडनावाच्या मुद्याची वैध माहिती देत नाही, संदर्भाच्या पातळीवर मी म्हणत आहे, शिवाय आंबेडकरांनी स्वत:चे आत्मचरित्र कधीच लिहीले नाही. जे आत्मचरित्रात्मक २० पानांचे लिखाण आहे त्यात ह्या आडनावाच्या घटनेचा उल्लेख नाही. गंमत म्हणजे आडनावात बदल सकपाळचे-->आंबावडेकर-->आंबेडकर झाले आणि ते कसे आणि का ह्याच्याबद्दल काहीही वैध माहिती आत्तापर्यंत मला मिळालेली नाही. काही लेखांमध्ये उल्लेख येतो पण पुर्ण माहिती मिळत नाही
 3. आठव्या मुद्यामध्ये माझा आक्षेप लिखाणाच्या भाषेवर आहे, भिमाला देवत्व बहाल करण्याने विकीच्या मार्गदर्शक तत्वांची तोडमोड होते(शिवाय जात-पितृसत्ताविरोधी आपल्या विचारसरणीसुध्दा आपल्याला तसे करण्यापासून थांबवते, पण कधी कधी भावनेच्या भरात जर आपण तसे करत असू तर ते थांबवले पाहिजे.) ती आपण टाळूयात आणि इंग्रजी विकीवरील लेख ह्यासाठी मार्गदर्शक ठरू शकेल असे मला वाटते. अनेक पुस्तकांमधील संदर्भ आपल्याला देता येतील ज्या पुस्तकांमध्ये आंबेडकरांच्या अनेक लिखाणांचा अभ्यास करुन मुद्दे मांडले गेले आहेत. WikiSuresh (चर्चा) २२:०१, १२ मार्च २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgSureshkhole: सर, आडनावात बदल सकपाळचे-->आंबावडेकर-->आंबेडकर झाले आणि ते कसे या बाबत खात्रीशीर संदर्भ स्त्रोत सध्या मिळत नसला तरी मिळणारच नाही असे मला वाटत नाही कारण बाबासाहेब आंबेडकर यांनी व त्याच्यावर विपुल लेखन झालेले आहे. तसेच बाबासाहेबांचा काल खूप जूना देखील नाही म्हणून त्यावर दंतकथा तयार व्हाव्यात. अर्थात तसे काही फुटकळ लेखकानी तसा प्रयत्न केला पण तो टिकू शकला नाही. यात डॉ.भीमराव कुलकर्णी यांनी लिहिलेले बाबासाहेबांचे आत्मचरित्र मला आठवते. तसेच सुमार दर्जाच्या कथालेखकांनी देखील तसा प्रयत्न केला पण टिकू शकला नाही. असो महत्वाचे म्हणजे त्यांचा आडनाव प्रवास सपकाळ ते आंबेडकर झाला तो विनाकारण झाला असेल असेही नाही. सातारा येथिल प्रतापसिंह हायस्कूल मध्ये त्यांची १९१४ क्रमांकावर नोंद आंबेडकर या आडनावानेच झाली आहे. त्यांच्या प्राथमिक शिक्षणावरील माहिती घेतल्यास त्यातून आडनाव कसे आंबेडकर झाले ते समजेल, हे नक्की. कालोघात तसे संदर्भ जोडले जातील. तसेच आपणही यावर संदर्भ शोधावेत ही विनंती. आपण लेख अधिक दर्जेदार बनवण्यासाठी प्रयत्न करुयात आपली साथ असेलच.. धन्यवाद... प्रसाद साळवे (चर्चा) २१:२६, १३ मार्च २०१८ (IST)

सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)[संपादन]

मूळ लेख सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण) मध्ये बरेच निष्कर्ष नोंदविण्यात आलेले आहेत. परंतु या लेखाला जो एकमेव संदर्भ आहे, त्यांत यांचा उल्लेख नाही. तसेच पहिल्याच ओळीत 'DrBR Ambedkar, India's first Law Minister, was recently voted as the greatest Indian after Gandhi in an online poll.' असे लिहिले आहे. त्यामुळे कोणत्या आधारावर हा लेख लिहिला आहे याची संपादकांनी माहिती द्यावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२१, २४ मार्च २०१८ (IST)

त्यात संदर्भ जोडतो.--संदेश हिवाळेचर्चा १६:०४, २४ मार्च २०१८ (IST)

पुणे करार[संपादन]

पुणे करार हा स्वतंत्र लेख फक्त तीन ओळींचा आहे. येथील मजकूर तेथे हलवायला हवा.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १५:२५, २४ मार्च २०१८ (IST)

नक्कीच हलवू, त्यापूर्वी या लेखातील पुणे करार पाहतो, आवश्य क संदर्भ जेडतो व बदल करतो.--संदेश हिवाळेचर्चा १६:०३, २४ मार्च २०१८ (IST)

विशेषणे, पुनरावृत्ती, विना संदर्भ व्यक्तिगत मते, अतिशयोक्ती इ.[संपादन]

या लेखाला विकीकरणाची खूप गरज आहे. वर उल्लेखित गोष्टींवर अनेकांनी वेगाने काम करण्याची गरज आहे, तरच हा लेख पुढील महिन्यात विशेष लेख बनवता येईल. सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत काम केले तर शक्य आहे.मी प्रयत्न करत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:२७, २७ मार्च २०१८ (IST)

मी संदर्भ सुधारले आहेत जवळपास सगळे, ब्लोग आणि इतर अयोग्य संदर्भ काढले आहेत. बराचसा अविश्वकोशिय मजकूर काढला आहे, तरी आणखीन विकीकरणाची गरज आहेच. सुधारुयात सगळं.WikiSuresh (चर्चा) १९:४१, २७ मार्च २०१८ (IST)

सहमत.. लेख आणखीच दर्जेदार करूयात.. प्रसाद साळवे (चर्चा) १९:५८, २७ मार्च २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे, Sureshkhole: संदर्भ शोधून लेखात जोडण्यासाठीही सहकार्य करावे, विनंती.--संदेश हिवाळेचर्चा १२:२१, २८ मार्च २०१८ (IST)

64 विषयात मास्टर[संपादन]

Gnome-edit-redo.svgSureshkhole: सर बाबासाहेब ६४ विषयात मास्टर होते याचे पुढील संदर्भ सापडतात. कृपया संदर्भ तपासावेत.

विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे इंग्लडच्या केंब्रिज विद्यापिठाचे संशोधन असून त्यांना जगाच्या इतिहासातील पहिला सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून सन्मानित केले गेलेले आहे.
१.[ येथे पहा [१]]

२. आंबेडकर की 64 विषयों पर मास्टरी थी। जो कि कैम्ब्रिज यूनिवर्सिटी, इंग्लैंड के 2011 के आंकड़ों के मुताबिक सबसे ज्यादा है।[२]


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात ६० अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. कदाचित त्याचा संदर्भ देखील वरील संदर्भाला असू शकतो. प्रसाद साळवे (चर्चा) ०९:१०, १ एप्रिल २०१८ (IST)

असला कसलाही प्रत्यक्ष संदर्भ अस्तित्त्वात नाही, 64 विषय कोणते ? त्याबाबतची यादी कुठे लिहीली आहे?‌ हे बघ माझा भिमा विद्वान होता हे मला माहित आहे पण भिमानी 64 विषयात पदव्युत्तर परिक्षा पास केली होती हे खर नाही. एका विषयात मास्टर करायला 2 वर्षे सगळ्या विद्यापीठात लागतात काही ठिकाणी एक वर्षांची आहे असं म्हणलं तरी एका वेळेला एकच डिग्री करता येते हा सगळी कडचा नियम आहे त्यामुळे 64 वर्षे निदान लागतील. आणि आपला भिमा 65 व्या वर्षी जगाला सोडून गेला. सगळा हिशेब केलास तर हे शक्यच नाहीये हे कळते शिवाय शिक्षणावर वेगळा विभाग आधीच आहे.

वर दिलेली सगळी यादी ही दिलेल्या उपाधींची असेल पण त्या सुध्दा कोणी आणि कुठे दिल्या ह्याच्या संदर्भासह म्हणजे वास्तविक संदर्भासह त्यावेळच्या वर्तमान पत्रानुसार किंवा मान्यताप्राप्त पुस्तकात उल्लेखानुसार पहावी लागेल. 64 विषयात अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता असे कुठे उल्लेखले आहे त्याचा वैध संदर्भ दाखव, पेपर मध्ये आलेली बातमी नकोय, शिवाय इंग्रजीमधला आंबेडकर लेख वाचा एकदा तो कसा लिहीला आहे हे पहा जेणेकरुन तुम्हांला कळेल की, काय लिहायला पाहिजे आणि कसे लिहायला पाहिजे. WikiSuresh (चर्चा) ०९:५६, १ एप्रिल २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgSureshkhole: ६० अभ्यासक्रमास प्रवेश बाबत कोलंबिया विद्यापीठाच्या रजिस्टार चा संदर्भ पुढील दुव्यात आहे. तसेच वेबसाईट देखील पश्चिमात्य आहे. अर्थात ६४ विषयात मास्टरी वगेरे मजकूर लेखात टाकायचा नाहीच परंतु ६० अभ्यासक्रम अभ्यासाचा संदर्भ लेखात आवश्यक आहे असे वाटते पहावे:: कोलंबिया विद्यापीठात असताना तीन वर्षाच्या काळात त्यांनी ६० अभ्यासक्रमात शिक्षण घेतले ज्यात अर्थशास्त्रातील २९ अभ्यासक्रम, इतिहासातील ११, समाजशास्त्रीय ६, तत्त्वज्ञान ५, मानवशास्त्र ४, राज्यशास्त्रात ३ फ्रेंच आणि जर्मन विषयात प्रत्येकी एक. [३] बाबासाहेब आंबेडकर परदेशात अर्थाशात्रात डॉक्टोरेट मिळवणारे पहिले भारतीय होते याशिवाय दक्षिण आशियायी देशात ते दोन वेळा डॉक्टोरेट मिळवणारे पहिले भारतीय होते. ते त्यांच्या पिढीतील सर्वात जास्त उच्च विभूषित भारतीय होते.[४][५] प्रसाद साळवे (चर्चा) १०:३६, १ एप्रिल २०१८ (IST)
Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे:

कोलंबीया विद्यापीठाच्या कुठल्या संकेतस्थळावर/प्रकाशनात याचा उल्लेख आला आहे त्याचा पुरावा द्या, दुसऱ्या ठिकाणी आलेली बातमी नको, आणि मला पाश्चात्य संदर्भ नकोय मला वैध संदर्भ हवा आहे.WikiSuresh (चर्चा) ११:०२, १ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgप्रसाद साळवे: Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे:

वारंवार तेच मुद्दे चर्चेला समोर घेतले जात आहेत, आणि त्यावर अंमल काहीही होत नाहीये, मला वाटते माझ्याकडून हा लेख सुधारण्याचा हा मी शेवटचा प्रयत्न करित आहे, ह्यावर विचार होणार नसेल तर मी ह्या लेखासाठी मी माझे संपादन थांबविन.

 1. इ.स. २०१४ साली कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात शिकलेल्या एकूण विद्यार्थांमधून पहिल्या १०० बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात बुद्धिमान विद्यार्थी (फर्स्ट कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम) म्हणून घोषित केले आहे. ह्या वाक्याला दिलेल्या तीनही संदर्भातून हे स्पष्ट कळले की शंभरात पहिला वगैरे असले काहीही नाहीये, शिवाय हा ब्लोग असल्याने त्याचा संदर्भ काढला पाहिजे.
 2. आंबेडकरांचे आडनाव सकपाळ > आंबावडेकर > आंबेडकर कसे झाले? याचा संदर्भ ह्या पुस्तकात पुसटसा येतो, तो पाहुन योग्य त्या सुधारणा करता येतील.
 3. भिमाचे शिक्षक ज्यांनी आडनाव दिले ते देवरुखे होते, देशस्थ होते असे वेगवेगळे उल्लेख वेगळ्या संदर्भात येतात, मला वाटते ते कोण होते हा मुद्दाच सध्या काढून टाकल्यास आपण, ही खेचाखेची थांबवू शकतो कारण तो मुद्दासुध्दा अनेकदा संपादीत झाला आहे.
 4. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात पुढे पंजाब केसरी म्हणून प्रसिद्ध झालेले लाला लजपतराय यांच्याशी भीमरावांची ओळख झाली. भीमराव आंबेडकर ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत. असा विद्यार्थी कोण याची उत्सुकता लाला लजपतराय यांना होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. लाला लजपतराय हे लंडनहून न्यूयॉर्कला आलेले होते. असेच एकदा या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तिथे आले. त्यांनी सुद्धा या दोघांच्या संवादात भाग घेतला. प्रा. सेलिग्मन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान ऐकून होते. त्यांनी लजपतरायांसमोर विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल गौरोद्गार काढले, ते म्हणाले, “भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत.”

ज्यू धर्मीय प्रा. सेलिग्मन आंबेडकरांचे पी.एच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. अमेरिकेत जाईपर्यंत भीमरावांचे अनेक गुण सुप्‍तावस्थेमध्ये होते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांचा विकास करण्याचे काम प्रा. सेलिग्मन आणि इतर विद्वानांकडून झाले. अमेरिकेतील वास्तव्यात आंबेडकरांना काही चांगले मित्र आणि विद्यापीठातील प्राध्यापक, मार्गदर्शक लाभले. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता. सिडनेहॅम कॉलेजमध्ये शिकवत असताना आंबेडकरांनी अनेक विद्यार्थ्यांना कोलंबिया विद्यापीठात प्रा. एडविन सेलिग्मन यांच्याकडे पाठवले होते. ह्या सबंध मजकूराची उल्लेखनीयताच प्रश्नाकिंत आहे, यातून आंबेडकरांविषयी काहीच नविन माहित होत नाही.

 1. कोलंबिया विद्यापीठात असताना तीन वर्षाच्या काळात त्यांनी ६० अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले ज्यात अर्थशास्त्राचे २९ अभ्यासक्रम, इतिहासाचे ११, समाजशास्त्राचे ६, तत्त्वज्ञानाचे ५, मानववंशशास्त्राचे ४, राज्यशास्त्राताचे ३, फ्रेंच आणि जर्मन विषयाचे प्रत्येकी एक. असा उल्लेख मलातरी कुठल्याच संदर्भात सापडलेला नाही, जो संदर्भ मला सापडला तो इथे आहे, आणि तो संदर्भाचा मजकूर असा आहे, During Ambedkar's time at Columbia he would sit for hours studying in *Low Library*; the rotunda then housed the main reading room. His *coursework* during his three years (including summers) at Columbia consisted of: 29 courses in economics, 11 in history, 6 in sociology, 5 in philosophy, 4 in anthropology, 3 in politics, and 1 each in elementary French and German. (Source: Office of Registrar, Columbia University.)

ज्याच्यात कोर्सवर्क असा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ पेपर किंवा एका विषयाचा थोडक्यात अभ्यास आपल्याकडे बी.ए. पास व्हायला 6+6+6 = 18 पेपर, एम.ए. पास व्हायला 8+8 =असे 16 पेपर करावे लागतात. काही विद्यार्थी आवश्यक असलेले 18/16 पेपर बरोबर इतर विषयांचेही पेपर करतात, ह्याचा अर्थ असा नाही की ते त्यात मास्टर झालेत, ते मास्टर एकाच विषयात होतात. असा हिशेब केला तर मी आत्तापर्यंत बी.ए. 18+एम.ए.16+डिप्लोमा 4+डिप्लोमा 8+पी.एचडी 12=एकूण 58 अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले आहे. हाहाहा. असो विनोद सोडा, संदर्भ व्यवस्थीत वाचायला शिका. आणि वरील मजकूर काढून टाका कारण ती माहिती निरुपयोगी आहे.

 1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते. ह्याचा संदर्भ दुवा मेलेला आहे, त्यामुळे दुसरा द्यावा लागेल किंवा सगळा मजकूर काढावा लागेल सर्व मजकूराला एकही संदर्भ नाही.
 2. बाबासाहेब आंबेडकर परदेशात अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएचडी) मिळवणारे पहिले भारतीय होते. याशिवाय संपूर्ण दक्षिण आशियातून दोन वेळा डॉक्टरेट (पीएचडी व डी.एससी.) मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. बाबासाहेब त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक बुद्धिमान व सर्वाधिक उच्च विभूषित भारतीय व्यक्ती होते. असला कसलाही वैध पुरावा नाही, शिवाय असे ह्यात पहिला त्यात पहिला असले मुद्दे कुठेच उपयोगाचे नाही, खोटेपणाने रेटलेले तर बिलकूलच नाहीत.
 3. अनेक मुद्द्यांना संदर्भ नाहिये त्या ठिकाणी मी संदर्भ हवा हा साचा लावत आहे, तो संदर्भ भरुन् पुर्ण करावा किंवा मजकूर काढावा.

ठरल्याप्रमाणे ब्लोगचे व युट्यूब विडीयोचे संदर्भ चालणार नाहीत, तसेच 12 तथ्ये, 21 तथ्ये अश्या बातम्यांचे संदर्भ चालणार नाहीत, ते कुठल्याच विकीवर चालत नाहीत. संदर्भ देण्याबाबत अडचण असेल तर मी मदत करिनच पण, विधाने तुम्ही केली असतील तर त्याला संदर्भ तुम्हांलाच शोधावे लागतील, ते लिहायला मदत मी करु शकतो. WikiSuresh (चर्चा) १६:५०, ३ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole:
१) कोलंबिया विद्यापीठातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी याला लोकमत बातमीचा अधिकृत संदर्भ आहे, आणि तो आपण मान्य करावा. उगाच विषय तानवू नये.
२) बाबासाहेबांच्या आडनावासाठी किमान 'माझी आत्मकथा' हे बाबासाहेबांचे पुस्तक वाचा, सकपाळ –> आंबडवे –> आंबेडकर हे कसे झाले कळेल.
३) बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कृष्णा केशव आंबेडकर नावाच्या ‘देवरुखेब्राह्मण शिक्षकाने त्यांना आपले 'आंबेडकर' हे आडनाव दिले आहे, ते शिक्षक 'देशस्त' नव्हत आणि याचे संदर्भ लेखात दिलेले आहेत. ते शिक्षक 'केवळ' ‘ब्राह्मण’ होते म्हणून हा आडनावाचा मुद्दा लेखातून काढून टाकायला, या तुमच्या मताशी मी सहमत नाही. यामुद्द्यावर परत वाद घालू नये. आणि इथे आपला ब्राह्मणद्वेष प्रकट करू नये.
४) काहीही न वाचता आपले बाबासाहेबांच्या प्रत्येक मुद्द्यालाच खोटे म्हणताय, तर आपण आंबेडकरांचे एखादे चरित्र वाचलेय का?? किमान मी संदर्भ म्हणून दिलेले वाचा डॉ. आंबेडकरांचे अंतरंग. यात लाला लजपत राय, सेलीग्मन व इतर बाबींचे सर्व पुरावे मिळतील. फक्त पुस्तक वाचण्याचे थोडे कष्ट करावे, ही विनंती.
आणि तुम्ही बाबासाहेबांच्या कोलंबिया विद्यापीठातील ६० कोर्सवर्क बद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण केले, आणि बाबासाहेबांनी अवघ्या '३ वर्षात' मिळवलेल्या या ६० कोर्सेसची तुलना तुम्ही स्वत:च्या बीए ते पीएचडी या '८-१० वर्षाच्या' कालावधीत मिळवलेल्या ५८ कोर्सवर्क शी केली, अहो किती मुर्खपणा हा!! तुम्ही या मुद्द्यात आम्हाला कोर्सवर्क बद्दल तत्त्वज्ञानाच्या पद्धतीने फोडून सांगितले, मात्र तो आम्हाला आधीच माहिती आहे. आम्ही कोर्सवर्क साठी पर्यायी शब्द 'अभ्यासक्रम' वापरला, पण ते मास्टर झाले किंवा मास्टरी वगैरे लेखात काहीही नाही. म्हणून येथील अनावश्यक सल्ले आपल्याजवळच ठेवावेत. आपणच संदर्भ व्यवस्थीत वाचायला शिका. आणि लेखातील हा मजकूर योग्य असून ती माहिती उपयोगी आहे.
६) ‘कृषी व शेतकऱ्यांसाठीचे कार्य’ या विभागात बाबासाहेबांच्या कृषी व शेतकऱ्यांविषयींच्या कार्याचे अनेक संदर्भ मिळू शकतात, मात्र त्यात 'वैध' संदर्भ नाही म्हणत सर्व विभागच काढावा, हा मस्त शोध आहे बुवा तुमचा!!!
७) बाबासाहेब हे अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे भारतात आशियात पहिले आहेत, हे सर्व खरे असून याचे संदर्भ आहे. मात्र याबाबत तुमचा अजिबात अभ्यासच नसल्याने आपण प्रत्येक ठिकाणी (विषेशत: संदर्भात) प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहात.
८) आणि तुम्ही संदर्भ साचा प्रत्येक वाक्यालाच लावत चला, कारण तेच बाकी राहिलयं आता! नाहितर लेख रिकामा करत चला. वाह! भारीच आहे हे.
तुम्ही पहिल्यांदा फक्त याच लेखाला संदर्भाबाबतचे अत्यंत कडक निषक लागू केलेत, संदर्भ जोडलेले असतानाही (अर्थात हे लोकमत, सकाळ इ. विश्वसनिय बातम्याचे स्त्रोत आहेत) त्याला अवैध मानत अधिकच्या भक्कम संदर्भांचे हट्ट धरले, हे योग्य नव्हे. आणि हीच अघोरी पद्धत आपण इतर मुखपृष्ठ झालेल्या तसेच इतरही लेखात का वापरली नाही?
लेखात ब्लॉगचे संदर्भ चालत नाहित, हे आम्हाला परत परत सांगणे बंद करा, कारण आम्ही ब्लॉगचे संदर्भ वापरत नाही, युटूबचे व्हिडिओ लिंक्स तुम्ही बाह्य दुव्यात टाकू शकता. आणि परत परत लहान बालकाप्रमाणे, लेखातील अमकी-फलानी सारी विधाने आम्हीच निर्माण केली असा जावाईशोध लावू नका, तुम्ही कधी संदर्भ शोधणे सुरू करणार आहात? एप्रिल झल्यावर का? बहुतेक कधीच नाही... --संदेश हिवाळेचर्चा १७:४९, ३ एप्रिल २०१८ (IST)

स्वरूप[संपादन]

नमस्कार Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, आर्या जोशी:

(१) लेखात नेमक्या काय काय अविश्वकोशीय बाबीं/संदर्भ आहेत? कृपया याचे स्पष्टिकरण द्यावे, सुधारणा केल्या जातील. आणि आपण लेखात कित्येक संदर्भ साचे वापरले गेले आहेत, त्यांना आम्ही संदर्भ द्वायचे नाहीत का? संदर्भ म्हणून आम्हीच ब्लॉग लिंक नक्कीच घातल्या नाहीत. मुखपृष्ठासाठी विरोध करण्यापेक्षा लेखात संपादन करुन लेख सुधारण्यास सहकार्य करावे. लेख प्रचंड मोठा असल्याने यात सर्वच योग्य गोष्टी करणे आम्हालाही सहज शक्य होत नाही, हे आपण समजून घ्यावे. (२) आणि लेखात कोणती चूकीची माहिती नव्याने भरली जातेय, हे ही सांगावे. १५०+ संदर्भ म्हणजेच इंग्रजी लेखापेक्षा जास्त संदर्भ लेखात वापरण्यात आलेले आहेत. सर, केवळ संदर्भ साचे लावून व अनावश्यक मजकूर हटवून लेख सुधारणार नाही तर लेखात आवश्यक संदर्भ घालूनआवश्यक मजकूर वाढवल्यानेही लेख सुधारतो, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, ३ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १७:१०, ३ एप्रिल २०१८ (IST)

मी त्याच मुद्यांबाबत वर लिहीले आहे ते तपासून पहा. WikiSuresh (चर्चा) १७:१८, ३ एप्रिल २०१८ (IST)

१) याला लोकमत बातमीचा अधिकृत संदर्भ आहे, आणि तो आपण मान्य करावा. उगाच विषय तानवू नये.
२) किमान 'माझी आत्मकथा' हे बाबासाहेबांचे पुस्तक वाचा, सकपाळ –> आंबडवे –> आंबेडकर हे कळेल.
३) आंबेडकरांच्या एका शिक्षण ब्राह्मणाने त्यांना आपले आडनाव दिले, याचे संदर्भ दिलेले आहेत, यावर परत वाद घालू नये.
४) आपले आंबेडकरांचे एखादे चरित्र वाचलेय का?? किमान मी संदर्भ म्हणून दिलेले वाचा 'डॉ. आंबेडकरांचे अंतरंग', लाला लजपत राय, सेलीग्मन व इतर बाबींचे सर्व पुरावे मिळतील. फक्त पुस्तक वाचण्याचे कष्ट करावे, ही विनंती.
आणि तुम्ही कोलंबिया विद्यापीठातील ६० कोर्सवर्क. तुम्ही या मुद्द्यात आम्हाला कोर्सवर्क बद्दल तत्त्वज्ञानाच्या पद्धतीने फोडून सांगितला, मात्र तो आम्हाला माहिती आहेच. आम्ही कोर्सवर्क साठी पर्यायी शब्द अभ्यासक्रम वापरला, पण मास्टर वगैरै नाही. म्हणून येथील सल्ले अनावश्यक आपल्याजवळच ठेवावेत. यात अभ्यासक्रमाच्या ऐवजी कोर्सवर्क करून हा मुद्दा संपुष्ठात आणा.
६) शेतकऱ्यांसाठीचे त्यांचे याचे अनेक संदर्भ विभागात आहेत. एक संदर्भ नाही म्हणून सर्व विभागच काढा, मस्त शोध आहे बुवा तुमचा!!!
७) अर्थशास्त्रात भारतात आशियात ते पहिले आहे, हे सर्व खरे आहे. मात्र याचा तुमचा अजिबात अभ्यास नाही म्हणून म्हणतोय की तुम्ही बाबासाहेब वाचाच. मग कळेल.

८) आणि तुम्ही संदर्भ साचा प्रत्येक वाक्याला लावत चला, तेच बाकी राहिलयं आता. नाहितर लेख रिकामा करत चला. वाह! भारीच आहे हे.

तुम्ही विरोध करयचा म्हणून विरोध करताय फक्त, समस्या काय आहे?? संदर्भ असताना भक्कम संदर्भांचे हट्ट करणे योग्य नव्हे. आणि हीच अवकाळी पद्धत आपण इतर मुखपृष्ठ झालेल्या लेखात का वापरली नाही. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर वाचा एकदा, वरील सर्वच संदर्भ तुम्हाला मिळतील. ज्याला संदर्भनको, ही तेथे संदर्भ मागा, अनावश्यक ठिकाणी नको, विनंती. --संदेश हिवाळेचर्चा १७:४५, ३ एप्रिल २०१८ (IST)


४) --संदेश हिवाळेचर्चा १७:४५, ३ एप्रिल २०१८ (IST)

तुमच्या डोक्यात अजून कसे गेले नाही की लेखात आम्ही ब्लॉगचे संदर्भ वापरत नाही, युटूबचे व्हिडिओ लिंक तुम्ही बाह्य दुव्यात टाका. आणि बालकाप्रमाणे, विधाने आम्ही निर्माण केली असा शोध लावू नका, तुम्ही कधी संदर्भ शोधणे सुरू करणार आहात? एप्रिल झल्यावर का?--संदेश हिवाळेचर्चा १७:४९, ३ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १७:४९, ३ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, आर्या जोशी, संदेश हिवाळे:

1) +2) +3) +4) मी काय वाचलय आणि काय नाही, आणि तुम्ही किती वाचता ह्या पेक्षा आपण इथे संदर्भ म्हणून काय दिले आहे हे महत्त्वाचे आहे,
आणि तुम्ही कोलंबिया विद्यापीठातील ६० कोर्सवर्क. तुम्ही या मुद्द्यात आम्हाला कोर्सवर्क बद्दल तत्त्वज्ञानाच्या पद्धतीने फोडून सांगितला, मात्र तो आम्हाला माहिती आहेच. आम्ही कोर्सवर्क साठी पर्यायी शब्द अभ्यासक्रम वापरला, पण मास्टर वगैरै नाही. म्हणून येथील सल्ले अनावश्यक आपल्याजवळच ठेवावेत. यात अभ्यासक्रमाच्या ऐवजी कोर्सवर्क करून हा मुद्दा संपुष्ठात आणा. इतके दिवस आपणच हा मुद्दा 60 विषयात मास्टर अश्या नावानी धरुन ठेवला होता वरच्या चर्चेत दिसत आहे. आता मी संदर्भ दाखवल्यावर कुठे मान्य केले की, कोर्सवर्क पण मी तेच म्हणतोय की 60 कोर्सवर्क करणे ह्यात काहीच नविन नाही, मी सुध्दा 58 केले आहेत त्यामुळे हा मुद्दाच मुळात उल्लेखनीय नाही असे माझे मत आहे.
माझा अभ्यास आहे की नाही तो मुद्दा नाही, अर्थशास्त्रात बाबासाहेब पहिले असतील तर त्याचा कुठेतरी उल्लेख कसा नाही? संदर्भ मिळायला हवा की नाही? द्या संदर्भ त्याला मग.
ब्लोग म्हणजे blogspot.com, weebly, webdunia, speakingtree, dalitskerala.wordpress, ह्या सर्वांचे संदर्भ ग्राह्य नाहीत. ते मी काढत आहे शिवाय काही संदर्भ अजुनही आहेत.
हो प्रत्येक वाक्याला नव्हे विधाना संदर्भ हवा आहे, नाहीतर ते विधान ग्राह्य धरता येत नाही, हा विश्वकोष आहे बाळा, निबंध स्पर्धा नाही,
शेतकऱ्यांच्या भागाला संदर्भ नाहीत, ते द्यावे लागतील नाहीतर् नियम तोच आहे, संदर्भ द्या नाहीतर मजकूर काढा.
मला सध्या वेळ देण शक्य आहे, शिवाय एकदा आंबेडकर, जाती व्यवस्था असे लेख मजबूत झाले की मी बाकीच्या लेखांवर आक्रमण करणार आहे, आणि तिथली सुध्दा सुधारणा करणार किंबहुना करतो आहे आपल्याला इतर बदल दिसत नसावेत. म्हणून मी ह्या लेखाच्या मागे लागलो आहे असे आपले विधान संदर्भ हीन आहे त्यालाही संदर्भ द्या असा साचा लावला पाहिजे. WikiSuresh (चर्चा) १८:०७, ३ एप्रिल २०१८ (केलेय
तुम्ही 60 विषयात मास्टर आणि 60 विषयात कोर्सेस यांचा संबंध बांधण्याचा आरोप माझ्यावर का ठेवलात?? जोशींप्रमाणे उलटसुलट आरोप करू नका, कुणी काय लिहिले होते होते निट पहून मगच आरोप करावा. बाबासाहेब 60 विषयात मास्टर होते हा जावाईशोध तुम्ही कुठून लावला ??--संदेश हिवाळेचर्चा १९:२५, ३ एप्रिल २०१८ (IST)


बाबासाहेबांनी 60 कोर्सेस केलेत, ते तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत, कारण काय तर

तुम्ही पण 58 कोर्सेस केले आहे म्हणता, मग बाबासाहेबा प्रमाणे तुम्ही पण या दरम्यान पीएचडी व मास्टर डिग्री घेतली का? --संदेश हिवाळेचर्चा


सगळ्या सदस्यांना नम्र विनंती - आपल्या संदेशात नम्रपणा ठेवावा आणि इतर मुद्द्याचे खंडन करताना सदस्यांशी हमरीतुमरीवर येउन बोलू नये.
हा कोणाचीही बाजू घेण्याचा किंवा कोणाला मागे खेचण्याचा प्रयत्न नसून मराठी विकिपीडियावरील संवाद सुरळीत आणि समंजसपणाचा असावा हा आग्रह.
धन्यवाद
अभय नातू (चर्चा) ०९:२०, ४ एप्रिल २०१८ (IST)

होय, धन्यवाद सर.--संदेश हिवाळेचर्चा ०९:५५, ४ एप्रिल २०१८ (IST)

नकल-डकव[संपादन]

फ़क्त नोंद म्हणून, हा लेख मुखपृष्ठ सदर म्हणून आणण्याचा विचार करणाऱ्या सर्वांनी ह्या निकालाकडे एक नजर टाकावी ज्यात ह्या लेखाचा मोठा प्रताधिकाराचे उल्लंघन करुन नकल डकव केलेला आहे हे स्पष्ट दिसते. त्यामुळे मुळापासून हा लेख पुन्हा लिहीण्याची अत्यंतिक गरज निर्माण होते. WikiSuresh (चर्चा) २१:३९, ६ एप्रिल २०१८ (IST)

वरील उपयोजन वापरुन येथे उद्धृत केल्याबद्दल धन्यवाद.
प्रताधिकारभंग असलेला मजकूर मराठी विकिपीडियावर चालत नाही. असा मजकूर लगेचच काढला जातो किंवा शहानिशा करण्यासाठी लगेच पावले उचलली जातात.
असे असता वरील निकालांतील ५०%पेक्षा जास्त कॉन्फिडन्स पातळी असलेला मजकूर झाकला जात आहे. पुढील काही वेळात त्यात बदल टाकोटाक केले जावेत. असे बदल न झाल्यास हा मजकूर वगळला जाईल.
अभय नातू (चर्चा) २२:४२, ६ एप्रिल २०१८ (IST)

प्रताधिकारित मजकूर शंका[संपादन]

वरील अहवालावरुन नकल-डकव केलेला मजकूर (५०+% कॉन्फिडन्स पातळी) {{प्रताधिकारित मजकूर शंका}} हा साचा वापरुन झाकलेला आहे. डोळेझाक करुन हा साचा न लावता प्रत्येक अहवालाचा आढावा घेउन मगच लावलेला आहे. जेथे फॉल्स पॉझिटिव्ह[मराठी शब्द सुचवा] आहेत तेथे साचा लावलेला नाही, उदा. नावे, गावे, तारखा, इ. याशिवाय इतरांची वाक्येही या साच्यातून गाळलेली आहेत, उदा. आचार्य अत्र्यांचे लेखन. हे जरी स्रोतातून जसेच्या तसे उचललेले असले तरी ते या स्रोताचा मजकूर नसून मूळ प्रकाशनातील आहे. तसेच ही वाक्ये अवतरण चिह्नांत असल्याने विकिपीडियावरील मजकूर नसून कोणीतरी उच्चारलेल्या वाक्यांना उद्धृत केल्याचे उघड आहे.

झाकलेला मजकूर लवकरात लवकर बदलून स्वतःच्या शब्दात लिहून काढावा ही विनंती.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २३:२२, ६ एप्रिल २०१८ (IST)


Gnome-edit-redo.svgअभय नातू: नमस्कार,
आंबेडकर चरित्रात्मक पुस्तकांतून माहिती गोळा करून नकल-डवक मजकुरात योग्य ते बदल केले जातील, धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १२:१२, ७ एप्रिल २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १२:१२, ७ एप्रिल २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgSureshkhole: अज्ञानापोटी अनेक महत्त्वपूर्ण व संदर्भ असलेले बरेचशे मजकूर तुम्ही हटवलेत, मजकूर सविस्तर पाहतो नंतर.--संदेश हिवाळेचर्चा २३:४६, ११ जुलै २०१८ (IST)

Gnome-edit-redo.svgसंदेश हिवाळे:आपण मजकूर परतवणे थांबवावे, कारण प्रत्येक ठिकाणी मी मजकूर का काढला आहे त्याचे संदर्भ दिले आहेत.Gnome-edit-redo.svgअभय नातू: प्रचालकांनी तातडीने लक्ष देऊन हस्तक्षेप करावा. मी सध्या त्यावर काम करित आहेत हिवाळेंनी विकिपीडीया सोडले आहे, तेव्हा आपली लूडबूड थांबवावी.WikiSuresh (चर्चा) ००:००, १२ जुलै २०१८ (IST)

मी विकिपीडिया सोडली की धरली हा माझ्या अधिकारातला विषय आहे, म्हणून आपले फुकटचे सल्ले स्वतःजवळच ठेवा.--संदेश हिवाळेचर्चा १६:५३, १२ जुलै २०१८ (IST)

संदर्भ[संपादन]

 1. ^ Ingole, Amit. "Babasaheb Ambedkar 61st Death Anniversary: Why this person is called 'Mahamanav' | महापरिनिर्वाण दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव का म्हटलं जातं ?". India.com (इंग्रजी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले.
 2. ^ "आंबेडकर जयंती: बाबा साहेब से जुड़ीं 10 रोचक बातें- Navbharattimes Photogallery". https://navbharattimes.indiatimes.com (हिंदी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
 3. ^ रजिस्ट्रार ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफिस
 4. ^ "B R Ambedkar: 10 Facts You Probably Don't Know About the Father of the Indian Constitution". The Better India (इंग्रजी भाषेत). 2017-04-14. 2018-04-01 रोजी पाहिले.
 5. ^ "25 Unknown facts about B. R. Ambedkar". www.speakingtree.in. 2018-04-01 रोजी पाहिले.