गुरुमुख सिंग मुसाफिर
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १५, इ.स. १८९९ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जानेवारी १८, इ.स. १९७६ दिल्ली | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
उल्लेखनीय कार्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
ग्यानी गुरुमुख सिंग मुसाफिर (१५ जानेवारी १८९९ - १८ जानेवारी १९७६) हे एक भारतीय राजकारणी आणि पंजाबी भाषेतील लेखक होते. ते १ नोव्हेंबर १९६६ ते ८ मार्च १९६७ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. [१]
त्यांना १९७८ मध्ये त्यांच्या उर्वर पर या लघुकथा संग्रहासाठी पंजाबी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दिला होता. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण, हा भारतीय नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. [२]
जीवन
[संपादन]गुरुमुख सिंगचा जन्म १५ जानेवारी १८९९ रोजी कँपबेलपूर मधील अधवाल (सध्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रावळपिंडी जिल्हा) येथे एका छोट्या जमीनधारक शेतकरी कुटुंबात झाला.[३]
त्यांनी गावातील प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि नंतर माध्यमिक शाळेची परीक्षा पास करण्यासाठी रावळपिंडीला गेले. १९१८ मध्ये ते खालसा हायस्कूल, कल्लर येथे शिक्षक झाले. तेथे चार वर्षे शिक्षक असताना त्यांना "ग्यानी" ही उपाधी मिळाली व पुढे "मुसाफिर" हे टोपणनाव त्यांनी निवडले.
१२ मार्च १९३० ते ५ मार्च १९३१ या कालावधीत अकाल तख्तच्या शीख धर्माच्या सर्वोच्च धार्मिक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.[४]
राजकीय कारकीर्द
[संपादन]मुसाफिर १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत त्यांना अटक झाली. सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनाचा भाग म्हणून त्यांना अटकही झाली.
१९४९ मध्ये ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. त्यांनी १२ वर्षे अध्यक्षपद भूषवले आणि काँग्रेस कार्यकारिणीचे निवडून आलेले सदस्यही होते. ते १९५२, १९५७ आणि १९६२ मध्ये अमृतसर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत लोकसभेवर निवडून आले. १९६६ मध्ये, त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि पंजाब राज्याची पुनर्रचना झाल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. १९६७ मध्ये त्यांनी अमृतसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सत्यपाल डांग यांनी त्यांचा पराभव केला. [४] ते १९६८ ते १९७४ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते.[५] १८ जानेवारी १९७६ रोजी मुसाफिरचा दिल्लीत मृत्यू झाला.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Archived copy". 13 February 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 December 2006 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Padma Awards Directory (1954–2007)" (PDF). Ministry of Home Affairs. 30 May 2007. 10 April 2009 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
- ^ Singh, Khushwant (2011). Sikhoṃ kā itihāsa (हिंदी भाषेत). Kitabghar Prakashan. ISBN 978-81-908204-4-8.
- ^ a b c Walia, Varinder (20 April 2006). "A Giani, a Gurmukh and a Musafir". The Tribune. 2019-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 June 2009 रोजी पाहिले.
- ^ Singh, Roopinder (25 December 2008). "Musafir: Politician on wings of poesy". The Tribune. 14 June 2009 रोजी पाहिले.
- Pages using the JsonConfig extension
- CS1 maint: archived copy as title
- Uses of Wikidata Infobox with no given name
- पंजाबी लेखक
- २०व्या शतकातील भारतीय लघुकथा लेखक
- भारतीय संविधान सभेचे सदस्य
- पंजाबी व्यक्ती
- शिरोमणी अकाली दल नेते
- ३ री लोकसभा सदस्य
- २ री लोकसभा सदस्य
- १ ली लोकसभा सदस्य
- इ.स. १९७६ मधील मृत्यू
- इ.स. १८९९ मधील जन्म
- पंजाबचे मुख्यमंत्री
- पद्मविभूषण पुरस्कारविजेते
- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते