Jump to content

खादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खादी विणताना महात्मा गांधी. मिर्झापूर, ९ जून १९२५
आंध्र प्रदेशच्या पोंडुरू येथील खादी. चित्र: जानेवारी २००९

खादी हा कापडाचा एक प्रकार आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशी कपड्यांचा पुरस्कार केल्यानंतर भारतात खादी हे कापड अधिक लोकप्रिय झाले.[१]आधुनिक काळात खादी पोशाख नव्या रंगसंगती आणि सजावट यांचा वापर करून अधिक आकर्षक केले जातात.[२]

इतिहास[संपादन]

महात्मा गांधी चरख्यावर सूत कातत असताना

खददर या शब्दापासून खादी हा शब्द तयार झाला आहे.खादी कापड तयार करण्याचे इतिहासातील संदर्भ इसवी सन १५०० पासून आढलून येतात असे मानले जाते.झाडावरून कापूस वेचणी, त्याची स्वच्छता करणे, त्यापासून कापड तयार करणे या कामामध्ये भारतीय कारागीर कौशल्यपूर्ण होते. महात्मा गांधी यांनी १९१८ साली भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्यासाठी स्वदेशी चळवळ सुरू केली त्या काळात खादी कापड तयार करण्याचा उपक्रम सुरू केला.[३]१९१७-१८ साली साबरमती आश्रम येथे प्रथम या कापडाची निर्मिती करण्याचा प्रयोग केला.कापडाचे हे सूत चरख्यावर विणले जात असे सुती धाग्यांपासून खादीचे कापड तयार केले जाते. यामध्ये रेशीम अथवा लोकरीचा धागाही मिसळला जातो ज्याची निर्मिती चरखा या यंत्राचा वापर करून केली जाते.[४] अखिल भारतीय काँग्रेस समितीने परदेशी कपड्याला पर्याय म्हणून भारतात वस्त्र उद्योगाला चालना देण्याचे ठरविले.त्यावेळी सुमारे २० लाख चरखे देशात उपलब्ध करून देण्यात आले. भारतात अधिकाधिक लोकांनी खादी कापड वाप्रावे यासाठी प्रसार करण्यात आला. हे कापड तयार करण्याच्या कामातून रोजगार निर्मिती व्हावी आणि उत्पादन चांगले व्हावे यासाठी अखिल भारतीय खादी मंडळाची स्थापना झाली.[५]

समाजात प्रसार[संपादन]

महात्मा गांधी सूत तयार करताना चित्रफीत

केवळ कारागीर लोकांनी नाही तर सर्वसामान्य माणसांनाही चरखा वापरून सूत तयार करता यावे यासाठी सूत कताई प्रशिक्षण देण्याला सुरुवात झाली. अंबर चरखा या संकल्पनेचा उदय झाला आणि खादी वस्त्रोद्योग या उपक्रमाला सुरुवात झाली. या कल्पनेचां प्रसार होवून भारतात खादी कापड वापरण्याची स्वीकारशीलता वाढली. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरही भारतात खादीचे कापड वापरणे सुरू राहिले. १९५७ साळी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे रूपांतर आयोग या रचनेत करण्यात आले.[६]

वस्त्रोद्योग विकास[संपादन]

खादी कापड तयार होत असताना

झगमगत्या जगात खादी[संपादन]

भारतीय स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्यासाठी खादी कापडाचा पुरस्कार भारतीय जनतेने केला. त्यानंतर आधुनिक काळात खादी हे केवळ ग्रामीण जनतेच्या वस्त्रासाठी वापरले जाणारे कापड अशी याची मर्यादित ओळख नाही. नवनवीन आणि आधुनिक वस्त्र प्रावरणे तयार करीत असलेल्या आधुनिक कालाकार मंडळी खादीचा वापर करून नावीन्यपूर्ण वस्त्रे तयार करतात. त्याच्या प्रसारासाठी प्रदर्शने भरविली जातात. महिला आणि पुरुष तसेच लहान मुले यांचे विविध पोशाख, घरात वापरायच्या विविध वस्तू, शोभेच्या वस्तू यामधूनही खादीचां वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परदेशातही खादी कापडाचे वापरकर्ते असल्याचे दिसते.[७]

हे ही पहा[संपादन]

चरखा

महात्मा गांधी

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kothari, Urvish (2021-09-22). "Gandhi said he would wear loin cloth only for a month. 100 yrs on, it's a permanent symbol". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2021-10-02 रोजी पाहिले.
  2. ^ "The khadi conversation in 2021" (इंग्रजी भाषेत). 2021-10-02. ISSN 0971-751X.
  3. ^ "Khadi and Village Industries Commission". www.kvic.gov.in. 2021-10-02 रोजी पाहिले.
  4. ^ "History of Khadi - A Symbol of Indian Freedom Struggle". Khadi Vastram Blog (इंग्रजी भाषेत). 2020-05-14. Archived from the original on 2021-09-24. 2021-10-02 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  5. ^ a b "खादी उद्योग". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2021-10-02 रोजी पाहिले.
  6. ^ "खादी उद्योग". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2021-10-02 रोजी पाहिले.
  7. ^ "From humble fabric to fashion favourite". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2021-10-01. 2021-10-02 रोजी पाहिले.