कोहिनूर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोहिनूर
कथा रामानंद सागर
पटकथा वजाहत मिर्झा
प्रमुख कलाकार दिलीप कुमार
मीना कुमारी
जीवन
लीला चिटणीस
कुमकुम
संवाद वजाहत मिर्झा
छाया फरीदून इराणी
गीते शकील बदायुनी
संगीत नौशाद
पार्श्वगायन लता मंगेशकर
आशा भोसले
मोहम्मद रफी
देश भारत
भाषा हिंदीकोहिनूर हा १९६०चा बॉलीवूड चित्रपट आहे. व्ही. एन. सिन्हा त्याचे निर्माते आहेत आणि एस. यू. सनी यांनी त्याला दिग्दर्शित केले आहे. दिलीप कुमार, मीना कुमारी, लीला चिटणीस आणि कुमकुम यांनी या चित्रपटाची अभिनय केला आहे.चित्रपटाचे फिल्मचा संगीत नौशाद यांचे आहे.

असे म्हणतात की देवदास सारख्या चित्रपटांत दुःखद भूमिका साकारल्याने दिलीप कुमार हे अत्यंत निराशावस्थेत गेले आणि त्यांच्या मनोचिकित्सकांने त्यांना विनाताण हसतखेळत व हलक्याफुलक्या भूमिका साकारण्याची शिफारस केली. कोहिनूर चित्रपटातील त्यांची भूमिका ही अशीच होती. कोहिनूरमध्ये दिलीप कुमार आणि मीना कुमारी यांना वेगवेगळ्या राज्यांचे राजकुमार व राजकुमारी म्हणून दर्शविण्यात आले आहे. त्यात तलवारयुद्ध , गाणे आणि नृत्य यासारख्या गोष्टी भरपूर आहेत. या चित्रपटात मीना कुमारी, ज्यांना अन्यथा 'दुःखाची राणी' म्हणून ओळखले जाते,यांनी काही दुर्मिळ विचित्र आणि मजेदार दृश्येदेखील रंगविलेली आहेत. तो चित्रपट हलका-फुलका होता आणि त्याच्या पूर्वीच्या चित्रपटांसारखे पात्रांचे उदात्तीकरण त्यात नव्हते. हा चित्रपट त्या वर्षातील एक मोठा यशस्वी ठरलेला चित्रपट होता.