Jump to content

केअरटेकर, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचा भाग
शीर्षक केअरटेकर, भाग १
पर्व क्रमांक
भाग क्रमांक
प्रक्षेपण दिनांक १६ जानेवारी १९९५ (1995-01-16)
लेखक मायकल पिलर
जेरी टेलर
दिग्दर्शक व्हिरिच कोल्बे
स्टारडेट ४८३१५.६ (२३७१)
भागांची शृंखला

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

पुढील भाग केअरटेकर, भाग २



केअरटेकर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१ तासांचे दोन भाग म्हणून विभाजित करण्यात आले आहे. पहिला भाग, १६ जानेवारी १९९५ रोजी दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित करण्यात आला. केअरटेकर, भाग १ हा स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, पहिला, व संपूर्ण मालिकेतलाही पहिला भाग आहे. दुसरा भाग, केअरटेकर, भाग २, हाही १६ जानेवारी १९९५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या संपूर्ण मालिकेत केट मुलग्रुने, कप्तान कॅथरीन जेनवेची भूमिका केली आहे. सुरुवातीला ह्या भागात कप्तान कॅथरीन जेनवेच्या भूमिकेसाठी जिनोव्हिव्ह बुझोल्डची निवड झाली होती, पण तिने मालिकेसाठी काम करणे मधेच सोडून दिले.

केअरटेकरया भागात असे दाखवले आहे की, नवीन तयार झालेल्या यू.एस.एस. व्हॉयेजर अंतराळजहाजाला, बॅड-लॅन्ड्‌स नावाच्या एका अंतराळातील एका जागेत, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या एका अंतराळ जहाजाचा शोध घ्यायची कामगिरी दिली जाते. शोध घेत असतांना, केअरटेकर नावाच्या प्रजातीचा प्राणी त्यांना पृथ्वीपासून ७०,००० प्रकाश वर्षे दूरअसलेल्या डेल्टा क्वाड्रंटमध्ये ओढतो.

कथानक

[संपादन]

केअरटेकरया भागाची सुरुवात, खालील दृश्यापासून सुरू होते.

फेडरेशन-कारडॅशियन कराराच्या मसुद्यांबाबत काही फेडरेशन वसाहतीतील लोक नाखूष होते.
हे लोक कारडॅशियन सीमारेषेलगत, फेडरेशन वसाहतीत राहत होते.
ह्या सर्वांनी एकत्र होऊन कारडॅशियन लोकांबरोबर लढण्यास सुरुवात केली.
ते लोक स्वतःला द माक्वी म्हणून घ्यायला लागले.
काही लोकांसाठी ते वीर आहेत, पण फेडरेशन व कारडॅशियन सरकारांसाठी ते अतिरेकी आहेत.

मग पुढे अंतराळात गोळीबार होत असतो व एक विटार नावाचे कारडॅशियन अंतराळजहाज, एका छोट्या जहाजावर हल्ला करत असते. त्या छोट्या जहाजाचा चकोटे नावाचा नियंत्रक असतो. हा माक्वींचा प्रमुख नेता आहे. जेव्हा चकोटे ते जहाज एकसंध ठेवण्याचा जिवावर उदार होऊन प्रयत्न करीत असतो, तेव्हा तो बिलाना टोरेस या त्याच्या जहाजातील मुख्य स्त्री-तंत्रज्ञीला योग्य ते करायला सांगतो. बिलाना त्याला नकार देत सांगते की जहाजाचे इंपल्स उड्डाण यंत्र (इंपल्स इंजिन) ३९ वर्ष जुने असल्यामुळे, काहीही करता येणार नाही .

मग पुढे कारडॅशियन जहाजाचा कप्तान गुल एव्हेक हा, चकोटेला पळण्याचा प्रयत्न न करता त्याच्या स्वाधीन होण्यास सांगतो. चकोटेत्या धमकीकडे लक्ष न देता, बिलानाला सांगतो की जर तिला जहाजाचे इंपल्स इंजिन फक्त ३० सेकंद चालू ठेवता आले, तर तो त्यांच्या जहाजाला बॅड-लॅन्ड्‌स नावाच्या अंतराळातील एका जागेत पोहचवू शकतो. बिलाना त्याला सुचवते की इंपल्स इंजिन ३० सेकंद चालू ठेवण्यासाठी अधिक शक्ती लागेल, व जर आपण शस्त्र-प्रणाली बंद केली तर तेथून वाचलेली शक्ती इंजिनाला देता येईल. टुवाक हा एक व्हल्कन प्रजातीचा, चकोटेच्या जहाजावरचा खलाशी असतो, या सूचनेचा विरोध करतो. बिलाना मग त्याला सत्य परिस्थिती सांगते की त्यांच्या जहाजाच्या शस्त्राघाताने त्या कारडॅशियन जहाजावर काहीही परिणाम नाही होत आहे व त्यांचे शस्त्र कारडॅशियन जहाजाविरुद्ध निरुपयोगी आहेत. चकोटे बिलानाच्या सूचनेला मानतो आणि मग टुवाकला शस्त्र-प्रणाली बंद करण्यास सांगतो व उरलेले सर्व फोटॉन टॉर्पेडो कारडॅशियन जहाजावर सोडण्यास सांगतो. टुवाक ते सगळे आदेश पाळतो. चकोटेचे जहाज बॅड-लॅन्ड्‌समध्ये शिरते, व ते कारडॅशियन जहाजसुद्धा त्यांच्या पाठोपाठ लगेचच त्या बॅड-लॅन्ड्‌स मध्ये शिरते. बॅड-लॅंडसमध्ये प्लाझमा वादळे असतात. त्यामुळे दोन्ही जहाजांना नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. चकोटेच्या जहाज नियंत्रणाच्या कुशल कामगिरीमुळे, त्यांचे जहाज त्या वादळांना चुकवत बॅड-लॅन्ड्‌स मध्ये खूप खोलवर जाते. कारडॅशियन जहाज मात्र दुर्दैवाने एका प्लाझमा वादळात सापडते व त्याचे भरपूर नुकसान होते. त्यामुळे ते कारडॅशियन जहाज चकोटेच्या जहाजाचा पाठलाग करण्याचे सोडून देते, व माघार घेऊन बॅड-लॅन्ड्‌सच्या बाहेर पडते. टुवाक चकोटेला कळवतो की कारडॅशियन जहाज सर्व कारडॅशियन लहरींवर संकट-मदत संदेश पाठवत आहेत. हे एकून चकोटेला बरे वाटते व तो त्यांच्या जहाजाची दिशा जेथे त्यांच्या जहाजाची दुरुस्ती होऊ शकते, अशा एका जवळच्या ग्रहाकडे वळवितो. त्याच वेळेस एकाएकी, त्यांच्या सर्व जहाजात एकदम प्रखर व तेजस्वी प्रकाश झकमगतो. टुवाक कळवतो की त्यांचे जहाज एका संलग्नित टेट्रियॉन प्रकाश झोतातून गेले आहे व त्यांच्या जहाजाला ढकलू शकणारी एक खूप मोठी राक्षसी लाट त्यांच्याकडे तीव्र गतीने येत आहे. हे ऐकून चकोटे त्यांच्या जहाजाला त्या लाटेच्या मार्गातून काढण्याचा प्रयत्न करण्यास सुरू करतो व बिलानाला विचारतो की इंपल्स इंजिन मध्ये काही शक्ती बाकी आहे का? जेव्हा ती राक्षसी लाट त्यांच्या जहाजाला धडकते, तेव्हा चकोटेचे जहाज हळूहळू बाजूला जाण्यास सुरुवात झालेली असते..

मग पुढे हे कथानाक पृथ्वीकडे वळते जेथे न्यू झीलंडच्या एका पुनर्वसनी तुरुंगात, काही कैदी काम करत असतात, व एका कैद्याला एक अधिकृत वाटणारी महिला टॉम पॅरिस या नावाने संबोधते. तो कैदी वळून बघतो व ती महिला स्वतःला कॅथरीन जेनवे म्हणून ओळख देते. कॅथरीन मग सांगते की तिने टॉमच्या वडिलांबरोबर यु.एस.एस. अल-बतानी येथे काम केले आहे व तिला एका कामासाठी टॉमची मदत हवी आहे. ती टॉमला कळवते की या पुनर्वसनी तुरुंगातील अधिकाऱ्यांना टॉमचे काम पसंतीस आले आहे, व त्यांनी कॅथरीनला तिच्या कामासाठी टॉमची मदत घेण्यास परवानगी दिली आहे. मग कॅथरीन पुढे सांगते की तिला माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या, बॅड-लॅंडस्मध्ये एक आठवड्यापूर्वी गायब झालेल्या अंतराळ जहाजाचा शोध घ्यायची कामगिरी दिलेली आहे. टॉम विरोध करत तिला सांगतो की, ज्याने बॅड-लॅन्ड्‌समधील प्लाझमा वादळातून सुखरूप मार्गक्रमण केले आहे असे त्याला स्टारफ्लिटचे एकही अंतराळ जहाज आठवत नाही . टॉमच्या या विरोधाला कॅथरीन प्रत्युतर देत म्हणते की टॉमने यू.एस.एस. व्हॉयेजर अजून पाहिलेले नाही . टॉम मग कॅथरीनला सांगतो की मूळ हेतु त्याच्या माक्वी सोबतींचा शोध घेणे हा आहे, पण तो त्यांच्या सोबत फक्त थोडेच आठवडे असल्याने त्याला त्यांचे गुप्त ठिकाण माहीत नाही . याला प्रत्युतर देत कॅथरीन म्हणते कि बॅड-लॅन्ड्‌सची सर्वात चांगली माहिती फेडरेशनमधील टॉमशिवाय कोणालाच नाही व तिच्या जहाजाचा मुख्य रक्षणकर्ता, टुवाक माक्वी संस्थेत एक गुप्तहेर म्हणून गेला आहे, व बऱ्याच काळापासून त्याचा काही ठावठिकाणा नाही. जे बॅड-लॅंडस मध्ये गायब झाले त्याच जहाजात टुवाक होता . कॅथरीन मग टॉमला कळवते की त्या माक्वी जहाजाचा कप्तान, चकोटे नावाचा माणूस आहे, हा चकोटे स्टारफ्लिटचा एक कर्मचारी होता. टॉम मग सांगतो की तो चकोटेला ओळखतो. दोघांचे कधीच पटत नव्हते. खरे तर, टॉमने चकोटेच्या घराला व वसाहतीला एका हल्ल्यापासून वाचवण्यासाठी स्टारफ्लिट पदाचा त्याग केला होता, पण चकोटेला वाटते की टॉमने स्टारफ्लिट पदाचा त्याग केला कारण त्याला फक्त पैसा हवा होता. शेवटी मग टॉम कॅथरीनला मदत करण्यास तयार होतो.

मग पुढे एका छोट्या अंतराळ जहाजात टॉम त्याची कामगिरी सुओओ करण्यासाठी डीप स्पेस नाईन अंतराळ गोदीकडे जातो, जेथे त्याला यु.एस.एस. व्हॉयेजर अंतराळ जहाज, डीप स्पेस नाईनच्या एका गोदी-दरवाज्यात दिसते. लेफ्टेनेंट स्टाडी जी त्या छोट्या अंतराळ जहाजाचे नियंत्रण करत असते, टॉमला सांगते की यू.एस.एस. व्हॉयेजर हे इंट्रेपिड जातीचे अंतराळ जहाज आहे, ज्याच्या वेगळ्या प्रकाराच्या व्हार्प नेसेल मांडणीनुसार, त्या जहाजाला व्हार्प ९.९७५ची सर्वाधिक गतीने उडता येते. स्टाडी टॉमला अजून सांगते की व्हॉयेजर मध्ये १५ मजले व १४१ खलाशी आहेत आणि व्हॉयेजरमधील सर्व विद्युतमंडले बायॉ-न्यूरल जातीची आहेत. त्यामुळे व्हॉयेजरमधील संगणकाला प्रतिक्रिया देण्यास खूप कमी वेळ लागतो.

मग पुढे कारडॅसियन जहाजाचा मग पुढे हे कथानक डीप स्पेस नाईन कडे वळते जेथे एक फिरंगी प्रजातीचा, क्वॉर्क नावाचा प्राणी हॅरी किमला काही सुंदर व दुर्मिळ श्र्वेतमणींबद्दल सांगतो, हॅरी त्याला नम्रपणे नाही सांगतो कारण त्याला फिरंगी प्रजातीच्या प्राण्यांबद्द्ल स्टारफ्लीट विद्यानिकेतन मध्ये सांगितले होते की ते चोर व खोटारडे असतात. हे समजताच क्वॉर्क खूपच चिडतो व हॅरीला धमकी देतो की तो हॅरीचे नाव स्टारफ्लीटच्या मोठ्या साहेबांना सांगेल. हॅरी घाबरून क्वॉर्कला सांगतो की तो सर्व श्र्वेतमणी विकत घ्यायला तयार आहे. तेवढ्यात तेथे टॉम पॅरिस येतो व हॅरीला सांगतो की क्वॉर्क एक खोटारडा पाणी आहे व ते दुर्मिळ श्र्वेतमणी खरे तर कुठेही मिळतात आणि एकदम कवडीच्या भावात मिळतात. हे ऐकून हॅरी टॉम बरोबर त्याच्या कामाला निघून जातो. मग पुढे ते दोघे व यू.एस.एस. व्हॉयेजरवर येतात व प्रथेप्रमाणे जहाजाचा मुख्य वैद्याकडे जातात. वैद्य त्यांना प्रथम जहाजाची कपतान कॅथरीन जेनवे हिला भेटायला सांगतो. ते दोघे भेटायला आल्यावर कॅथरीन जेनवे त्यानां जहाजाच्या संचालन केंद्रावर घेऊन जाते व त्यांची ओळख जहाजावरच्या बाकीच्या खलाशांबरोबर करून देते. कॅथरीन जेनवे हॅरीला जहाजाच्या कर्मकारी अधिकाऱ्यांचे काम व टॉमवर जहाजाचे सुकाणू नियंत्रित करण्याचे काम सोपवते.

येथून पुढे काम चालू

[संपादन]

मागील माहिती

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]

केअरटेकर हा भाग १९९५ मध्ये ४ एम्मी पुरस्कारांसाठी नामांकित झाला होता. त्यांपैकी त्याने एक पुरस्कार जिंकला. मात्र त्याने त्याचे श्रेय इतर तीन भागांना दिले.

  1. १९९५ मध्ये "आऊटस्टॅन्डिंग इंडिव्हिजुअल अ‍ॅचिव्हमेंट इन स्पेशल व्हिज्युअल इफेक्ट्‌स" हा एम्मी पुरस्कार जिंकला. केअरटेकर ह्या भागाने त्याच्या स्टार ट्रेक डिप स्पेस नाइन मालिकेतील एका प्रतिद्वंदी भागासोबत याच वर्गात नामांकनासाठी दाखल केलेल्या"द जेम हडार"वर मात केली. हा एम्मी पुरस्कार विशेष दृश्यांसाठी वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरीबद्दल आहे.
  2. १९९५ मध्ये "आऊटस्टॅन्डिंग इंडिव्हिज्युअल अ‍ॅचिव्हमेंट इन कॉस्ट्यूमम डिझाइन फॉर अ सीरीज" ह्या एम्मी पुरस्कारासाठी रॉबेर्ट ब्लॅकमॅन नामांकित झाला होता. रॉबेर्ट ब्लॅकमॅनला व्हॉयेजर मालिकेतील केअरटेकर भागातल्या वेषभूषेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेतील असलेला वेषभूषेत खास कामगिरी बद्दलचा, वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरी बद्दल आहे.
  3. १९९५ मध्ये "आऊटस्टॅन्डिंग इंडिव्हिज्युअल अ‍ॅचिव्हमेंट इन म्युझिक कॉंपोझिशन फॉर अ सीरीज" ह्या एम्मी पुरस्कारासाठी ’जे चाट्टावे’ नामांकित झाला होता. जे चाट्टावेला व्हॉयेजर मालिकेतील केअरटेकर भागासाठी केलेल्या संगीत रचनेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेसाठी केलेल्या संगीत रचनेबद्दल वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरीबद्दल आहे.
  4. १९९५ मध्ये "आऊटस्टॅन्डिंग इंडिव्हिज्युअल अ‍ॅचिव्हमेंट इन हेयरस्टायलिंग फॉर अ सीरीज" ह्या एम्मी पुरस्कारासाठी व्हॉयेजर मालिकेतील सर्व केशरचना व केश रचनाकारांसाठी नामांकित झाले होले. त्या सर्व लोकांना व्हॉयेजर मालिकेतील केअरटेकर भागातल्या केशभूषेसाठी नामांकन मिळाले. हा एम्मी पुरस्कार एखाद्या मालिकेत कलाकारांवर केलेल्या केशभूषेच्या खास व वैयक्तिकपणे साधलेल्या कामगिरीबद्दल आहे.

व्हीडीओ कॅसेट आणि डीव्हीडी आवृत्ती

[संपादन]
  1. युनायटेड किंग्डम येथे २ जानेवारी १९९६ (1996-01-02) रोजी, स्टार ट्रेक व्हॉयेजरची व्हीडीओ कॅसेट आवृत्ती दुकानात आली. ही आवृत्ती स्टार ट्रेकच्या ३०व्या वाढदिवसाचा निमित्ताने प्रकाशित झाली. ह्या आवृत्तीत हा भाग पण होता.
  2. युनायटेड किंग्डम येथे २६ जून १९९५ (1995-06-26) रोजी स्टार ट्रेक व्हॉयेजरची व्हीडीओ कॅसेट (व्हीएचएस) आवृत्ती दुकानात आली. त्या व्हीडीओ कॅसेट मध्ये हा भाग पण होता. (आवृत्ती क्र.: १.१. यादी क्र. व्ही एच आर ४२००).
  3. युनायटेड किंग्डम येथे ९ डिसेंबर १९९६ (1996-12-09) रोजी स्टार ट्रेक व्हॉयेजरची एक खास व्हीडीओ कॅसेट (व्हीएचएस) आवृत्ती दुकानात आली. त्या व्हीडीओ कॅसेट मध्ये हा भाग पण होता.
  4. हा भाग स्टार ट्रेक व्हॉयेजरच्या पहिल्या पर्वातील डीव्हीडी संग्रहात आहे.

कलाकार[]

[संपादन]

प्रमुख कलाकार

[संपादन]

पाहुणे कलाकार

[संपादन]

सह-कलाकार

[संपादन]

साभारीत नसलेले सह-कलाकार

[संपादन]

  • विविध ओकांपा पात्रांच्या भूमिकेत मार्गारेट ब्लॅनचार्ड, स्कॉट डीरॉय, पाब्लो एस्पिनोसा, हेधर फर्ग्युसन, सिंडी बोहलिंग, लौ स्लॉटर, एरिक व्हिटमोर आणि रॅन्डॉल बॉसले.
  • एका मादा कोभिरियानच्या भूमिकेत, न्यू झीलंडच्या पुनर्वसनी तुरुंगातील दोन बंदिवानांच्या भूमिकेत आणि दोन मादा व तीन नर ओकांपाच्या भूमिकेत काही अनोळखी कलाकार.

निर्मिती साभार[]

[संपादन]
  • कथा लेखक - मायकल पिलर, रिक बर्मन आणि जेरी टेलर.
  • पटकथा लेखक - मायकल पिलर आणि जेरी टेलर.
  • दिग्दर्शक - व्हिनरिच कोल्बे.
  • कार्यकारी निर्माते - रिक बरमॅन, जेरी टेलर आणि मायकेल पिल्लर.
  • निर्माते - पीटर लॉरिट्सन आणि मेरीरी हॉर्वर्ड.
  • संगीत - जे चॅट्टावे.
  • छायांकन - मार्व्हिन रश.

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर
  2. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ आय. एम. डी. बी. वरील केअरटेकर, भाग क्र. १चे साभार
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; आय. एम. डी. बी. वरील केअरटेकर, भाग क्र. १ चे साभार नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

बाह्य दुवे

[संपादन]
  1. केयरटेकर - मेमोरी-आल्फा वेबसाईटवर
  2. केयरटेकर भाग क्र. १ - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-01-15 at the Wayback Machine.