कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर | |
---|---|
जन्म | २५नोव्हेंबर,इ.स. १८७२ |
मृत्यू | ऑगस्ट २६, इ.स. १९४८ |
शिक्षण | सांगली, पुणे |
राष्ट्रीयत्व | राष्ट्रभक्त , स्वातंत्र्य सेनानी |
कार्यक्षेत्र | साहित्य, पत्रकारिता |
साहित्य प्रकार | नाटक |
प्रसिद्ध साहित्यकृती | संगीत स्वयंवर (नाटक), संगीत मानापमान |
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर [२५ नोव्हेंबर], १८७२ - ऑगस्ट २७, १९४८) हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते.
कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे मराठी नाटककार होते. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार 'केसरी'च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते. पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली. ते ‘नाट्यचार्य खाडिलकर’ म्हणून प्रसिद्ध आहेत.
खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. एक प्रकारे त्यांच्या मनाची घडण आध्यात्मिक होती. त्यांच्या नाटकांतील अनेक पात्रे या गुणांचे दर्शन घडवितात. खाडिलकरांच्या सगळ्या नाटकांत {न.चिं, केळकर|तात्यासाहेब केळकरांनी]] म्हटल्याप्रमाणे 'ओज हा गुण आहे'; त्यांचे शृंगाररस आणि करुणरससुद्धा ओजगुणान्वित असतात; व त्यामुळे त्या रसाभोवती एक प्रकारचे उदात्त वातावरण निर्माण होते.
मराठ्यांच्या इतिहासातही हेच कारुण्य-नाट्य आहे. खाडिलकरांनी 'स्वयंवर', 'भाऊबंदकी' किंवा 'सवाई माधवराव यांचा मृत्यु' हे नाटकांचे विषय त्याचसाठी निवडले.
महत्त्वाच्या घटना
[संपादन]- १८९२ : तत्त्वज्ञान हा विषय घेऊन बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण.
- १८९२–९४ : सांगली हायस्कूल मध्ये शिक्षक होते. त्यानंतर मुंबईस कायद्याचा अभ्यास करून एल्एल्.बी.
- १८९३: लेखनाला प्रारंभ केला. "सवाई माधवराव यांचा मृत्यु" या पहिल्या नाटकाचे लेखन ह्याच वर्षी झाले.
- १८९५ : "विविधज्ञान विस्तार" मध्ये लिखाण प्रसिद्ध झाले.
- १८९६ : विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध झालेल्या, महादेव शिवराम गोळे ह्यांच्या ब्राह्मण आणि त्यांची विद्या (१८९५) ह्या ग्रंथावरील परीक्षणामुळे लोकमान्य टिळकांशी परिचय झाला व त्यातून त्यांचा पुढे केसरीशी संबंध आला.
- १८९६ : त्यांनी केसरीत ‘राष्ट्रीय महोत्सव हा लेख लिहिला.
- १८९७ : केसरीत दाखल. लोकमान्यांच्या स्वराज्यवादी जहाल भूमिकेशी तन्मय होऊन त्यांनी केसरीत काम केले. आपल्या प्रखर राजकीय विचारांच्या समर्थनार्थ नाट्यलेखनाचाही आश्रय घेतला.
- १९०१ : ‘गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली.
- १९०२ : कौलांच्या कारखान्याचे निमित्त करून ते नेपाळ मध्ये गेले आणि
- १९०५ : परत केसरीत दाखल झाले.
- १९०७ : तिसऱ्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले.
- १९०८ -१०: टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात ते केसरीचे संपादक होते.
- १९१० : केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले.
- १९१३ : बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली.
- १९१४ : चित्रमयजगत् मध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला.
- १९१८ : लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे विलायतेला गेल्यामुळे केसरीचे संपादकत्व त्यांनी स्वीकारले.
- १९२० : लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध सुटला. टिळकांनंतर खाडिलकर हे टिळक संप्रदायापासून वेगळे होऊन गांधींच्या राजकारणाचे समर्थक बनले.
- १९२१ पासून मुंबईस लोकमान्य दैनिकाचे संपादन केले.
- १९२१ : गांधर्व महाविद्यालयातर्फे भरलेल्या संगीत परिषदेचे ते अध्यक्ष होते.
- १९२३ : त्यांनी लोकमान्य दैनिकाचे संपादकत्व सोडले. त्याच साली स्वतःच्या मालकीच्या नवाकाळ ह्या दैनिकाचे ते संपादक झाले.
- १९२५ : आठवड्याचा नवाकाळ सुरू केला.
- १९२७ : हिंदुमुसलमानांच्या वादावरील लेखाबद्दल नवाकाळवर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली.
- १९२९ : राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली.
- १९३३ : नागपूर येथे अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
- १९३३–३५ : सांगलीस दत्तमंदिरात योगविषयक प्रवचने देत.
- १९३५–४७ : अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.
- १९४३ : सांगली येथे झालेल्या मराठी रंगभूमीच्या शतसांवत्सरिक उत्सवास खाडिलकरांनी संदेश पाठविला होता.
- कर्झनशाहीचे खरे स्वरूप प्रगट करू पाहणाऱ्या त्यांच्या कीचकवध नाटकाच्या प्रयोगावर १९१० साली इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले.
- १९४८ : निधन
पत्रकारिता
[संपादन]- 'केसरी'चे संपादक
- 'नवाकाळ'चे संस्थापक
प्रकाशित साहित्य
[संपादन]नाटके
[संपादन]- कांचनगडची मोहना (नाटक) - १८९८
- संगीत कीचकवध (नाटक) - १९०७
- संगीत त्रिदंडी संन्यास (नाटक) - १९२३
- संगीत द्रौपदी (नाटक) - १९२०
- संगीत प्रेमध्वज (नाटक) - १९११
- संगीत बायकांचे बंड (नाटक) -१९०७
- संगीत भाऊबंदकी (नाटक) - १९०९
- संगीत मानापमान (नाटक) - १९११
- संगीत मेनका (नाटक) - १९२६
- संगीत विद्याहरण (नाटक) - १९१३
- संगीत सत्त्वपरीक्षा (नाटक) - १९१५
- संगीत सवतीमत्सर (नाटक) - १९२७
- सवाई माधवराव यांचा मृत्यू (नाटक) - १९०६
- संगीत सावित्री (नाटक) - १९३३
- संगीत स्वयंवर (नाटक) - १९१६
महत्त्वाच्या लेखांचा व भाषणांचा संग्रह
[संपादन]- खाडिलकरांचा लेखसंग्रह (भाग १ व २, १९४९)
अध्यात्मपर लेखन
[संपादन]- ऐतरेय आणि ईशावास्योपनिषद
- ॐकाराची उपासना
- तैत्तिरीयोपनिषद
- त्रिसूपर्णाची शिकवणूक
- याज्ञवल्क्यमैत्रेयीसंवाद
- रुद्र, संध्यावंदन व पुरुषसूक्त
काकासाहेब खाडिलकरांवरील पुस्तके
[संपादन]- काकासाहेब खाडिलकर यांचे चरित्र (का.ह. खाडिलकर).