Jump to content

कृत्रिम अंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कृत्रिम अंग

अपंगत्व आलेल्या किंवा अपघातात गमावलेल्या शरीराच्या भागाला जो नैसर्गिक नसलेला भाग बसवला जातो त्याला कृत्रिम अंग असे म्हणतात. भारतात जयपूर अतिशय कौशल्यतेने बवलेल्या कृत्रिम पायांमुळे जयपूर फुट प्रसिद्ध आहे. येथील शरीराच्या एखाद्या भागा अभावी बसवलेल्या या अंगाची रचना रुग्णाची गरज त्याचे दिसणे आणि आवश्यक गरजा यानुसार केली जाते. याशिवाय विशिष्ट क्रियांसाठी बनवलेले कृत्रिम अंग उपयोगात आणले जातात. कृत्रिम हात किंवा पाय लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीसाठी ते कितपत योग्य ठरेल, त्याचा कोणत्या प्रकारातील कृत्रिम अवयव लावायला हवा त्याची डॉक्टरांकडून पाहणी होते.

प्रकार

[संपादन]
  • कवळी - कृत्रिम दात आणि हिरडीचे भाग हे ही कृत्रिम अंगाचे प्रकार आहेत.
  • अवयव - कृत्रिम हात, पाय, नाक वगैरे बसवणे हे कृत्रिम अंगाचे प्रकार आहेत.

वरील भागाचे कृत्रिम अंग

[संपादन]

खांग्यापासून हात तुटलेला असणे, कोपरापासून किंवा ममनगटापासून तुटलेल्या ठिकाणी बसवल्या जाणाऱ्या भागांना वरील भागाचे कृत्रिम अंग म्हणतात. पाय, गुडघा, कंबर या प्रकारांना खालील भागाचे कृत्रिम अंग असे म्हणतात.

इतिहास

[संपादन]

सुश्रुत या प्राचीन भारतातल्या शल्य शल्य विशारदाने या प्रकारच्या अनेक शस्त्रक्रिया करून रूग्णांना लाकड़ी व लोखंडी हातपाय बसवल्याचे उल्लेख आहेत.[]

भारतातील सोई

[संपादन]

केंद्र सरकार योजना

[संपादन]

विकलांगजन सशक्तीकरण विभाग सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांची स्वता:ची वेबसाईट आहे. येथे विकलांग प्रशिक्षण योजना आणि अनुदान दिले जाते.

महाराष्ट्रातील योजना

[संपादन]

पुण्यातील लष्कराच्या कृत्रिम अवयवरोपण केंद्र लष्करी अधिकारी व जवानांना कृत्रिम अंग देण्यासाठी प्रयत्नशील असते. तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना यासाठी आहेत. शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कार्यरत असलेल्या या संस्थेमध्ये अस्थिव्यंग अपंगांच्या पुनर्वसन क्षेत्रातील प्रशिक्षण, अस्थिव्यंग, अपंगावर सुधारित शस्त्रक्रिया तसेच अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव पुरवठा करण्यात येतो.[] जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीवर कृत्रिम अवयव, सांधा शस्त्रक्रिया केल्या जातात. या योजनेचा महाराष्ट्र शासन विमा हप्ता भरत असल्यामुळे वरील निवडक व गंभीर आजारांसाठी रूग्णाला मान्यताप्राप्त रूग्णालयांत कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.[] शेगाव येथील गजानन महाराज संस्थान तर्फे अपंग पुनर्वसन केंद्र चालवले जाते. यात शिबिरे आयोजित केली जातात. यामध्ये शस्त्रक्रिया करण्यात येऊन अपंग रुग्णांना कृत्रिम अवयव देण्यात येतात.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ books.google.com.au/books?isbn=8190734431
  2. ^ mr.vikaspedia.in/social-welfare/govt_schemes/sw_schemes
  3. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-08-18 रोजी पाहिले.
  4. ^ http://www.gajananmaharaj.org/marathi/html/activity-medical.htm[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]