कवळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृत्रिम दातांना कवळी असे म्हणतात. वयपरत्वे दात दुखू लागतात, अनेकदा ते हलून पडून जातात. विविध उपचारांनी ते दुरूस्त करता येत नाहीत. अशावेळी, कृत्रिम दात वा कवळी लावण्याचा प्रयोग केला जातो. दात नसल्यामुळे हिरड्यांची व त्याखालील हाडांची झीज होते. कवळी मुळे हाडांची व हिरड्यांची झीज मोठ्या प्रमाणात कमी होते. कवळी बसवून चर्वण करण्याची त्या दाढेची ताकद कमी असते. त्यामुळे घास चावून खाताना अशा रुग्णांना त्रास होतो. दात पडायला आले की सहा महिन्यांत सर्वच दात काढून कवळी बसवणे चांगले असे काही मानतात तर् काही दंतवैद्य जसे दात पडतील तसे एक एक दात बसवून झिज रोखावी असे म्हणतात. कवळीची कालमर्यादा साधारणत: पाच ते सात वर्षे असते. त्यानंतर नवीन कवळी बसवणे गरजेचे असते. कारण हिरड्यांचा आकार काही वर्षांनंतर बदलतो. कवळी कृत्रिम पदार्थापासून बनवलेली असते. पाच ते सात वर्षांनंतर कृत्रिम पदार्थांचे गुणधर्म बदलतात. तसेच त्या कृत्रिम कवळीची कार्यक्षमता कमी होते.

काळजी[संपादन]

  • खाल्यानंतर कवळी स्वच्छ करावी.
  • तोंडही स्वच्छ धुवावे
  • कवळी डॉक्टरांनी दिलेल्या मिश्रणामध्ये बुडवून ठेवावी.
  • कवळीसाठी बनवलेला विशेष ब्रश मिळतो, त्याचा वापर करून कवळी घासावी
  • हिरड्याही स्वच्छ कराव्यात.

कृत्रिम दंतरोपण[संपादन]