वैभव मांगले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैभव मांगले (०७ जून १९७५) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत.

बी.एस्सी‌., बी.एड., डी.एड. झाल्यावर ते काकांच्या आग्रहाने मुंबईला आले. तेथे दहा-बारा जणांबरोबर मित्राच्या खोलीत राहत असताना त्यांचा आविष्कार या नाट्यसंस्थेशी संबंध आला. त्यांनी नाटकांमध्ये त्यांनी स्त्री-भूमिकाही केल्या आहेत. ग्रामीण नाटकांमध्येही काम करणारे वैभव मांगले हे कोकणी, मालवणी, वऱ्हाडी भाषा या बोलीभाषा सफाईने बोलतात. मांगले यांचे मूळ गाव रत्‍नागिरी जिल्ह्यातील देवरुख असून त्यांचे वडील आणि आजोबाही अभिनय करीत असत.

झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवर मराठी नाटकांतील स्त्री भूमिकांची स्थित्यंतरे दाखवणारा ’नांदी’ हा कार्यक्रम झाला होता. त्यात संगीत सौभद्राचा एक प्रवेश होता. त्या प्रवेशात रुक्मिणीच्या भूमिकेत वैभव मांगले होते.

नाटके[संपादन]

 • एक डाव भुताचा
 • करून गेलो गाव (स्त्री भूमिका)
 • पांडगो इलो रे बाबा इलो
 • मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (पहिले नाटक)
 • लग्नकल्लोळ (उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार)
 • वाडा चिरेबंदी
 • वासूची सासू
 • व्यक्ती आणि वल्ली
 • सूर्याची पिल्ले
 • संगीत सौभद्र (रुक्मिणीची भूमिका)
 • संज्या छाया

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

चित्रपट[संपादन]

 • आया सावन झूमके
 • उचला रे उचला
 • काकस्पर्श
 • कोकणस्थ
 • चांदी
 • टाइमपास
 • टाइमपास २
 • टूरिंग टॉकीज
 • दुनियादारी
 • नवरा माझा नवसाचा
 • पिपाणी
 • पोस्ट कार्ड
 • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
 • फक्त लढ म्हणा
 • शहाणपण देगा देवा
 • शाळा
 • शिक्षणाच्या आईचा घो
 • सांगतो ऐका
 • साले लोअर मिडल क्लास
 • सासू नंबरी जावई दस नंबरी
 • हरिश्चंद्राची फॅक्टरी

सत्कार आणि पुरस्कार[संपादन]

 • वैभव मांगले यांचा २३-११-२०१० रोजी देवरुखला गावकऱ्यांनी सत्कार केला होता.
 • कलारंग कलागौरव पुरस्कार (२०१३).
 • झी मराठी पुरस्कार (’शेजारी शेजारी...” मधील बी.एल. पाठक या विनोदी भूमिकेसाठी)