गौर (कळंब)
?गौर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कळंब |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
गौर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते.
लोकजीवन
[संपादन]गौर गावातील जमीन सुपीक आहे.तेरणा नदीच्या काठी बागायत शेती केली जाते. गावात हनुमान मंदिर आहे तसेच विठ्ठल रखुमाई मंदिर आणि महादेव मंदिर आहे खंडोबा चे ही मंदिर आहे गावातील लोक प्रामुख्याने शेती आणि पशुपालन करतात.. गावात विविध जाती धर्माचे लोक आहेत.. हिंदू लोकसंख्या 90 टक्के 5 टक्के मुस्लिम आणि 5 टक्के बौद्ध आहेत श्रावण अमावस्यएला गावात कुस्त्या असतात. गावात एक जुना मठ आणि चार बारव देखील आहेत मठाजवळ चे बारव आहे बाकी सर्व बारव बुजली आहेत..
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गौर गावात स्वातंत्र्य संग्राम स्मारक आहे, गावातील 7 हुतात्मे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक सरकारने बांधले आहे..
नागरी सुविधा
[संपादन]गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 7 वि पर्यंत आहे..
तसेच राजर्षी शाहू विद्यालय हे किसान शिक्क्षण प्रसारक मंडळ चे विद्यालय 8 ते 10 वि पर्यत आहे..
गावातून कळंब ढोकी उस्मानाबाद तसेच बार्शी आणि पुणे येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत..
ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय ही गावातच आहे.. प्राथमिक आरोग्य केंद्र गौर गावात आहे..