इ.स. १९५४
Appearance
(इ. स. १९५४ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे |
वर्षे: | १९५१ - १९५२ - १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- मार्च १ - अमेरिकेने बिकिनी बेटावर अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले.
- एप्रिल १८ - गमाल अब्दल नासरने ईजिप्तमध्ये सत्ता बळकावली.
- मे ५ - पेराग्वेत लश्करी उठाव. जनरल आल्फ्रेदो स्त्रोसनेरने सत्ता बळकावली.
- मे १७ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ब्राउन वि. टोपेका, कॅन्ससचे शिक्षण मंडळ या खटल्यात एकमताने निर्णय दिला की शाळांमधून वंशभेद करणे असंवैधानिक आहे.
- जून २७ - सोवियेत संघात ओब्निन्स्क येथे जगातील पहिले अणुशक्तिवर चालणारे विद्युत उत्पादन केंद्र सुरू.
- जुलै ५ - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- जुलै १७ - कॅलिफोर्नियात डिस्नेलॅंड खुले.
- जुलै २० - व्हियेतनाम युद्ध - जिनिव्हा येथे शस्त्रसंधी. देशाचे १७व्या अक्षांशावर विभाजन.
- जुलै ३१ - इटलीच्या अर्दितो देसियोच्या नेतृत्वाखाली गिऱ्यारोहक पथकाचे के-२ शिखरावर पहिले यशस्वी आरोहण.
- ऑगस्ट २४ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो व्हार्गासने आत्महत्या केली. व्हार्गासवर ब्राझिलच्या वायुदलातील अधिकाऱ्याचा खून करण्याचा कट करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी १६ - मायकेल होल्डिंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- फेब्रुवारी २३ - व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
- एप्रिल १८ - रिक मोरानिस, केनेडियन अभिनेता.
- जून २० - ऍलन लॅम्ब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जून २१ - जेरेमी कोनी, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जून ३० - पिएर चार्ल्स, डॉमिनिकाचा पंतप्रधान.
- जुलै ५ - जॉन राइट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १३ - रे ब्राइट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - एंजेला मर्केल, जर्मनीची चान्सेलर.
- जुलै २८ - ह्युगो चावेझ, वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
- नोव्हेंबर ७ - कमन हसन, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- जानेवारी १६ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.
- मार्च ६ - पॉल, ग्रीसचा राजा.
- जून ७ - ऍलन ट्युरिंग ब्रिटिश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- ऑगस्ट २४ - गेतुलियो व्हार्गास, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष