Jump to content

आषाढ अमावास्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आषाढ अमावस्या ही आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.


सुशोभित प्रज्वलित समई

दिव्याची अमावास्या म्हणजेच आषाढ महिन्यातील अमावास्या होय.[]

उत्सवी स्वरूप

[संपादन]
आषाढ अमावास्येचे दीपपूजन

या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात.[] अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात.[] या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करतात.[]

  • गटारी अमावास्या - अनेकजण चातुर्मासात, विशेषतः श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. त्यामुळे हा तीस दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी मांस-मद्य सेवन करण्याची रूढी अनेक ठिकाणी प्रचलित झाली आहे.[]

व्यावहारिक महत्त्व

[संपादन]

अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते. ज्याकाळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती त्याकाळात प्रचलित असलेले दीपपूजन औचित्यपूर्ण होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Gupte, B. A. (1994). Hindu Holidays and Ceremonials: With Dissertations on Origin, Folklore and Symbols (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 9788120609532.
  2. ^ "Ashadha Amavasya 2020 दीप अमावास्याः जाणून घ्या, मुहूर्त, दीपपूजनाचे महत्त्व आणि मान्यता". Maharashtra Times. 2021-07-29 रोजी पाहिले.
  3. ^ Webdunia. "आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या". marathi.webdunia.com. 2021-07-27 रोजी पाहिले.
  4. ^ Journal of the Asiatic Society of Bombay (इंग्रजी भाषेत). Asiatic Society of Bombay. 1967.
  5. ^ Research, Indian Council of Agricultural; Randhawa, Mohinder Singh (1968). Farmers of India (इंग्रजी भाषेत). Indian Council of Agricultural Research.