मद्य
Jump to navigation
Jump to search
मद्य हे एक अल्कोहोलयुक्त पेय आहे. मराठी बोलीभाषेमध्ये मद्याला "दारू" असे संबोधले जाते.
मद्याचे जगातील बहुतांशी देशांमध्ये सेवन केले जात असले तरी प्रत्येक देशाचे मद्यसेवनाबाबत वेगळे कायदे आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये मद्यपानाकरिता किमान १८ वर्षे वय असणे बंधनकारक आहे व बहुतांशी देशांमध्ये मद्यपान करून वाहन चालवणे हा कायदेशीर गुन्हा समजला जातो.
माफक मद्यपानामुळे आरोग्यावर परिणाम होत नसला तरीही अतिमद्यपानामुळे जगात दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडतात.[१] [२]
दारूचे रासायनिक नाव इथॅनॉल (ethanol) असे आहे.