दीप अमावास्या
Appearance
दिव्याची अमावास्या ही आषाढ महिन्यातील अमावास्या म्हणून साजरी केली जाते.[१]
स्वरूप
[संपादन]आषाढ महिन्याच्या अमावास्या तिथीला घरातील, देव घरातील धातूच्या दिव्यांची पूजा केली जाते.[२] यासाठी दिवे स्वच्छ घासून, उजळवले जातात. त्यांची पूजा केली जाते. पुरणाचा नैवेद्य केला जातो.[३] काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात आणि त्यांची पूजा केली जाते.[४]
समाजात विविध ठिकाणी
[संपादन]- दीप अमावास्येचे औचित्य साधून कुटुंबात [पूजा केली जाते त्याचप्रमाणे विविध मंदिरे, शाळा अशा ठिकाणी दीप पूजन केले जाते. विद्यार्थी शाळेत दिवे प्रज्वलित करून, प्रार्थना करतात.[५]
- दीपसमाजातील विविध स्तरात या दिवसाला गटारी अमावास्या म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात मांसाहार, कांदा , लसूण यांचे सेवन वर्ज्य मानले जात असल्याने मांसाहार करणा-या कुटुंबांमध्ये या दिवशी विशेष करून मांसाहार केला जातो.[६]
- या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्याची पद्धतीही प्रचलित असल्याचे दिसते.उत्तर भारतात या दिवशी पितृतर्पण, श्राद्ध केले जाते.[७]
आदिवासी जनजातीत
[संपादन]दिव्याची अमावास्या भिल्ल या आदिवासी जमातीत विशेषत्वाने साजरी केली जाते.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Aashadhi Amavasya 2021 दीप अमावास्या : शुभ वेळ आणि महत्व". महाराष्ट्र टाइम्स. 2022-07-23 रोजी पाहिले.
- ^ Kārāgirī. Mahārāshṭra Rājya Lokasāhitya Samitīcyā vatīne Mahārāshṭra Śāsanācyā Śikshaṇa Vibhāgātarphe prakāśita. 1992.
- ^ "दीप अमावस्या : जाणून घ्या महत्व, माहिती आणि पूजा विधीबद्दल". Loksatta. 2022-07-23 रोजी पाहिले.
- ^ Ḍhere, Rāmacandra Cintāmaṇa (1971). Lokasãskr̥tūeī kshitije.
- ^ XYZ, Social News (2022-07-29). ": Mumbai: Students celebrate 'Deep Amavasya' #Gallery". Social News XYZ (इंग्रजी भाषेत). 2022-07-30 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-07-28). "Gatari Amavasya 2022: आज गटारी अमावस्या, गटारी अमावस्येला मांसाहार आणि मद्यपान का करतात?". TV9 Marathi. 2022-07-30 रोजी पाहिले.
- ^ "आज आषाढ़ अमावस्या पर पितरों के लिए दीपक जलाना कब है सही? पंडित जी से जानें समय और नियम". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2024-07-04. 2024-08-02 रोजी पाहिले.
- ^ Gāre, Govinda (2000). Mahārāshṭrātīla ādivāsī jamātī: sāmājika va sā̃skr̥tika māgovā. Kônṭinenṭala Prakāśana.