आषाढ अमावास्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आषाढ अमावस्या या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

आषाढ अमावस्या ही आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे.


साजरे केले जाणारे सण[संपादन]

या दिवशी कणकेचे गूळ घालून केलेले उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे(करंज्या) पक्वान्न म्हणून खातात. अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वात ठेवून तो देवापुढे ठेवतात. या दिवशी घरातले सर्व दिवे, कंदिल, निरांजने, समया वगैरे स्वच्छ करतात. त्यांची पूजा करतात.[२]

  • गटारी अमावास्या - अनेकजण चातुर्मासात, विशेषतः श्रावण महिन्यात मांस, मद्य, इ.चे सेवन वर्ज्य करतात. त्यामुळे हा तीस दिवसांचा कालखंड सुरू होण्याआधीच्या दिवशी मांस-मद्य सेवन करण्याची रूढी अनेक ठिकाणी प्रचलित झाली आहे.[३]

व्यावहारिक महत्त्व[संपादन]

अमावास्येच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते. ज्याकाळात अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती त्याकाळात प्रचलित असलेले दीपपूजन औचित्यपूर्ण होते.


संदर्भ[संपादन]

  1. ^ Gupte, B. A. (1994). Hindu Holidays and Ceremonials: With Dissertations on Origin, Folklore and Symbols (इंग्रजी भाषेत). Asian Educational Services. ISBN 9788120609532.
  2. ^ Journal of the Asiatic Society of Bombay (इंग्रजी भाषेत). Asiatic Society of Bombay. 1967.
  3. ^ Research, Indian Council of Agricultural; Randhawa, Mohinder Singh (1968). Farmers of India (इंग्रजी भाषेत). Indian Council of Agricultural Research.