रसायनशास्त्रज्ञ
| उपवर्ग | physical and earth science professionals, physical scientist |
|---|---|
| व्यवसायाचा भाग | रसायनशास्त्र |
| Uses | chemical terminology, chemical literature |
| Model item | मेरी क्युरी |
| Related category | Category:Chemical engineers |
| ISCO-08 occupation class | 2113 |
| ISCO-88 occupation class | 2113 |
| यादी आहे | list of chemists |
| Category for eponymous categories | Q58212005 |
रसायनशास्त्रज्ञ (मूळ ग्रीक शब्द chēm(ía) म्हणजे केमिया किंवा अल्केमी; मध्ययुगीन लॅटिन अल्केमिस्ट मधून आलेल्या किमिस्ट या शब्दाऐवजी हा शब्द वापरला जातो) हा रसायनशास्त्र विषयाचे शिक्षण घेतलेला शास्त्रज्ञ किंवा या क्षेत्रातील अधिकृत विद्यार्थी असतो. रसायनशास्त्रज्ञ द्रव्याची रचना आणि त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करतात. रसायनशास्त्रज्ञ त्यांनी अभ्यासलेले गुणधर्म रेणू आणि त्यांच्या घटक अणूंच्या स्तरावर प्रमाणासह सविस्तरपणे मांडतात. रसायनशास्त्रज्ञ पदार्थांचे प्रमाण, रासायनिक अभिक्रियांचा वेग आणि इतर रासायनिक गुणधर्मांचे काळजीपूर्वक मोजमाप करतात. राष्ट्रकुल देशांमधील इंग्रजी भाषेत औषधविक्रेत्यांना अनेकदा रसायनशास्त्रज्ञ असेही संबोधले जाते.
रसायनशास्त्रज्ञ त्यांच्या ज्ञानाचा वापर अपरिचित पदार्थांची रचना आणि गुणधर्म जाणून घेण्यासाठी करतात. तसेच निसर्गात आढळणारे उपयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात पुन्हा तयार करण्यासाठी आणि नवीन कृत्रिम पदार्थ व उपयुक्त प्रक्रिया विकसित करण्यासाठी करतात. रसायनशास्त्रज्ञ रसायनशास्त्राच्या कोणत्याही उपशाखेत विशेष प्राविण्य मिळवू शकतात. पदार्थ विज्ञान आणि धातूशास्त्रज्ञांचे शिक्षण आणि कौशल्ये बऱ्याच अंशी रसायनशास्त्रज्ञांसारखीच असतात. रसायनशास्त्रज्ञांचे काम अनेकदा रासायनिक अभियंत्यांशी संबंधित असते, जे प्रामुख्याने किफायतशीर मोठ्या रासायनिक कारखान्यांचे योग्य आराखडे, बांधकाम आणि मूल्यमापन करण्यासाठी कार्यरत असतात. हे अभियंते रसायने आणि संबंधित उत्पादनांच्या व्यावसायिक उत्पादनासाठी नवीन प्रक्रिया आणि पद्धती विकसित करण्यासाठी औद्योगिक रसायनशास्त्रज्ञांसोबत जवळून काम करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
