Jump to content

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अनुसुचित जमाती या पानावरून पुनर्निर्देशित)
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील राज्यांमधील अनुसूचित जातींचा विवरण नकाशा.[] पंजाबमध्ये अनुसूचित जातींचे सर्वाधिक प्रमाण (३२%) तर भारताच्या केंद्रशासित प्रदेशांत व ईशान्य भारतातील दोन राज्यांत ० %.[]
२०११ च्या जनगणनेनुसार भारतातील राज्यांमधील अनुसूचित जमातींचा (आदिवासी) विवरण नकाशा.[] मिझोरम आणि लक्षद्वीपमध्ये अनुसूचित जमातींचे सर्वाधिक प्रमाण (~95%), तर पंजाब आणि हरियाणामध्ये ०%.[]

अनुसूचित जाती[] अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास (मागास वर्ग) म्हणून ओळखले जात होते. अनुसूचित जातींमध्ये कितीतरी टक्के लोक मूलत: भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोक आहेत. आधुनिक साहित्यात अनुसूचित जातींचा उल्लेख कधी कधी आदि-द्रविड (?) म्हणून होतो.[][]

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येत अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या लोकांचे प्रमाण अनुक्रमे १६.६% आणि ८.६% आहे.[][] या दोन समूहांची एकत्रित लोकसंख्या ही २५.२% (३१ कोटी) आहे, जर ही संख्या एक देश म्हणून गृहीत धरली तर हा चीन, भारतअमेरिका ह्यांनंतर जगातला चौथा सर्वात मोठा देश ठरू शकतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या संविधानाद्वारे या मागास समजल्या जाणाऱ्या समूहांना आरक्षण लागू करण्यात आले.[] आणि कलम (अनुसूचित जमाती) आदेश १९५०, २२ राज्यांतील ७४४ जमातींची नोंद करते.

धार्मिक लोकसंख्या

[संपादन]
Percent of scheduled tribes in India by tehsils by census 2011

संविधान (अनुसूचित जाती) आदेश (सुधारणा) कायदा, १९९० नुसार, अनुसूचित जातींचा धर्म फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध असू शकतो.[][] अनुसूचित जमातींना कोणताही विशिष्ट धर्म नाही.[१०][११] २००६ च्या सच्चर समितीच्या अहवालात भारतीय वंशाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आज हिंदू धर्मापर्यंत मर्यादित राहिल्या नाहीत. आदिवासींनी आम्ही हिंदू नसल्याची याचिक सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, २००३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले की आदिवासी (अनुसूचित जमाती) हे हिंदू धर्मीय नाहीत. एनएसएसओ च्या ६१ व्या फेरी सर्वेक्षणात आढळले की, भारतामधील ९०% बौद्ध, ७५% शीख आणि ७५% ख्रिश्चन हे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट आहेत. [१२][१३] २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण बौद्ध लोकसंख्येतील ६८% (५७.५७ लाख) लोक 'अनुसूचित जाती' (प्रवर्गातील) आहेत.[१४]

जात प्रवर्गाचे प्रत्येक धर्मानुसार वर्गीकरण (२००४-०५) अनुसूचित जाती % अनुसूचित जमाती % इतर मागास वर्ग % इतर % एकूण%
हिंदू २२.२ ९.१ ४२.८ २६ १००
मुसलमान ०.८ ०.५ ३९.२ ५९.५ १००
ख्रिश्चन ९.० ३२.८ २४.८ ३३.३ १००
शीख ३०.७ ०.७ २२.४ ४६.१ १००
जैन ०० २.६ ३० ९४३ १००
बौद्ध ६८ ०.४ २.७ १००
पारशी ०.० १५.९ १३.४ ७०.४ १००
इतर २.६ ६.२ ८.७ १००
एकूण ९५ ८ ७ ३० १००

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती

[संपादन]
लोकसंख्या (२०११)
  • एकूण - ११,२३,७४,३३३
    • अनुसूचित जाती - १,३२,७५,८९८ (११.८१%)
      • पुरुष - ६७,६७,७५९
      • स्त्रिया - ६५,०८,१३९
कुटूंबे
  • एकूण कुटूंबे - २,३८,३०,५८०
    • अनुसूचित जातींची कुटूंबे - ३३,११,४०५
दारिद्ररेषेखालील कुटूंबे (२००२-०७)
  • एकूण दारिद्र्यरेषेखालील कुटूंबे - ४५,०२,३८५
    • पैकी अनुसूचित जातींची कुटूंबे - १०,१२,००० (२२.४८)
गावे
  • एकूण गावे - ४१,९५९
    • १००% अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गावे - ३४
    • ५०% पेक्षा अधिक अनुसूचित जातींची लोकसंख्या असलेली गावे - ७०२
  • महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या एकूण वस्त्या - ३७,६०४
साक्षरता प्रमाण (२०११)
  • एकूण साक्षरता प्रमाण (२०११) - ८२.०३%
    • अनुसूचित जातींची साक्षरता - ७९.०७%
कृषि गणना (२००५-०६)
  • एकूण भूधारक संख्या - १,१४,३०,०००
      • अनुसूचित जातींची भूधारक संख्या - १०,५६,००० (९.२५%)
  • भूधारकांकडे एकूण जमीन - १,६८,९४,००० हेक्टर्स (१.६८ कोटी हेक्टर्स)
    • अनुसूचित जातींच्या भूधारकांकडील एकूण जमीन - १२,२०,००० हेक्टर्स (१२.२० लाख हेक्टर्स)

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत १२% किंवा १ कोटी ३५ लाख लोकसंख्या ही अनुसूचित जातीच्या लोकांची आहे. महाराष्ट्रातील ५९ जातींचा अनुसूचित जातींत समावेश होतो. यांत महार, मांगचांभार हे तीन समाज लोकसंख्येनुसार अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d Census of India 2011, Primary Census Abstractसाचा:PPTlink, Scheduled castes and scheduled tribes, Office of the Registrar General & Census Commissioner, Government of India (October 28, 2013).
  2. ^ "Scheduled Caste Welfare – List of Scheduled Castes". Ministry of Social Justice and Empowerment. 13 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 August 2012 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  3. ^ Kumar (1992), The affirmative action debate in India, Asian Survey, Vol. 32, No. 3, pp. 290–302
  4. ^ FACTORS AND CONSTRAINTS FOR ADOPTING NEW AGRICULTURAL “I wish that you would issue instructions to your translation committee that the translation of Scheduled Tribes should be, literally meaning original inhabitants or indigenous peoples). The word Adivisi has grace."
  5. ^ 2011 Census Primary Census Abstract
  6. ^ "Half of India's dalit population lives in 4 states".
  7. ^ "Text of the Constitution (Scheduled Castes) Order, 1950, as amended". 2009-06-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-03-02 रोजी पाहिले.
  8. ^ "Frequently Asked Questions – Scheduled Caste Welfare: Ministry of Social Justice and Empowerment, Government of India". socialjustice.nic.in. 30 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  9. ^ "Definition". tribal.nic.in.
  10. ^ Scheduled Castes and Scheduled Tribes Introduction
  11. ^ Sachar Committee Questions and Answer Archived 3 September 2014 at the Wayback Machine.
  12. ^ Sachar, Rajindar (2006). "Sachar Committee Report (2004–2005)" (PDF). Government of India. 2014-04-02 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-09-27 रोजी पाहिले.
  13. ^ Sachar, Rajindar (2006). "Minority Report" (PDF). Government of India. 18 December 2008 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-09-27 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  14. ^ [१]