अंधारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?अंधारी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ०.३६२ चौ. किमी
जवळचे शहर छत्रपती संभाजीनगर
जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा
लोकसंख्या
घनता
२०,००० (२०११)
• ५५,२४९/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा मराठवाडी
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +२८३
• एमएच/20

अंधारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील एक मोठे गाव आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

अंधारी हे गाव छत्रपती संभाजीनगर पासून उत्तरेस 60किमी, सिल्लोड शहरापासून दक्षिणेस 20किमी,जळगाव शहरापासून दक्षिणेस 90किमी अंतरावर आहे,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सिल्लोड तालुक्याचा अंधारी महसूल विभागातील गाव आहे.ज्याचा शेजारी जतवा (फुलंब्री तालुका),मोहरा(कन्नड तालुका) आहे.

हवामान[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन[संपादन]

हे खूप मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात 2000 कुटुंबे राहतात. एकूण 20000 लोकसंख्या आहे आणि सिल्लोड तालुक्यातील दुसरे सर्वात मोठे गाव आहे. मुख्यतः मराठा व माळी समाजातील लोक येथे राहतात. मराठा समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून दुसरे समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात,व्यापाराचा दृष्टीने अंधारी हे सिल्लोड तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

नागरी सुविधा[संपादन]

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस छत्रपती संभाजीनगर बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा छत्रपती संभाजीनगर हून उपलब्ध असतात, सिल्लोड वरून येथे येण्यासाठी बस उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला अंधारी फाटा(आळंद)येथे उतरावे लागेल,छत्रपती संभाजीनगर,सोयगाव,पाचोरा आणि कन्नड हून अंधरीला येण्यासाठी ठराविक वेळेत बस उपलब्ध आहे.

जवळपासची गावे[संपादन]

लोनवडी, उपलि, टाकळी, मोहरा, नाचांवेल, आळंद, बोधेगाव , वाकी, चिंचोली, पळशी, केरहाला ही जवळपासची गावे आहेत.अंधारी सर्कल मध्ये अंधारी, लोनवाडी, महसला खु,महस्ला बू,टाकळी खु, सवखेडा खू, सावखेडा बु,तळणी,कासोड, दिडगाव, उप्ली ही गावे येतात.