वाकी
?वाकी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १.८४७ चौ. किमी |
जवळचे शहर | डहाणू |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
२,२६० (२०११) • १,२२४/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१६०२ • +०२५२८ • एमएच/४८ /०४ |
वाकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]डहाणू बस स्थानकापासून ईराणी मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ७.५ किमी अंतरावर आहे.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३९८ कुटुंबे राहतात. एकूण २२६० लोकसंख्येपैकी ११६७ पुरुष तर १०९३ महिला आहेत. गावाची साक्षरता ५१.०१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६१.०१ आहे तर स्त्री साक्षरता ४०.४५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३३३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १४.७३ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.हल्ली महिला समूहानी हस्तकला प्रशिक्षण घेऊन बांबू पासून राखी, सुबक स्मृतीचिन्हे बनवून विक्री व्यवसाय चालू केले आहेत.येथे मुसळपाड्यात दीडशे वर्षे जुना वटवृक्ष आहे. ब्रिटिशांच्या काळात ह्या वटवृक्षाखाली आदिवासींमधील भांडणाचा न्यायनिवाडा होत असे. ह्या झाडाच्या खोडाचा आकार गणपतीच्या आकारासारखा असल्याने येथे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशोत्सवाचे आयोजन होते.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[संपादन]कैनाड, आंबेसरी, सोगवे, कोसबाड, नांदरे, झराळी, ठाकूरवाडी,नरपड, आंबेवाडी, चिंबावे, नारळीवाडी ही जवळपासची गावे आहेत.वाकी समूह ग्रामपंचायतीमध्ये कासारा, वाकी, आणि झराळी ही गावे येतात.
संदर्भ
[संपादन]१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036