अँजेलिना जोली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


ॲंजेलिना जोली
जन्म ॲंजेलिना जोली व्हॉईट
४ जून, १९७५ (1975-06-04) (वय: ४८)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
कार्यक्षेत्र हॉलिवूड अभिनेत्री व दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ १९९१ ते चालू

ॲंजेलिना जोली (इंग्लिश: Angelina Jolie) ही एक अमेरिकन अभिनेत्री व दिग्दर्शक आहे. तिला गर्ल इंट्रप्टेड ह्या १९९९ सालच्या चित्रपटामधील भुमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सह-अभिनेतीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. अनेक स्रोतांनुसार जोली ही जगातील सर्वात सुंदर स्त्री मानली जाते. तिच्या सौंदर्यासोबत जोली तिच्या मानवतेसाठीच्या कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. संयुक्त राष्ट्रांच्या युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज ह्या संस्थेची ती राजदूत आहे.

ब्रॅड पिट या अभिनेत्यासह जोली ऑक्टोबर २००६ रोजी पुणे येथे चित्रीकरण करण्यास भारतात आली होती.


बाह्य दुवे[संपादन]