गोखले
Appearance
गोखले हे मराठी आडनाव आहे. हे विशेषकरून पश्चिम महाराष्ट्रात आढळणारे आडनाव आहे. ते हिंदू आडनाव असून चित्पावन कोकणस्थ ब्राम्हणांच्यात आढळून येते. कोकणस्थचा मूळ अर्थ कोकणातले असा आहे. गोखल्यांचे मूळ कोकणातल्या समुद्रकिनारी वसलेल्या वेळणेश्वर(गुहागरहून १० किमी, चिपळूणहून ५० किमी) ह्या गावात असल्याचे समजले जाते.
गोखले शब्दाचे मूळ मराठीतील गोखल म्हणजे "गोलाकार खिडकी" असे समजले जाते. गोखलचे मूळ संस्कृतात गवाक्ष(गो + अक्ष) म्हणजे गायीचे नेत्र असा होतो. हा शब्द गोलाकार खिडकी म्हणूनही वापरला जाऊ शकतो.
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]- अरविंद गोखले - मराठी लेखक.
- अरविंद व्यं. गोखले - दैनिक केसरीचे माजी संपादक आणि ’मंडालेचा राजबंदी’ या पुस्तकाचे लेखक
- गोपाळ कृष्ण गोखले - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
- चंद्रकांत गोखले - मराठी अभिनेते.
- मोहन गोखले - मराठी-हिंदी नाट्य-चित्र अभिनेता
- मोहन गोखले (ज्योतिषी) - लेखक
- विक्रम गोखले - मराठी अभिनेता.
- विजय गोखले - मराठी चित्रपट अभिनेता.
- विद्याधर गोखले - मराठी साहित्यिक.
- डॉ. शरच्चंद्र गोखले - मराठी समाजशास्त्रज्ञ
- शुभांगी गोखले - मराठी अभिनेत्री.