Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय महामार्ग ७
Map
Map
राष्ट्रीय महामार्ग ७ चे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ८४५ किलोमीटर (५२५ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात फजिल्का, पंजाब
शेवट माणा, भारत-तिबेट सीमा, उत्तराखंड
स्थान
राज्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब

राष्ट्रीय महामार्ग ७ हा भारताच्या पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशउत्तराखंड ह्या राज्यांमधून धावणारा एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवरील फजिल्का ह्या शहरामध्ये सुरू होतो व पूर्व व ईशान्य दिशांना ८४५ किमी धावून भारत-चीन आंतरराष्ट्रीय सीमेवरील माणा ह्या गावामध्ये संपतो.

हा महामार्ग उत्तराखंडमधील ऋषिकेश, देवप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, चमोली गोपेश्वर, जोशीमठ, बद्रीनाथ ही धार्मिक स्थळे उत्तराखंडाची राजधानी देहरादून सोबत जोडतो. ह्या महामार्गाचा हिमालयामधील बराचसा भाग हिवाळी महिन्यांदरम्यान बंद राहतो.

प्रमुख शहरे

[संपादन]

पंजाब

[संपादन]

हरियाणा

[संपादन]

हिमाचल प्रदेश

[संपादन]

उत्तराखंड

[संपादन]