जेडी व्हान्स
जेडी व्हान्स | |
जेडी व्हान्स जेडी व्हान्स 2023 मध्ये | |
मागील | शेरॉड ब्राउन |
---|---|
जन्म | २ ऑगस्ट, १९८४ मिडलटाउन (ओहायो) |
जन्म | २ ऑगस्ट, १९८४ मिडलटाउन (ओहायो) |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन |
आई | बेव्हरली कॅरोल |
वडील | डॉनल्ड बोमन |
पत्नी | उषा चिलुकुरी |
अपत्ये | ३ |
शिक्षण |
|
गुरुकुल | मिडलटाउन हाय स्कूल (ओहायो) |
व्यवसाय | सैनिक, वकील, राजकारणी |
धर्म | कॅथोलिक |
जेम्स डेव्हिड व्हान्स (जन्मनाव: जेम्स डोनाल्ड बोमन; [१] [२] २ ऑगस्ट, १९८४:मिडलटाउन, ओहायो, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी, वकील, लेखक आणि माजी सैनिक आहेत. हे २०२३ पासून ओहायोमधील अमेरिकेचे सेनेटर आहेत. व्हान्स रिपब्लिकन पक्षाकडून २०२४ च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
मिडलटाउन हायस्कूलमधून १२वी उत्तीर्ण झाल्यावर व्हान्स यूएस मरीन कोरमध्ये सामील झाले. तेथे त्यांनी २००३ ते २००७ दरम्यान युद्ध वार्ताहर म्हणून काम केले. यातील सहा महिने ते इराकमध्ये होते. त्यानंतर त्यांनी ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि २००९मध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी २०१३मध्ये येल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी मिळवली. २०२३ च्या निवडणुकींमध्ये व्हान्स रिपब्लिकन पक्षाकडून ओहायोमधील अमेरिकेचे सेनेटर म्हणून निवडून गेले.
त्यांनी आपले लहानपण आणि शिक्षण व त्याकाळची कठिण परिस्थिती यावर हिलबिली एलिजी नावाचे पुस्तक लिहिले आहे. २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान या पुस्तकाला मोठी प्रसिद्धी मिळाली. २०२०मध्ये रॉन हॉवर्डने या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवला.
२०१६ च्या निवडणुकांमध्ये व्हान्स यांनी रिपब्लिकन उमेदवार (आणि नंतर राष्ट्राध्यक्ष) डॉनल्ड ट्रम्प यांना मोठा विरोध केला होता परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका बदलली व ते ट्रम्पचे प्रमुख पाठीराखे झाले. जुलै २०२४मध्ये ट्रम्प यांनी व्हान्सची २०२४ च्या निवडणुकीत आपले उपराष्ट्राध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड केली. अमेरिकेतील प्रमुख पक्षाकडून असे नामांकन मिळेलेले व्हान्स हे पहिलेच मरीन कोरचे सैनिक आहेत.
सामाजिक मुद्द्यांमध्ये, व्हान्स गर्भपात, समलिंगी विवाह, अल्पवयीन मुलांसाठी लिंगबदलाला आणि बंदूक नियंत्रणाला विरोध करतात. हे पुराणमतवादी धोरणांना प्रोत्साहन देतात. व्हान्स युक्रेनला रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकन लष्करी मदत देण्याला विरोध करतात.[३] [४] [५] [६] व्हान्स यांचे इतर काही विचार अमेरिकेतील रिपब्लिकनांपेक्षा वेगळे आहेत.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
[संपादन]व्हान्सचा जन्म जेम्स डोनाल्ड बोमन नावाने २ ऑगस्ट, १९८४ रोजी मिडलटाउन, ओहायो येथे बेव्हरली कॅरोल (पूर्वीच्या व्हान्स; जन्म १९६१) आणि डोनाल्ड रे बोमन (१९५९-२०२३) यांच्या घरी झाला. व्हान्स स्कॉट्स-आयरिश वंशाचे आहेत. [७] [८] ते लहान असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. जेडी व्हान्सना त्यांच्या आईचा तिसरा नवरा बॉब हॅमेल याने दत्तक घेतल्यानंतर त्याच्या आईने जेडीच्या वडिलांचे नाव काढून टाकण्यासाठी त्यांचे नाव बदलून जेम्स डेव्हिड हॅमेल असे ठेवले. यावेळी वडीलांचे डॉनल्ड नाव काढल्यावरही जेडी हे टोपणनाव जपण्यासाठी स्वतःच्या एका भावाचे नाव वापरले. [९] [१०]
व्हान्सने लिहिले आहे की त्यांचे बालपण अतिशय दारिद्र्य आणि हालात गेले. त्यांची आई अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती. [११] व्हॅन्स आणि त्याची बहीण लिंडसे यांचे संगोपन मुख्यत्वे त्यांच्या आजी-आजोबा जेम्स (१९२९-१९९७) आणि बॉनी व्हॅन्स (पूर्वीची ब्लँटन; १९३३-२००५) यांनी केले, ज्यांना ते "मामॉ आणि पापॉ" म्हणत. दोन्ही बाजूंचे त्याचे आजी-आजोबा केंटकीच्या ॲपेलेचिया भागातील होते. तेथून ते पुढे ओहायोला स्थलांतरित झाले. [१२] [७] [१३] [१४] [१५]
२०१४मध्ये आपल्या लग्नानंतर, व्हान्सनी त्यांच्या आजी-आजोबांचे व्हान्स हे आडनाव घेतले. [१६] २०१७मध्ये सेंटर कॉलेजने त्यांना मानद पदवी दिली. [१७]
लेखन
[संपादन]जून २०१६ मध्ये, हार्परने व्हान्सचे हिलबिली एलिजी: अ मेम्वा ऑफ अ फॅमिली अँड कल्चर इन क्रायसिस प्रकाशित केले. २०१६ आणि २०१७ मध्ये ते न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीत होते. न्यू यॉर्क टाइम्सने या पुस्तकाला "ट्रम्पचा विजय समजून घेण्यात मदत करण्यासाठीच्या सहा सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक" असे म्हणले आहे. [१८]
चित्रपट दिग्दर्शक रॉन हॉवर्डने २०२०मध्ये या पुस्तकावर आधारित हिलबिली एलिजी हा चित्रपट बनवला. निवडक चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर तो नेटफ्लिक्सवर २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. [१९]
वैयक्तिक जीवन
[संपादन]व्हान्सने आपल्या हिलबिली एलिजी या आत्मचरित्रात लिहिले आहे की ते अगदी गरीब कुटुंबात त्याच्या एकट्या आई आणि आजी बरोबर वाढले होते. [१७] केंटकीमधील कठीण परिस्थितीला कंटाळून त्याच्या आईचे आई-वडील ओहायोमधील मिडलटाउन शहरात स्थलांतरित झाले. लहानपणी व्हान्सने "सुखी कुटुंबासह अमेरिकन स्वप्न" मिळविण्याची आशा ठेवली होती. स्वतःच्या आणि बिल क्लिंटन यांच्या लहानपणातील समानतेमुळे ते क्लिंटनचे चाहते होते. [२०]
२०११ च्या सुमारास, [२१] येल लॉ स्कूलमध्ये शिकत असताना व्हान्स त्यांची पत्नी उषा चिलुकुरी यांना भेटले. [२२] त्याने तिला "माझी येलमधील दैवी मार्गदर्शक" म्हणले आहे. [२२] २९१४मध्ये त्यांनी केंटकी येथे आंतरधर्मीय विवाह सोहळ्यात विवाह केला; [२३] [२४] चिलुकुरी हिंदू आहेत आणि तर व्हान्स ख्रिश्चन आहेत. [२३] [२५] त्यांच्या लग्नात व्हॅन्सचा "सर्वोत्तम मित्र", जमील जिवानी, [२६] [२७] यांनी बायबल वाचन केले होते आणि नंतर जोडप्याला एका हिंदू पंडिताने आशीर्वाद दिला होता. [२२] [२१] या जोडप्याला पुढे तीन मुले झाली.
साहित्य
[संपादन]- Vance, J. D. (June 28, 2016). Hillbilly Elegy: A Memoir of a Family and Culture in Crisis. New York: Harper. ISBN 9780062300546. OCLC 952097610.
- Roberts, Kevin (September 24, 2024). "Foreword". Dawn's Early Light: Taking Back Washington to Save America. Broadside Books. ISBN 978-0063353503.[२८]
संदर्भ
[संपादन]- ^ "J.D. Vance". Britannica. July 26, 2024 रोजी पाहिले.
- ^ O’Brien, Rebecca Davis (15 July 2024). "J.D. Vance Was Not Always His Name. But It's the One That Felt Closest to Home". The New York Times. 25 July 2024 रोजी पाहिले.
- ^ Stein, Jeff (July 15, 2024). "J.D. Vance pick unnerves GOP's business elite, thrills populists". The Washington Post. July 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 16, 2024 रोजी पाहिले.
- ^ "What would a Trump-Vance economic agenda look like?". www.ft.com. 2024-07-21 रोजी पाहिले.
- ^ Staff (July 15, 2024). "Bash the banks, maybe raise taxes: Inside Vance's policy agenda". Politico. July 15, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 16, 2024 रोजी पाहिले.
- ^ Guida, Victoria (2024-07-16). "The Trump-Vance Ticket is a Repudiation of Free-Market Conservatism". Politico. 2024-07-21 रोजी पाहिले.
- ^ a b Rothman, Joshua (September 12, 2016). "The Lives of Poor White People". The New Yorker. January 2, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. March 6, 2017 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "New Yorker 2016-09-12" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ Kroeger, Alix (April 18, 2021). "JD Vance: Trump whisperer turned Senate hopeful". BBC News. May 12, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 12, 2021 रोजी पाहिले.
- ^ "All About J.D. Vance's Parents, Mom Beverly Vance and Dad Donald Bowman". Peoplemag. July 18, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-07-17 रोजी पाहिले.
- ^ Vance, J. D. (2017). Hillbilly Elegy: a Memoir of a Family and Culture in Crisis. Farmington Hills, Mich: Thorndike Press, a part of Gale, Cengage Learning. p. 94. ISBN 978-1-4104-9666-9 – Internet Archive द्वारे.
- ^ BeMiller, Haley (July 15, 2024). "Who is JD Vance? What to know about Donald Trump's VP pick". USA Today. July 15, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 15, 2024 रोजी पाहिले.
- ^ Horn, Austin (July 16, 2024). "JD Vance, Trump's VP pick, has ties to Kentucky. What to know". July 17, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 16, 2024 रोजी पाहिले.
- ^ Kunzru, Hari (December 7, 2016). "Hillbilly Elegy by JD Vance review – does this memoir really explain Trump's victory?". द गार्डियन. April 20, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. October 25, 2017 रोजी पाहिले.
- ^ "'Hillbilly Elegy' Recalls A Childhood Where Poverty Was 'The Family Tradition'". NPR. August 17, 2016. April 9, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 5, 2018 रोजी पाहिले.
- ^ Meibers, Bonnie (November 15, 2020). "'Hillbilly Elegy' is my family's story. I'm happy it shared my Mamaw with the world". Journal-News. May 12, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 12, 2021 रोजी पाहिले.
- ^ Vance, J. D. (2017). Hillbilly Elegy: A Memoir of a Family and Culture in Crisis. Farmington Hills, Mich.: Thorndike Press, a part of Gale, Cengage Learning. p. 339. ISBN 978-1-4104-9666-9 – Internet Archive द्वारे.
- ^ a b Kleppinger, Ben (May 22, 2017). "'Hillbilly Elegy' author J.D. Vance speaks at Centre graduation". The Advocate-Messenger. July 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 16, 2024 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>
tag; नाव "Hillbily-AM" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ^ {{स्रोत बातमी|url=https://www.nytimes.com/2016/11/10/books/6-books-to-help-understand-trumps-win.html%7Ctitle=6 Books to Help Understand Trump's Win|date=November 9, 2016|work=[[The न्यू यॉर्क टाइम्स|access-date=April 13, 2021|archive-url=https://web.archive.org/web/20210215222900/https://www.nytimes.com/2016/11/10/books/6-books-to-help-understand-trumps-win.html%7Carchive-date=February 15, 2021|url-status=live}}
- ^ "Amy Adams and Glenn Close Are Unrecognizable in Thrilling First Trailer for Netflix's Hillbilly Elegy". Peoplemag. July 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 16, 2024 रोजी पाहिले.
- ^ Vance, J. D. (January 2, 2017). "Opinion | Barack Obama and Me". The New York Times. ISSN 0362-4331. July 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 16, 2024 रोजी पाहिले.
- ^ a b "J.D. Vance's 3 Kids: All About Ewan, Vivek and Mirabel". Peoplemag. July 17, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 15, 2024 रोजी पाहिले.
- ^ a b c Bernstein, Joseph; Rosman, Katherine (November 2022). "From Yale to Newsmax, Usha Vance Has Helped J.D. Vance Chart His Path". The New York Times. July 15, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 15, 2024 रोजी पाहिले.
- ^ a b Bhatia, Shireen (July 16, 2024). "Ohio Senator JD Vance reveals Hindu wife's support for his Christian faith". Christian Today. July 17, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 15, 2024 रोजी पाहिले.
- ^ "Is There Something More Radical than MAGA? J.D. Vance Is Dreaming It". Politico. 2024. March 18, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 18, 2024 रोजी पाहिले.
- ^ "JD Vance and his wife discuss the potential of being picked for Trump's VP". Fox News. June 26, 2024. July 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 15, 2024 रोजी पाहिले.
- ^ Tasker, John Paul. "This Conservative MP is 'best friends' with Trump running mate J.D. Vance". CBC. July 17, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 July 2024 रोजी पाहिले.
- ^ "Meet JD Vance's Indian American Wife Usha Chilukuri". India West Journal. May 4, 2022. July 16, 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 15, 2024 रोजी पाहिले.
- ^ McCoy, Robert (July 24, 2024). "J.D. Vance in Serious Trouble After Damning Project 2025 Book Foreword". The New Republic. July 25, 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 July 2024 रोजी पाहिले.