बिना तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा बीना रिफायनरी हा भारतातील मध्य प्रदेशातीलसागर जिल्ह्यातील बीना येथे स्थित एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हा प्रकल्प भारत ओमान रिफायनरी लिमिटेडच्या (BORL) मालकी होता जी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी होती.[१] या रिफायनरीची क्षमता वार्षिक ६ दशलक्ष मेट्रिक टन होती जी ७.८ दशलक्ष मेट्रिक टन करण्यात आली आहे.[२] २०२१ मध्ये भारत पेट्रोलियमने ह्याचे शेअर्स विकत घेतले आणि पुर्णपणे ही भारत पेट्रोलियमच्या मालकीची झाली.[३][४]