Jump to content

भिक्खू संघरत्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भिक्खू संघरत्न
जन्म मे १३, इ.स. २०००
औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण बौद्ध तत्त्वज्ञान
पेशा भिक्खु
धर्म बौद्ध धर्म
संकेतस्थळ
https://www.instagram.com/sangha358/

भिक्खू संघरत्न (जन्म १३ मे २०००) हे एक भारतीय बौद्ध भिक्खू असून ते युनायटेड बुद्धिस्ट महासंघाचे संथापक व अध्यक्ष आहे.

परिचय

[संपादन]

संघरत्न यांचा जन्म १३ मे २००० रोजी औरंगाबाद येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बौद्ध भिक्खू म्हणून झाले. शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्य केले, आणि अजूनही करत आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी ते बौद्ध धर्म अभ्यासण्यासाठी परदेशात गेले होते. तेथील बौद्ध परंपरांचा अभ्यास केल्यानंतर ते भारतात परतले, आणि तरुण बौद्ध मुला-मुलींना एकत्र आणण्यासाठी मोठी संघटना बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बौद्ध समुदायाच्या विकासासाठी ३० एप्रिल २०२० रोजी युनायटेड बुद्धिस्ट महासंघाची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून ते धार्मिक व सामाजिक कार्य करीत आहेत.

सहयोग

[संपादन]

संघरत्न सध्या तरुण भारतीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे, आणि अनेकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली, आणि बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. याच आधारावर संघरत्न यांनी युनायटेड बुद्धिस्ट महासंघाची स्थापना केली आहे, आणि याच्या माध्यमातून ते मुले आणि मुलींच्या शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य करत आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये, त्यांच्या प्रयत्नातून नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या परिसरात एक बोधिवृक्ष लावण्यात आला, जो बोधगयेतील महाबोधी वृक्षाची एक उपशाखा आहे.

बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यायला हवे, यासाठीचे जे आंदोलन जपानी भारतीय बौद्ध भिक्खू नागार्जुन सुरई ससाई यांनी सुरू केले होते, त्या आंदोलनामध्ये भिक्खू संघरत्न सहभागी आहेत.[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ author/lokmat-news-network (2021-07-10). "बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे". Lokmat. 2022-08-02 रोजी पाहिले.
  2. ^ "जगप्रसिद्ध बुद्धगया विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे – चाळीसगावी भारतीय बौद्ध महासभेची मागणी". Satyakam News Maharashtra (इंग्रजी भाषेत). 2022-08-02 रोजी पाहिले.[permanent dead link]