Jump to content

वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१३
दिनांक २८ जून २०१३ - ११ जुलै २०१३
स्थळ वेस्ट इंडीज
निकाल भारतचा ध्वज भारत विजयी विरुद्ध श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघ
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
संघनायक
ड्वेन ब्राव्हो महेंद्रसिंग धोणी
विराट कोहली
अँजेलो मॅथ्यूस
सर्वात जास्त धावा
जॉन्सन चार्ल्स १८५ रोहित शर्मा २१७ उपुल तरंगा २२३
सर्वात जास्त बळी
केमार रोच भुवनेश्वर कुमार १० रंगना हेरात १०

वेस्ट इंडीज त्रिकोणी मालिका, २०१३ ही एकदिवसीय सामन्यांची मालिका वेस्ट इंडीज मध्ये जून-जुलै २०१३ मध्ये खेळविली गेली. या मालिकेत भारत, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे देश सहभागी झाले. या मालिकेतील पहिली फेरी सबाइना पार्क, किंग्स्टन, जमैका या मैदानावर आणि दुसरी फेरी व अंतिम सामना क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळविला गेला. या मालिकेला सेलकॉन मोबाईल कप असे नाव दिले गेले. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीला दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे २ सामन्यांना मुकावे लागले[]. त्याच्या गैरहजेरीत विराट कोहलीकडे कर्णधार पदाची धुरा सोपविण्यात आली व अंबारती रायडूला खेळण्याची संधी मिळाली. अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात हातातून निसटत चाललेला विजय कर्णधार महेंद्रसिंग धोणीने शेवटच्या षटकात फक्त ४ चेंडूत १५ धावा काढून खेचून आणला व भारताने श्रीलंकेला १ गडी राखून पराभूत करून सेलकॉन मोबाईल कपवरती भारताचे नाव कोरले[].

सामने

[संपादन]

साखळी सामने

[संपादन]

गुणतक्ता

[संपादन]
क्र संघ सा वि बो गुण ए.धा.
भारतचा ध्वज भारत १० +०.०५४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका +०.३४८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.३८३

फेरी १

[संपादन]
२८ जून २०१३
९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०८/१० (४८.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०९/४ (३७.५ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ५५ (७७)
सुनील नरेन ४/४० (१० षटके)
क्रिस गेल १०९ (१००)
रंगना हेराथ १/३७ (६ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी आणि ७३ चेंडू राखून विजयी
पंच: इयान गोल्ड (इं) व जोएल विल्सन (वे)
सामनावीर: क्रिस गेल, वेस्ट इंडीज
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • गुणः वेस्ट इंडीज - ५, श्रीलंका - ०

३० जून २०१३
९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२२९/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३०/७ (४७.४ षटके)
रोहित शर्मा ६० (८९)
केमार रोच २/४१ (१० षटके)
डॅरेन सॅमी २/४१ (१० षटके)
जॉन्सन चार्ल्स ९७ (१००)
उमेश यादव ३/४३ (९.४ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
पंच: इयान गोल्ड (इं) व पीटर नेरो (वे)
सामनावीर: जॉन्सन चार्ल्स (वे)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • गुणः वेस्ट इंडीज - ४, भारत - ०

२ जुलै २०१३
९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३४८/१ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८७ (४७.४ षटके)
उपुल तरंगा १७४* (१५९)
रविचंद्रन आश्विन १/६७ (१० षटके)
रविंद्र जाडेजा ४९* (६२)
रंगना हेराथ ३/३७ (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १६१ धावांनी विजयी
पंच: इयान गोल्ड (इं) व जोएल विल्सन (वे)
सामनावीर: उपुल तरंगा (श्री)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • गुणः श्रीलंका - ५, भारत - ०


फेरी २

[संपादन]
५ जुलै २०१३
९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
३११/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७१ (३४ षटके)
विराट कोहली १०२ (८३)
टीनो बेस्ट २/५१ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत १०२ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
पंच: नायजेल लाँग (इं) व पीटर नेरो (वे)
सामनावीर: विराट कोहली, भारत
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • वेस्ट इंडीजच्या डावा दरम्यान आलेल्या पावसामुळे वेस्ट इंडीजपुढे जिंकण्यासाठी ३९ षटकांमध्ये २७४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • गुणः भारत - ५, वेस्ट इंडीज - ०

७,८ जुलै २०१३
९:३०
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१९/८ (४१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९०/९ (४१ षटके)
कुमार संघकारा ९० (९५)
केमर रॉच ४/२७ (८ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३९ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
पंच: नायजेल लाँग (इं) व जोएल विल्सन (वे)
सामनावीर: कुमार संघकारा, श्रीलंका
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
  • पावसामुळे पहिल्या दिवशी श्रीलंकेच्या डावातील १९ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा खेळविण्यात आला.
  • गुणः श्रीलंका - ४, वेस्ट इंडीज - ०

९ जुलै २०१३
९:३०
धावफलक
भारत Flag of भारत
११९/३ (२९ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९६ (२४.४ षटके)
रोहित शर्मा ४८* (८३)
रंगना हेराथ २/३२ (६ षटके)
भारतचा ध्वज भारत ८१ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
पंच: नायजेल लाँग (इं) व पीटर नेरो (वे)
सामनावीर: भुवनेश्वर कुमार, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
  • २९व्या षटकांनंतर आलेल्या पावसामुळे भारताचा डाव तिथेच थांबविण्यात आला व श्रीलंकेसमोर विजयासाठी २६ षटकांमध्ये १७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • या सामन्याच्या निकालामुळे भारत व श्रीलंका अंतिम सामन्यासाठी पात्र तर वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाद
  • गुणः भारत - ५, श्रीलंका - ०


अंतिम सामना

[संपादन]
११ जुलै २०१३
९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०१ (४८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०३/९ (४९.४ षटके)
कुमार संघकारा ७१ (१००)
रविंद्र जडेजा ४/२३ (४९.४ षटके)
रोहित शर्मा ५८ (८९)
रंगना हेराथ ४/२० (१० षटके)
भारतचा ध्वज भारत १ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
पंच: नायजेल लाँग (इं) व पीटर नेरो (वे)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी, भारत
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


आकडेवारी

[संपादन]

फलंदाजी

[संपादन]
सर्वाधिक धावा[]
फलंदाज सामने धावा सरासरी सर्वाधिक
श्रीलंका उपुल तरंगा २२३ ५५.७५ १७४*
भारत रोहित शर्मा २१७ ५४.२५ ६०
श्रीलंका महेला जयवर्धने १९९ ३९.८० १०७
वेस्ट इंडीज जॉन्सन चार्ल्स १८५ ४६.२५ ९७
श्रीलंका कुमार संघकारा १७८ ५९.३३ ९०*

गोलंदाजी

[संपादन]
सर्वाधिक बळी[]
गोलंदाज सामने बळी इकॉनॉमी सर्वोत्कृष्ट
भारत भुवनेश्वर कुमार १० ३.३४ ४/८
श्रीलंका रंगना हेराथ १० ३.९३ ४/२०
भारत रविंद्र जाडेजा ४.८६ ४/२३
भारत इशांत शर्मा ५.७० २/१७
श्रीलंका अँजेलो मॅथ्यूज ३.४१ ४/२९

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ टीम इंडियाला धक्का, कर्णधार ढोणी ‘आऊट’[permanent dead link]
  2. ^ "भारत अजिंक्य, ढोणीच्या षटकारानं केला चमत्कार!". 2013-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-12 रोजी पाहिले.
  3. ^ [संपूर्ण यादी www.cricinfo.com वर]
  4. ^ [संपूर्ण यादी www.cricinfo.com वर]