हताणे
?हताणे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मालेगाव |
जिल्हा | नाशिक |
तालुका/के | मालेगाव |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
२,४१३ (२०११) १.०७ ♂/♀ ७४.२९ % • ८३.०५ % • ६४.९५ % |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | अहिराणी |
कोड • पिन कोड |
• ४२३१०५ |
हताणे हे महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यामधील एक गाव आहे.
स्थान
[संपादन]हताणे हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यात मालेगाव या शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर रस्त्यावर वसलेले आहे.
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]गावात प्रामुख्याने हिंदू धर्मीय आहेत. गावात मराठा, राजपुत, जाट सोबत ईतर जातिजमातीचे लोकही राहतात. २०११ च्या जनगणनेनुसार गावात ४७५ घरे आहेत तर गावाची एकूण लोकसंख्या २४१३ इतकी आहे. त्यापैकी १२५२ पुरुष तर ११६१ महिला. एकूण बालकांची संख्या ३६७ ( मुले १९६, मुली १७१).
प्रशासन
[संपादन]इथला कारभार हा ग्रामपंचायती मार्फत चालतो. हताणे हे गाव मालेगाव बाह्य विधानसभा तर धुळे लोकसभा क्षेत्रात येते.
शिक्षण
[संपादन]या गावात प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हापरिषदेची प्राथमिक विद्यालय हताणे ही शाळा तर माध्यमिक शिक्षणासाठी महात्मा गांधी विद्यामन्दिर संचलित माध्यमिक विद्यालय हताणे हे माध्यमिक विद्यालय आहे. तसेच लहान मुलांसाठी आंगणवाडी आहे. महाविद्यालयीन शिक्षण करंजगव्हाण, मालेगाव किंवा नाशिक यांपैकी कुठल्याही एका ठिकाणाहून पूर्ण केले जाते. २०११ च्या जनगणनेनुसार गावातील साक्षरता दर हा ७४. २९% (पुरुष ८३. ०५% ; महिला ६४. ९५%) इतका आहे.
आरोग्य
[संपादन]गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामार्फत सरकारी आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावात खाजगी इस्पितळे ही आहेत.
व्यवसाय
[संपादन]सध्या शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय ही केला जातो.
धार्मिक वातावरण
[संपादन]श्री हनुमान, लक्ष्मी, श्रीराम मंदिरे आहेत. गावात भागवत सप्ताह, हरीनाम सप्ताह, टाळ सप्ताह होत असतो. हनुमान जयंती, श्री गणेश उत्सव व नवरात्री उत्सव ही मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो. गावाच्या जवळच बर्डीवर देवीचे मंदिर आहे तिथे वर्षातून एकदा जत्रा भरते. गावाजवळच खडकी परिसरात महादेवाचे मनोहर असे मंदिर आहे. मंदिरात सुंदर आणि आकर्षक शिवलिंग स्थापित केले आहे. हे मंदिर सुळेश्वर मंदिर म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते