हिंदू खाटीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिंदू खाटीक
एकूण लोकसंख्या

भारत: सुमारे ८ कोटी

लोकसंख्येचे प्रदेश
प्रमुख : महाराष्ट्र

इतर : मध्य प्रदेश  • कर्नाटक  • उत्तरप्रदेश  • तेलंगाणा  • गुजरात  • राजस्थान

भाषा
मुख्यः- मराठी, हिंदी आणि भोजपुरी
धर्म
हिंदू धर्म[१]
संबंधित वांशिक लोकसमूह
मराठी लोक


खाटीक हा हिंदू धर्मातील एक समाज आहे. . हा क्षत्रिय कुळामध्ये मोडतो. हा समाज महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आणि गुजरात येथे राहतो. या समाजाची भारतामध्ये लोकसंख्या ९ कोटीच्या जवळ आहे. भारतामध्ये या समाजाला फक्त खाटीक म्हणून देखील ओळखले जाते. या समाजात प्रामुख्याने देवीची पूजा केली जाते. या समाजाचा प्रमुख व्यवसाय मांस कापणे हा आहे, या मांस कापण्यावरूनच या समाजाचे नाव खाटीक असे पडले. हा समाज हिंदू धर्मात आणि अनुसूचित जाती मध्ये येतो. या समाजाचे टोपण नाव कलाल असे आहे. या समाजाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात. ते म्हणजे खालील प्रमाणे.

  • तेलंगी कलाल
  • कलाल
  • खाटीक

१) तेलंगी कलाल[संपादन]

हा प्रकार तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये राहतो. हा प्रकार तेलगू आणि कानडी भाषिक आहे.हा हैदराबाद,बिदर,गुलबर्गा आणि भालकी येथे वसलेला आहे.याला तेलंगी खाटीक असेही संबोधले जाते.

२) कलाल[संपादन]

हा प्रकार महाराष्ट्र राज्यात राहतो. हा प्रकार मराठी भाषिक आहे. हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ् मध्ये वसलेला आहे.[२]

३) खाटीक[संपादन]

हा तिसरा प्रकार उत्तर भारतात म्हणजेच उत्तर प्रदेश,राजस्थान आणि बिहार या राज्यात अस्तित्वात आहे. या प्रकाराला फक्त खाटीक या नावाने संबोधले जाते. यांचे आडनाव पण हेच असते.

उगम[संपादन]

या समाजाचा उगम वैदिक काळापासून चार वर्णातील पहिल्या वर्णा पासून म्हणजेच क्षत्रिय वर्णा पासून झाला.या समाजाचे लोक जेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा सैनिकांना लढाईचे साहित्य बनवून द्यायचे.पुन्हा काळ बदलत गेला.लढाईचे साहित्य बनवले तरीही त्यांना मोबदल्यात काहीच मिळत नव्हते.असे होत असल्यामुळे त्यांनी साहित्य बनवायचे बंद केले आणि मांस कापणे हा नवीन व्यवसाय सुरू केला.या मांस कापण्याचा व्यवसायामुळे या समाजाला लोक तुच्छ समजू लागले.तेव्हा पासूनच या समाजाचे नाव खाटीक असे पडले.

विस्तार[संपादन]

या समाजाचा विस्तार दक्षिणेकडील अपवाद वगळता संपूर्ण भारतात झालेला आहे.या समाजाचे भारतातील मुख्य प्रदेश राजस्थान, महाराष्ट्र,उत्तर प्रदेश आणि तेलंगणा होय. या समाजाचा बांगलादेश मध्ये देखील विस्तार आहे.

संदर्भ[संपादन]